Friday, 25 September 2026

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी संगमनेरमध्ये नुकसानग्रस्त सोयाबीन पिकाची केली पाहणी · शेतकऱ्यांना शासनाकडून सर्वतोपरी मदतीची ग्वाही

 कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी संगमनेरमध्ये नुकसानग्रस्त सोयाबीन पिकाची  केली पाहणी

·         शेतकऱ्यांना शासनाकडून सर्वतोपरी मदतीची ग्वाही

 

शिर्डी, दि.२४ (उमाका): शेतकऱ्यांना सर्व शासकीय विभागाच्या योजनांचा लाभ पीक विमा आणि कर्जमुक्ती योजनांचा लाभ प्राधान्याने देण्यासाठी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले सांगितले. संगमनेर तालुक्यातील पिंपळे गावातील शेतकरी सोपान चकोर यांच्या शेताच्या बांधावर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी  दुष्काळसदृश परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केली.

 

यावेळी त्यांच्यासोबत संगमनेरचे आमदार अमोल खताळ, कृषी आयुक्त सूरज मांढरे, जिल्हाधिकारी पंकज आशिया, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, कृषी संचालक विनयकुमार आवटे, विभागीय कृषी सहसंचालक, बाबासाहेब जेजूरकर , जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. सुधाकर बोराळे संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे, तालुका कृषी अधिकारी श्रीमती बोडखे यांच्यासह महावितरण, ग्रामविकास आणि महसूल विभागाचे संबंधित अधिकारी आणि पिंपळे गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

पिंपळे गावातील काही शेतकऱ्यांच्या पीक विम्यात येत असलेल्या अडचणींची तातडीने दखल घेत, कृषी आणि महसूल विभागाने याबाबत तातडीने चालू खरीप हंगामात कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश कृषिमंत्री भरणे यांनी संबंधितांना दिले.

 


Thursday, 24 September 2026

औषधनिहाय नमुना तपासणी, उपकरण हाताळणी, तपासणीच्या निकालांचे विश्लेषण आणि नोंद व्यवस्थापन

 प्रत्यक्ष नमुन्यांवर प्रशिक्षण

औषधनिहाय नमुना तपासणी, उपकरण हाताळणी, तपासणीच्या निकालांचे विश्लेषण आणि नोंद व्यवस्थापन याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे. प्रत्येक विभागात प्रत्यक्ष नमुन्यांवर सराव केल्यास तपासणीतील अचूकता वाढण्यास मदत होईल, असे आरोग्यमंत्री आबिटकर यांनी सांगितले.

 

औषधांची गुणवत्ता तपासण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या या उपकरणांचा प्रभावी वापर करून क्षेत्रीय पातळीवर नियमित तपासणीची यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येणार आहे. गुणवत्तापूर्ण औषधांचा पुरवठा आणि नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षितता याला सर्वोच्च प्राधान्य देत औषध गुणवत्ता तपासणीची प्रक्रिया अधिक काटेकोरपणे राबविण्यात येईल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

सर्व आरोग्य संस्था राज्यस्तरीय रुग्णालय कक्षाच्या अधिनस्त

 सर्व आरोग्य संस्था राज्यस्तरीय रुग्णालय कक्षाच्या अधिनस्त असल्याने ‘काउंटरफिट ड्रग डिटेक्शन डिव्हाइस’च्या वापराबाबतचे सनियंत्रण सहसंचालक, रुग्णालय स्तरावरील कक्षामार्फत करतील. संबंधित प्राधिकरण, रुग्णालय यंत्रणा आणि खरेदी यंत्रणेने संयुक्त पथके तयार करून तपासणीची कार्यवाही अधिक प्रभावी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

आरोग्य विभागाच्या सर्व महिनाभर विशेष औषध गुणवत्ता तपासणी मोहीम

 महिनाभर विशेष तपासणी मोहीम

आरोग्य विभागाच्या सर्व आठ परिमंडळांमध्ये पुढील महिनाभर विशेष औषध गुणवत्ता तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत नव्याने प्राप्त झालेल्या औषधांसह आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध असलेल्या औषधसाठ्यातील नमुने यादृच्छिक पद्धतीने तपासण्यात येतील.

 

प्राथमिक तपासणी, नमुने पुढील तपासणीसाठी पाठविणे, पुष्टीकरण अहवाल प्राप्त झाल्यानंतरची कार्यवाही आणि त्याची नोंद ठेवणे यासाठी स्वतंत्र जबाबदाऱ्या निश्चित करण्यात येणार आहेत.

 

सर्व आरोग्य संस्था राज्यस्तरीय रुग्णालय कक्षाच्या अधिनस्त असल्याने ‘काउंटरफिट ड्रग डिटेक्शन डिव्हाइस’च्या वापराबाबतचे सनियंत्रण सहसंचालक, रुग्णालय स्तरावरील कक्षामार्फत करतील. संबंधित प्राधिकरण, रुग्णालय यंत्रणा आणि खरेदी यंत्रणेने संयुक्त पथके तयार करून तपासणीची कार्यवाही अधिक प्रभावी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

 


औषध गुणवत्ता तपासणीसाठी उपकरणांचा प्रभावी वापर करा - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश · औषधांच्या गुणवत्तेशी तडजोड नको

 औषध गुणवत्ता तपासणीसाठी उपकरणांचा प्रभावी वापर करा

- आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

·         औषधांच्या गुणवत्तेशी तडजोड नको

 

मुंबई, दि. २४ : राज्यातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण औषधे उपलब्ध करून देताना औषधांच्या गुणवत्तेशी कोणत्याही प्रकारची तडजोड करू नये. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील आरोग्य संस्थांना पुरवठा होणाऱ्या औषधांची गुणवत्ता तपासण्यासाठी ‘काउंटरफिट ड्रग डिटेक्शन डिव्हाइस’ या नावीन्यपूर्ण उपकरणाचा प्रभावी वापर करावा. तसेच औषध गुणवत्ता तपासणीसाठी प्रमाणित कार्यपद्धतीचा (एसओपी) अवलंब करून नियमित तपासणी करावी, असे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

 

आरोग्य भवन येथे औषधांच्या गुणवत्ता तपासणीसंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, आरोग्य सचिव ई. रवींद्रन, आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर, शहरी आरोग्य सेवा आयुक्त डॉ. सुनील भोकरे, आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

राज्यातील सार्वजनिक आरोग्य संस्थांना पुरवठा होणाऱ्या औषधांची गुणवत्ता तपासण्यासाठी या उपकरणाच्या वापराबाबत तज्ज्ञांच्या उपस्थितीत मूल्यांकन करण्यात आले आहे. त्यानंतर शासन निर्णयाद्वारे राज्यातील आठ परिमंडळांसाठी प्रत्येकी एक उपकरण उपलब्ध करून देण्यात आले आहे. उपसंचालक कार्यालयातील वरिष्ठ औषध निर्माण अधिकाऱ्यांचे उपकरण हाताळणीचे प्रशिक्षण महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आले आहे.

 

या पार्श्वभूमीवर प्रत्येक परिमंडळातील जिल्ह्यांसाठी औषध तपासणीचे वेळापत्रक निश्चित करून प्रत्यक्ष क्षेत्रीय तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीची कार्यवाही, त्याचे अनुपालन, तपासण्यात आलेल्या औषधांची संख्या आणि तपासणीचा सविस्तर अहवाल दर आठवड्याला सादर करावा लागणार आहे.

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राज्यभर वर्षाकाठी एक हजारांहून अधिक कार्यक्रम आयोजित

 सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राज्यभर वर्षाकाठी एक हजारांहून अधिक कार्यक्रम आयोजित केले जातात. महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे, त्याचे जतन व संवर्धन करणे आणि त्याला जागतिक स्तरावर स्थान मिळवून देणे, हा या उपक्रमांचा उद्देश असल्याचेही मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले.


 

धार्मिक अधिष्ठान लाभलेल्या गणेशोत्सवामध्ये व्यापक लोकसहभाग, कल्पकता

 सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार म्हणाले की, धार्मिक अधिष्ठान लाभलेल्या गणेशोत्सवामध्ये व्यापक लोकसहभाग, कल्पकता, नावीन्य, कलात्मकता आणि सामाजिक भान यांचा संगम दिसतो. गणेशोत्सवाच्या प्रथा-परंपरा महाराष्ट्रासह देश-विदेशात विस्तारल्या आहेत. या उत्सवाचे वैश्विक अद्वितीय सांस्कृतिक मूल्य जगासमोर मांडण्यासाठी आवश्यक व्यासपीठ निर्माण करणे गरजेचे आहे. त्याची पहिली पायरी म्हणून राज्य शासनाने गतवर्षी गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला.

 

राज्य महोत्सवाच्या माध्यमातून राज्यभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. रवींद्र नाट्य मंदिरात तीन दिवसांचा शास्त्रीय संगीत महोत्सव आयोजित करण्यात आला असून ओडिशा, अंदमान-निकोबार आणि दुबई येथेही राज्य महोत्सवाचे कार्यक्रम घेण्यात आले आहेत, अशी माहिती मंत्री ॲड. शेलार यांनी दिली.

Featured post

Lakshvedhi