Tuesday, 29 September 2026

आयुर्वेद ही केवळ रोगोपचाराची पद्धती नसून निरोगी जीवनशैलीचा व्यापक ज्ञानस्रोत

 आयुर्वेद ही केवळ रोगोपचाराची पद्धती नसून निरोगी जीवनशैलीचा व्यापक ज्ञानस्रोत आहे. मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, हृदयरोग यांसारख्या जीवनशैलीशी संबंधित आजारांवर आयुर्वेदाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरू शकते. आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकाने परस्परपूरक दृष्टिकोनातून कार्य करावे. आयुर्वेद शिक्षण, संशोधन व नवोन्मेषासाठी जागतिक दर्जाच्या संस्था, अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि संशोधन सुविधा उभारण्याची गरज असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

निरोगी व समृद्ध भारताच्या भविष्यासाठी आयुर्वेदाची महत्त्वपूर्ण भूमिका


- केंद्रीय राज्य मंत्री प्रतापराव जाधव


आयुर्वेद ही केवळ उपचारपद्धती नसून निरोगी जीवनशैलीचा मार्ग आहे. दिनचर्या, ऋतुचर्या, योग्य आहार-विहार आणि योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. आयुर्वेदाला आधुनिक संशोधन व तंत्रज्ञानाशी जोडून देशातील आरोग्यव्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर दिला जात असल्याचे आयुष आणि आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे केंद्रीय राज्य मंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितले.

आयुर्वेदिक औषधी वनस्पतींच्या संवर्धनातून आरोग्यासोबतच पर्यावरण, शेती, रोजगार आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते. आयुर्वेदाच्या माध्यमातून निरोगी, आत्मनिर्भर आणि समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

शिक्षण, आरोग्य, पोषण, सार्वजनिक सुरक्षा, न्याय, सामाजिक संरक्षण आणि रोजगार या क्षेत्रांतील सार्वजनिक सेवा

 शिक्षण, आरोग्य, पोषण, सार्वजनिक सुरक्षा, न्याय, सामाजिक संरक्षण आणि रोजगार या क्षेत्रांतील सार्वजनिक सेवा नागरिकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी राज्यस्तरीय सुधारणा, प्रशासकीय क्षमता वृद्धी आणि पुराव्यावर आधारित धोरणांच्या अंमलबजावणीवर पुस्तकात भर देण्यात आला आहे. संशोधन आणि प्रत्यक्ष अनुभवांच्या आधारे शासनव्यवस्था अधिक परिणामकारक करण्यासाठी त्यात व्यवहार्य उपाय सुचविण्यात आले आहेत.

आधुनिक विज्ञानाची जोड देऊन आयुर्वेदाला जागतिक स्तरावर नेण्याची गरज

 आधुनिक विज्ञानाची जोड देऊन आयुर्वेदाला जागतिक स्तरावर नेण्याची गरज

-राज्यपाल जिष्णु देव वर्मा

 

मुंबई, दि. २८ : आयुर्वेद ही भारताची प्राचीन आणि अमूल्य ज्ञानपरंपरा असून, या ज्ञानाला आधुनिक वैज्ञानिक संशोधन, क्लिनिकल पडताळणी आणि नवोन्मेषाची जोड देऊन आयुर्वेदाला जागतिक स्तरावर प्रभावी स्थान मिळवून देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.

 

विश्व आयुर्वेद परिषद, महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित ‘आयुर्वेद दिन २०२६’ निमित्त एकदिवसीय वैज्ञानिक परिसंवादाचे आयोजन दादरच्या सूर्यवंशी सभागृहात करण्यात आले होते. यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमास केंद्रीय राज्य मंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय राज्य मंत्री श्रीपाद नाईक, कार्यक्रमाध्यक्ष रणजित पुराणिक, माजी महापौर डॉ. शुभा राऊळ, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे,महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.व्यंकट गिते,विश्व आयुर्वेद परिषद महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. विनायक तायडे आदी उपस्थित होते.

 

आयुर्वेद ही केवळ रोगोपचाराची पद्धती नसून निरोगी जीवनशैलीचा व्यापक ज्ञानस्रोत आहे. मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, हृदयरोग यांसारख्या जीवनशैलीशी संबंधित आजारांवर आयुर्वेदाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरू शकते. आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकाने परस्परपूरक दृष्टिकोनातून कार्य करावे. आयुर्वेद शिक्षण, संशोधन व नवोन्मेषासाठी जागतिक दर्जाच्या संस्था, अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि संशोधन सुविधा उभारण्याची गरज असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

उपलब्ध साधनसंपत्तीतून अपेक्षित परिणाम साधणे हे राज्यापुढील प्रमुख आव्हान

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उपलब्ध साधनसंपत्तीतून अपेक्षित परिणाम साधणे हे राज्यापुढील प्रमुख आव्हान आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणेची क्षमता वाढविण्यावर शासनाने भर दिला आहे. गेल्या वर्षभरापेक्षा अधिक काळापासून शासनाने १०० दिवस आणि १५० दिवसांच्या उद्दिष्टाधारित कार्यक्रमांची यशस्वी अंमलबजावणी केली आहे. या कालबद्ध कार्यक्रमांमध्येही क्षमता वृद्धीला प्राधान्य दिले आहे. विकसित महाराष्ट्राचा हा दीर्घकालीन प्रवास असून, त्यासाठी शासनाचे सातत्यपूर्ण आणि केंद्रित प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्र लवकरच विकासाच्या बाबतीत देशात आघाडी घेऊन आदर्श निर्माण करेल.

२०३६ पर्यंत ९० टक्के पात्र झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्याचे लक्ष्य

 पुणे आर्थिक प्रदेशासाठी २०३६ पर्यंत २२० अब्ज डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट

 

·         पुणे ग्रोथ हबचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादरीकरण

·         १५ ते २० लाख अतिरिक्त रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट

·         मेट्रोचे जाळे २५० किलोमीटरपर्यंत विस्तारण्याचे नियोजन

·         २०३६ पर्यंत ९० टक्के पात्र झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्याचे लक्ष्य

 

मुंबई, दि. २८ : नीती आयोगाच्या ‘ग्रोथ हब’ उपक्रमांतर्गत पुणे आर्थिक क्षेत्राचा सर्वंकष विकास आराखडा तयार करण्यात आला असून या आराखड्याचे सादरीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले. पुणे आर्थिक प्रदेशाची अर्थव्यवस्था २०३६ पर्यंत २०० ते २२० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी ५८ प्राधान्य प्रकल्प, नऊ ते दहा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि सुमारे १५ ते २० लाख अतिरिक्त रोजगार निर्मितीचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणे, परवडणारी घरे उपलब्ध करून देणे आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे, ही या आराखड्याची प्रमुख उद्दिष्टे आहेत.

विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र देशासाठी आदर्श निर्माण करेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र देशासाठी आदर्श निर्माण करेल

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


· प्रशासकीय क्षमता वाढवून योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर

मुंबई, दि. २८ : महाराष्ट्राला सर्वच क्षेत्रात प्रथम क्रमांकावर नेण्यासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. शासन यंत्रणेची क्षमता बळकट करणे, उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करणे आणि योजनांच्या परिणामांचे प्रभावी मूल्यमापन यावर भर दिला जात आहे. या प्रयत्नांतून महाराष्ट्र विकसित राज्य म्हणून देशासाठी आदर्श निर्माण करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.



ईश्वराचे आभार मानण्याची १० अद्भुत कारणे:

 ईश्वराचे आभार मानण्याची १० अद्भुत कारणे:


१. टायर चालल्यामुळे झिजतात, पण पायांचे तळवे आयुष्यभर धावूनही नवीन असल्यासारखेच राहतात.


२. शरीर ७५% पाण्याने बनलेले आहे, तरीही लाखो छिद्रे (रोमछिद्रे) असूनही घामाशिवाय पाण्याचा एक थेंबही गळत (लीकेज) नाही.


३. कोणतीही वस्तू आधाराशिवाय उभी राहू शकत नाही, पण हे शरीर स्वतःचे संतुलन स्वतःच राखते.


४. कोणतीही बॅटरी चार्जिंगशिवाय चालत नाही, पण हृदय जन्मापासून ते मृत्यूपर्यंत न थांबता धडधडत राहते.


५. कोणताही पंप कायम चालू राहू शकत नाही, पण रक्त आयुष्यभर न थांबता शरीरात शुद्ध होवून वाहत राहते.


६. जगातील सर्वात महागडे कॅमेरेही मर्यादित आहेत, पण डोळे हजारो मेगापिक्सलच्या गुणवत्तेत प्रत्येक दृश्य टिपू शकतात.


७. कोणतीही लॅब (प्रयोगशाळा) प्रत्येक चव पारखू शकत नाही, पण जीभ मात्र कोणत्याही उपकरणा- शिवाय अनेकविध चवी ओळखू शकते.


८. सर्वात प्रगत (अ‍ॅडव्हान्स) सेन्सर्सही मर्यादित असतात, पण त्वचा लहानात लहान स्पर्श आणि संवेदना अनुभवू शकते.


९. कोणतेही यंत्र सर्व प्रकारचे आवाज काढू शकत नाही, पण गळ्यातून हजारो फ्रिक्वेन्सीचे मधूर आवाज निर्माण होऊ शकतात.


१०. कोणतेही साधन सर्व ध्वनी पूर्णपणे डिकोड करू शकत नाही, पण कान, प्रत्येक आवाज समजून त्याचा अर्थ देखील लावतात.


ईश्वराने आपल्याला ज्या अमूल्य गोष्टी दिल्या आहेत, त्याबद्दल त्याचे आभार मानायला हवे. तथापि आपणास त्याच्याकडे तक्रार करण्याचा काय अधिकार आहे, सांगा!


दररोज सकाळी आपले जागणे हा सुद्धा स्वतःमध्ये एक चमत्कारच आहे! म्हणूनच त्या सर्वशक्तिमान ईश्वराचे धन्यवाद मानू या.👏👏👏


*अनुवाद*


भगवान को धन्यवाद देने के 10 शानदार कारण:


1. टायर इस्तेमाल से घिस जाते हैं, लेकिन आपके पैरों के तलवे ज़िंदगी भर दौड़ने के बाद भी नए जैसे ही रहते हैं।


2. शरीर 75% पानी से बना है, फिर भी लाखों रोमछिद्रों के बावजूद, पसीने के बिना पानी की एक भी बूंद बाहर नहीं निकलती।


3. कोई भी चीज़ बिना सहारे के खड़ी नहीं रह सकती, लेकिन यह शरीर अपना बैलेंस खुद बनाए रखता है।


4. कोई भी बैटरी बिना चार्ज किए नहीं चल सकती, लेकिन दिल जन्म से लेकर मौत तक बिना रुके धड़कता रहता है।


5. कोई भी पंप हमेशा नहीं चल सकता, लेकिन खून ज़िंदगी भर बिना रुके, साफ़ और शुद्ध होकर शरीर में बहता रहता है।


6. दुनिया के सबसे महंगे कैमरे भी लिमिटेड हैं, लेकिन आँखें हर सीन को हज़ारों मेगापिक्सल की क्वालिटी में कैप्चर कर सकती हैं।


7. कोई भी लैब हर स्वाद नहीं चख सकती, लेकिन ज़बान बिना किसी इक्विपमेंट के कई स्वाद पहचान सकती है।


8. सबसे एडवांस्ड सेंसर भी लिमिटेड हैं, लेकिन स्किन छोटे से छोटे टच और सेंसेशन को महसूस कर सकती है।


9. कोई भी मशीन हर तरह की आवाज़ें नहीं निकाल सकती, लेकिन गला हज़ारों फ़्रीक्वेंसी की मधुर आवाज़ें निकाल सकता है।


10. कोई भी डिवाइस सभी आवाज़ों को पूरी तरह से डिकोड नहीं कर सकता, लेकिन कान हर आवाज़ को समझते हैं और उसका मतलब निकालते हैं।


हमें भगवान को उन अनमोल चीज़ों के लिए धन्यवाद देना चाहिए जो उन्होंने हमें दी हैं। लेकिन, हमें उनसे शिकायत करने का क्या हक़ है, मुझे बताओ!


हर सुबह उठना भी अपने आप में एक चमत्कार है! इसलिए, आइए हम उस सर्वशक्तिमान भगवान को धन्यवाद दें।👏👏👏

Featured post

Lakshvedhi