Tuesday, 22 September 2026

२०० व्होल्वो बसेस एसटीच्या ताफ्यात ऑनलाईन बुकिंगपासून दर्जेदार आतिथ्य व्यवस्थेपर्यंत प्रवाशांना आधुनिक सुविधा

  २०० व्होल्वो बसेस एसटीच्या ताफ्यात

ऑनलाईन बुकिंगपासून दर्जेदार आतिथ्य व्यवस्थेपर्यंत प्रवाशांना आधुनिक सुविधा

-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

            मुंबई, दि. २० : महाराष्ट्राच्या ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत सर्वसामान्यांची विश्वासार्ह लोकवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाने आता लांब पल्ल्याच्या आरामदायी प्रवासाच्या क्षेत्रातही नवी झेप घेण्याची तयारी केली आहे. खासगी आराम बससेवांकडे वळणाऱ्या प्रवाशांना एसटीकडे आकर्षित करण्यासाठी लवकरच महामंडळाच्या ताफ्यात स्वमालकीच्या २०० अत्याधुनिक, वातानुकूलित व्होल्वो बसेस दाखल करण्यात येणार आहेत. यामध्ये सुरक्षितता, आरामदायीपणा, आधुनिक तंत्रज्ञान आणि दर्जेदार प्रवासी सेवेचा संगम या नव्या सेवेत पाहायला मिळणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच एसटी महामंडळाच्या टप्प्यामध्ये व्होल्वो बसेस समाविष्ट होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

            मंत्री सरनाईक म्हणाले की, लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी सध्या अनेक प्रवासी अधिक भाडे देऊन खासगी आराम बससेवेला पसंती देतात. वातानुकूलित सुविधा, आरामदायी आसनव्यवस्था, कमी प्रवास वेळ आणि रात्रीच्या प्रवासातील सुविधा यामुळे खासगी आराम बससेवेचा स्वतंत्र प्रवासी वर्ग निर्माण झाला आहे. या प्रवाशांना एसटीकडे आकर्षित करण्यासाठी केवळ पर्याय उपलब्ध करून न देता खासगी आराम बससेवेच्या तोडीची आधुनिक, विश्वासार्ह आणि प्रवाशांच्या अपेक्षा पूर्ण करणारी सेवा देण्याचे उद्दिष्ट एसटीने निश्चित केले आहे.

विकसित भारतासाठी राज्यांची आर्थिक क्षमता बळकट करणे आवश्यक

 विकसित भारतासाठी राज्यांची आर्थिक क्षमता बळकट करणे आवश्यक

वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल

            नवी दिल्ली, दि. १९ : विकसित भारत २०४७चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राज्यांची आर्थिक क्षमता बळकट करणे, वित्तीय शिस्त कायम ठेवणे आणि राज्यांच्या उत्पादन, पर्यटन, व्यापार व कृषी क्षेत्राला राष्ट्रीय तसेच जागतिक बाजारपेठेशी जोडणे आवश्यक आहे, अशी भूमिका राज्यमंत्री (वित्त) ॲड. आशिष जयस्वाल यांनी नवी दिल्ली येथे मांडली.

            केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या वतीने भारत मंडपम येथे १८ व १९ सप्टेंबर रोजी ‘Financing India’s Journey towards Viksit Bharat’ या विषयावर राज्यांचे वित्तमंत्री व वित्त सचिवांची दोन दिवसीय परिषद झाली. महाराष्ट्राच्या वतीने राज्यमंत्री ॲड. जयस्वाल, अपर मुख्य सचिव (वित्त) विकासचंद्र रस्तोगी आणि सचिव (वित्तीय सुधारणा) विजय वाघमारे यामध्ये सहभागी झाले.

            परिषदेत वित्त राज्यमंत्री जयस्वाल यांनी राज्यांमध्ये व्यापार-वाणिज्यासाठी सक्षम संस्थात्मक व्यवस्था, विदेशी पर्यटकांची संख्या वाढविण्यासाठी केंद्र-राज्य समन्वय आणि निर्याताभिमुख शेतीसाठी ‘Asset Crop–Liability Crop’ संकल्पना मांडली. जिल्हानिहाय निर्यातक्षम पिकांची निवड करून बाजारपेठेच्या मागणीनुसार उत्पादनाचे नियोजन करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. कृषी निर्यातीसाठी स्वतंत्र डिजिटल पोर्टल तसेच Crop-wise SOP/Export Pathway विकसित करण्याची सूचनाही त्यांनी केली.

            केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी झालेल्या चर्चेत विकसित महाराष्ट्र २०४७’, SASCI, ॲग्रीस्टॅक, शेतकरी केंद्रीत कृषी योजना, शेत-पाणंद रस्ते आणि शेतमजुरांसाठी सामाजिक सुरक्षा यांसह विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यमंत्री जयस्वाल यांनी दिली. त्यांच्या सूचनांचे सीतारामन यांनी अभिनंदन करून केंद्र स्तरावर धोरणात्मक विचार करण्याची ग्वाही दिली.

            विकसित भारतासाठी केंद्र-राज्य समन्वय, वित्तीय शिस्त, नावीन्यपूर्ण वित्तपुरवठा आणि राज्यांच्या स्थानिक सामर्थ्याला राष्ट्रीय व जागतिक बाजारपेठेशी जोडण्यावर महाराष्ट्राने या परिषदेत भर दिला.

महिला व बालकांच्या संरक्षण, पोषण, शिक्षण व सक्षमीकरणासाठीच्या विविध योजना आणि सेवांची माहिती

 महिला व बालकांच्या संरक्षण, पोषण, शिक्षण व सक्षमीकरणासाठीच्या विविध योजना आणि सेवांची माहिती

            महिला व बालकांच्या संरक्षण, पोषण, शिक्षण, सक्षमीकरण आणि पुनर्वसनासाठी महिला व बाल विकास विभागामार्फत विविध योजना व सेवा राबविण्यात येतात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, वन स्टॉप सेंटर, शक्ती सदन, आदर्श अंगणवाडी, बेबी केअर किट, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना आणि पोषण अभियान या योजनांच्या माध्यमातून महिला व बालकांना विविध स्वरूपाचे सहाय्य दिले जाते.

            अंगणवाडी सेवांद्वारे पूरक पोषण, आरोग्य तपासणी, लसीकरण, पूर्व-प्राथमिक शिक्षण तसेच पोषणविषयक मार्गदर्शन दिले जाते. महिलांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगामार्फत समुपदेशन व कायदेशीर मार्गदर्शन, तर बालकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी तक्रारींवर कार्यवाही केली जाते. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बचत गट, कौशल्यविकास आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यात येते. महिला हेल्पलाईन १५५२०९ आणि बाल हेल्पलाईन १०९८ या सुविधांबाबतही यावेळी माहिती देण्यात आली.

एकही व्यक्ती नेत्रसेवेपासून वंचित राहणार नाही

 एकही व्यक्ती नेत्रसेवेपासून वंचित राहणार नाही

- निमेश कंपानी

            जे.एम. फायनान्शियल फाऊंडेशनचे अध्यक्ष निमेश कंपानी यांनी यावेळी फाउंडेशनच्या उद्देशावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, आम्हाला शासनाशी स्पर्धा करायची नसून त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करायचे आहे. वाशिममधील एकही गरजू व्यक्ती दर्जेदार नेत्रसेवेपासून वंचित राहू नये, हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. जिल्हा प्रशासनाचे समर्पण पाहून आम्ही केवळ वाशिम जिल्ह्यावर लक्ष केंद्रित करून येथील नेत्रसेवा अधिकाधिक बळकट करण्यासाठी कटिबद्ध आहोत.

            वाशिमचे जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी जिल्ह्यातील नेत्रसेवेची सध्याची स्थिती, आवश्यक उपाययोजना आणि या भागीदारीतून साध्य होणारे अपेक्षित परिणाम याविषयी माहिती दिली.

प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये आणि गुंतवणूक:

            या सामंजस्य करारामुळे वाशिम जिल्ह्यातील वाड्या-वस्त्यांवर आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या गरजू रुग्णांना दर्जेदार नेत्रतपासणी, आवश्यक शस्त्रक्रिया आणि अत्याधुनिक उपचार सुविधा सहज उपलब्ध होतील. जे. एम. फायनान्शियल फाउंडेशन 2026 ते 2032 या कालावधीसाठी जिल्ह्यात गुंतवणूक आणि सहकार्य करणार आहे. या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पहिल्या वर्षी फाउंडेशनतर्फे दीड  कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.

            या कराराअंतर्गत कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या माध्यमातून वाशिम जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आधुनिक आणि सुसज्ज करण्यावर भर दिला जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा, उपजिल्हा रुग्णालयांसाठी अद्ययावत वैद्यकीय उपकरणे पुरवणे, प्राथमिक आरोग्य केंद्रांचा विकास करणे आणि आपत्कालीन आरोग्य सुविधा बळकट करणे या बाबींचा समावेश असेल.या सकारात्मक आणि लोकाभिमुख करारामुळे वाशिम जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात एक नवी क्रांती घडणार असून हजारो रुग्णांच्या जीवनात प्रकाशाची नवी पहाट येणार आहे.

            यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव ई. रवींद्रन, आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर, जे. एम. फायनान्शिअल फाऊंडेशनचे अध्यक्ष निमेश कंपानी, जे. एम. फायनान्शियल होम लोन्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष शेठ आणि वाशिमचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल कावरखे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक पुरी आदी उपस्थित होते.

महिला व बालकांच्या संरक्षण, पोषण, शिक्षण व सक्षमीकरणासाठीच्या विविध योजना आणि सेवांची माहिती

 महिला व बालकांच्या संरक्षण, पोषण, शिक्षण व सक्षमीकरणासाठीच्या विविध योजना आणि सेवांची माहिती

            महिला व बालकांच्या संरक्षण, पोषण, शिक्षण, सक्षमीकरण आणि पुनर्वसनासाठी महिला व बाल विकास विभागामार्फत विविध योजना व सेवा राबविण्यात येतात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, वन स्टॉप सेंटर, शक्ती सदन, आदर्श अंगणवाडी, बेबी केअर किट, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना आणि पोषण अभियान या योजनांच्या माध्यमातून महिला व बालकांना विविध स्वरूपाचे सहाय्य दिले जाते.

            अंगणवाडी सेवांद्वारे पूरक पोषण, आरोग्य तपासणी, लसीकरण, पूर्व-प्राथमिक शिक्षण तसेच पोषणविषयक मार्गदर्शन दिले जाते. महिलांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगामार्फत समुपदेशन व कायदेशीर मार्गदर्शन, तर बालकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी तक्रारींवर कार्यवाही केली जाते. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बचत गट, कौशल्यविकास आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यात येते. महिला हेल्पलाईन १५५२०९ आणि बाल हेल्पलाईन १०९८ या सुविधांबाबतही यावेळी माहिती देण्यात आली.

            गणेशोत्सवाच्या निमित्ताने नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येत असल्याने त्याच ठिकाणी शासकीय योजनांची माहिती थेट पोहोचविण्याचा हा अभिनव उपक्रम नागरिकांसाठी उपयुक्त ठरत असून, त्यांच्या प्रश्नांना संबंधित अधिकाऱ्यांकडून तत्काळ मार्गदर्शन मिळत असल्याने लोकसंवादउपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या प्रमुख योजनांबाबत जनजागृती

 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या प्रमुख योजनांबाबत जनजागृती

            सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती, नवबौद्ध, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तृतीयपंथीय तसेच इतर दुर्बल घटकांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक उन्नतीसाठी विविध योजना राबविण्यात येतात.  मॅट्रिकोत्तर, सावित्रीबाई फुले व राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्तीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य दिले जाते. स्वाधार व शासकीय वसतिगृह योजनांतून निवास व आवश्यक सुविधा उपलब्ध होतात. रमाई आवास योजनेतून घरकुलासाठी आर्थिक सहाय्य, तर मुख्यमंत्री वयोश्री व संजय गांधी निराधार योजनेतून ज्येष्ठ नागरिक आणि निराधारांना आधार दिला जातो.

या योजनांद्वारे शिक्षण, निवास, आर्थिक सहाय्य व सामाजिक सुरक्षेला बळ देत दुर्बल घटकांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती लोकसंवाद अभियान अंतर्गत देण्यात आली.

एकही व्यक्ती नेत्रसेवेपासून वंचित राहणार नाहीजे.एम. फायनान्शियल फाऊंडेशन

 एकही व्यक्ती नेत्रसेवेपासून वंचित राहणार नाही

- निमेश कंपानी

            जे.एम. फायनान्शियल फाऊंडेशनचे अध्यक्ष निमेश कंपानी यांनी यावेळी फाउंडेशनच्या उद्देशावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, आम्हाला शासनाशी स्पर्धा करायची नसून त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करायचे आहे. वाशिममधील एकही गरजू व्यक्ती दर्जेदार नेत्रसेवेपासून वंचित राहू नये, हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. जिल्हा प्रशासनाचे समर्पण पाहून आम्ही केवळ वाशिम जिल्ह्यावर लक्ष केंद्रित करून येथील नेत्रसेवा अधिकाधिक बळकट करण्यासाठी कटिबद्ध आहोत.

            वाशिमचे जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी जिल्ह्यातील नेत्रसेवेची सध्याची स्थिती, आवश्यक उपाययोजना आणि या भागीदारीतून साध्य होणारे अपेक्षित परिणाम याविषयी माहिती दिली.

प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये आणि गुंतवणूक:

            या सामंजस्य करारामुळे वाशिम जिल्ह्यातील वाड्या-वस्त्यांवर आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या गरजू रुग्णांना दर्जेदार नेत्रतपासणी, आवश्यक शस्त्रक्रिया आणि अत्याधुनिक उपचार सुविधा सहज उपलब्ध होतील. जे. एम. फायनान्शियल फाउंडेशन 2026 ते 2032 या कालावधीसाठी जिल्ह्यात गुंतवणूक आणि सहकार्य करणार आहे. या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पहिल्या वर्षी फाउंडेशनतर्फे दीड  कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.

            या कराराअंतर्गत कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या माध्यमातून वाशिम जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आधुनिक आणि सुसज्ज करण्यावर भर दिला जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा, उपजिल्हा रुग्णालयांसाठी अद्ययावत वैद्यकीय उपकरणे पुरवणे, प्राथमिक आरोग्य केंद्रांचा विकास करणे आणि आपत्कालीन आरोग्य सुविधा बळकट करणे या बाबींचा समावेश असेल.या सकारात्मक आणि लोकाभिमुख करारामुळे वाशिम जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात एक नवी क्रांती घडणार असून हजारो रुग्णांच्या जीवनात प्रकाशाची नवी पहाट येणार आहे.

Featured post

Lakshvedhi