भिवंडीत 'मिथेनॉल'चा मोठा साठा जप्त
- आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार एफडीएची धडक कारवाई
मुंबई, दि. ३० : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील फुगेवाडी, दापोडी आणि हडपसर येथे विषारी गावठी दारूच्या सेवनामुळे १८ जणांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर भिवंडी येथील मेसर्स रेक्स इंटरनॅशनल या कंपनीवर धाड टाकून मिथेनॉलचा भिवंडी येथे धाड टाकून ५,९२९ किलो साठा जप्त करण्यात आला. प्राथमिक तपासात पुणे प्रकरणातील दारूमध्ये वापरण्यात आलेले मिथेनॉल याच कंपनीकडून पुरविण्यात आल्याचे समोर आले आहे.
जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती अथवा आस्थापनेला कोणतीही सवलत दिली जाणार नाही. औषधे व सौंदर्यप्रसाधने अधिनियम, १९४० तसेच संबंधित कायदे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर व न्यायालयीन कारवाई करण्यात येईल. सुरक्षित अन्न व औषधे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असून तो सुनिश्चित करणे हीच आमची सर्वोच्च जबाबदारी आहे, असे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी म्हटले आहे.
विषारी गावठी दारूच्या सेवनामुळे मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई केली आहे. अवघ्या ३० रुपयांत विकल्या जाणाऱ्या या दारूमध्ये 'मिथेनॉल' हे विषारी रसायन मिसळण्यात आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभर मिथेनॉलच्या अवैध साठ्यांविरोधात तातडीने कारवाईचे आदेश दिले.
No comments:
Post a Comment