विधानसभा / प्रश्नोत्तरे
मराठी शाळांमधील पटसंख्या वाढविण्याचे शासनाचे प्रयत्न
- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे
मुंबई, दि. २७ : मराठी शाळांमधील पटसंख्या वाढविण्यासाठी शासन विविध उपक्रम राबवत आहे. गुणवत्तापूर्ण आणि आनंददायी शिक्षण देऊन पालकांचा शासकीय शाळांवरील विश्वास दृढ करणे हे शासनाचे उद्दिष्ट आहे. यासाठी गणवेश, पाठ्यपुस्तक आदी सुविधा वेळेवर मिळाव्यात, शाळांमध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी, शौचालये, प्रयोगशाळा, वाचनालय आणि खेळाची मैदाने असावीत यावर भर देण्यात येत आहे, असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत सांगितले.
राज्यातील मराठी माध्यमांच्या शाळांमधील पटसंख्या वाढविणे तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर पदे भरण्याबाबत विधानसभा सदस्य विक्रम पाचपुते यांनी प्रश्न उपस्थित केला.
No comments:
Post a Comment