Saturday, 28 February 2026

कॅमेरे, सेन्सर्स आणि सायरन प्रणालीने गावकऱ्यांना तत्काळ इशारा

 कॅमेरेसेन्सर्स आणि सायरन प्रणालीने गावकऱ्यांना तत्काळ इशारा

 -वन मंत्री गणेश नाईक

·         वन्यप्राणी हालचालींवर डिजिटल नियंत्रण

मुंबईदि.२७ : वाढत्या मानववन्यजीव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने वन्यप्राण्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्याची प्रणाली कार्यान्वित केली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआयआधारित कॅमेरेसेन्सर्स आणि सॅटेलाईट प्रणालीच्या सहाय्याने संवेदनशील भागांमध्ये सतत निरीक्षण केले जात असल्याचे, वन मंत्री गणेश नाईक यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

याबाबत सदस्य प्रवीण दरेकर यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य अभिजीत वंजारीपरिणय फुकेशशिकांत शिंदेभाई जगतापशिवाजीराव गर्जेसदाभाऊ खोतसतेज पाटीलअनिल परब यांनी उपप्रश्न उपस्थित केला.

मराठी भाषेच्या संदर्भात

 मराठी भाषेच्या संदर्भात शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले कीराज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे हे बंधनकारक आहे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित केली जाईल. येत्या दोन वर्षांत म्हणजे 2026-27 पर्यंत राज्यातील मराठी शाळांमधील पटसंख्या किमान 25 टक्क्यांनी वाढलेली दिसेलअसे मंत्री भुसे यांनी सांगितले.

 

या चर्चेत विधानसभा सदस्य अस्लम शेखप्रविण दटके  यांनी सहभाग घेतला.

0000

मराठी शाळांमधील पटसंख्या वाढविण्याचे शासनाचे प्रयत्न

 विधानसभा / प्रश्नोत्तरे

मराठी शाळांमधील पटसंख्या वाढविण्याचे शासनाचे प्रयत्न

- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

 

मुंबई, दि. २७ : मराठी शाळांमधील पटसंख्या वाढविण्यासाठी  शासन विविध उपक्रम राबवत आहे. गुणवत्तापूर्ण आणि आनंददायी शिक्षण देऊन पालकांचा शासकीय शाळांवरील विश्वास दृढ करणे हे शासनाचे उद्दिष्ट आहे. यासाठी गणवेशपाठ्यपुस्तक आदी सुविधा वेळेवर मिळाव्यातशाळांमध्ये स्वच्छ पिण्याचे पाणीशौचालयेप्रयोगशाळावाचनालय आणि खेळाची मैदाने असावीत यावर भर देण्यात येत  आहे, असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे  यांनी विधानसभेत सांगितले.

 

राज्यातील मराठी माध्यमांच्या शाळांमधील  पटसंख्या वाढविणे तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर पदे भरण्याबाबत विधानसभा सदस्य विक्रम पाचपुते यांनी प्रश्न उपस्थित केला.

 


प्लास्टिक आणि थर्मोकॉलच्या वस्तूंवर राज्यभर बंदी

 प्लास्टिक आणि थर्मोकॉलच्या वस्तूंवर राज्यभर बंदी असूनस्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरिकांनी देखील या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा. लग्नसमारंभसणआणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये पर्यावरणपूरक सजावटपुनर्वापरयोग्य साहित्य आणि नैसर्गिक फुलांच्या वापरास प्रोत्साहित केले जाईल. राज्य शासनाकडून लवकरच या संदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना व अंमलबजावणी यंत्रणा जाहीर केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच होळी सणाच्या अनुषंगाने देखील पर्यावरणपूरक रंग वापरण्याबाबत पर्यावरण विभागामार्फत जनजागृती केली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

            या लक्षवेधीच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य जयंत पाटीलप्रविण दटके यांनी सहभाग घेतला.

पर्यावरण व वातावरणीय बदल

   पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी उत्तर देताना सांगितले कीराज्यात बायोडिग्रेडेबल नसलेल्या प्लास्टिक वस्तूंवर बंदी लागू आहे. कृत्रिम फुलांमध्ये वापरले जाणारे केमिकल्स मानवी आरोग्यास हानिकारक असल्यास त्यांच्या विरोधात निश्चित कारवाई होईल. आतापर्यंत ४१३५ टन प्लास्टिक कचरा जप्त करण्यात आला असूनसुमारे २५ कोटी रुपये दंड स्वरूपात वसूल करण्यात आले आहेत. तसेच ९२ हजार ठिकाणी नियमभंगाच्या घटना आढळल्या असूनदोषींवर दंडात्मक आणि शिक्षेची कारवाई करण्यात आली आहे.

मुंबईतील दादर फूल मार्केट बंद करण्याचा निर्णय ?

 मुंबईतील दादर फूल मार्केट बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही. काही ठिकाणी अतिक्रमण कारवाई दरम्यान गैरसमज झाला असावा. फूल मार्केट व्यवस्थित सुरू राहील यासाठी  महानगरपालिकेला याबाबत तातडीने आदेश दिले जातील. राज्यातील पर्यावरण संवर्धनस्थानिक फूल उत्पादकांचे हित आणि पारंपरिक संस्कृतीचे जतन या सर्वांचा विचार करून हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

विश्व मराठी संमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'आपलं मंत्रालय'च्या विशेषांकाचे प्रकाशन

 विश्व मराठी संमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते

'आपलं मंत्रालय'च्या विशेषांकाचे प्रकाशन

 

कविवर्य कुसुमाग्रजनगरी (नाशिक)दि. २७  : माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित केलेल्या जाणाऱ्या आपलं मंत्रालय’ या नियतकालिकाच्या मराठी भाषा विशेषांकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चौथ्या विश्व मराठी संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी करण्यात आले.

 यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारअन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळजलसंपदा मंत्री गिरीश महाजनउद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंतखासदार डॉ. शोभा बच्छावखासदार राजाभाऊ वाजेमहापौर हिमगौरी आडके- आहेरआमदार किशोर दराडेआमदार माणिकराव कोकाटेआमदार ॲड. राहुल ढिकलेआमदार देवयानी फरांदेआमदार सीमा हिरेउपमहापौर विलास शिंदेज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडेमहाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती महामंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरेमाजी अध्यक्ष मधु मंगेश कर्णिकसंमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा मविप्र संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे आदी उपस्थित होते.

   ‘आपलं मंत्रालय’ या नियतकालिकाचा विशेषांक मराठी भाषा गौरव दिनानिमित्त प्रकाशित करण्यात आला आहे. मराठी भाषा मंत्री श्री. सामंत हे या अंकाचे अतिथी संपादक असून 

या विशेषांकात अभिजात मराठी भाषा : इतिहासवर्तमान आणि भविष्यजयपूर साहित्य उत्सवात मराठी भाषा विभागाची पताकामराठी : राजभाषामराठी भाषा विभागमराठी भाषा संचालनालयमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळराज्य मराठी विकास संस्थामराठी विज्ञान परिषदमहाराष्ट्र राज्य विश्व कोश निर्मिती मंडळमराठी विश्वकोशाचे अभिमान गीतमराठी भाषा भवनउत्सव अभिजात मराठीच आदी माहितीपर लेख आहेत.

मराठी साहित्य विश्वामधील कोल्हापूरचे योगदानआजपर्यंत मराठी साहित्य संमेलनेशासकीय प्रयोजनात मराठीस्त्री संतांचे अभंगमराठीला आकार देणारे महानुभाव साहित्यभाषेच्या इतिहासात अकोल्याचे स्थान अनन्यसाधारण आदी विषयांवरील लेखांमुळे हा अंक संग्राह्य असा आहे. प्रदर्शनस्थळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दलानात हा अंक वितरणासाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आला आहे.


Featured post

Lakshvedhi