Tuesday, 22 September 2026

वाशिम जिल्हा होणार ‘मोतीबिंदू मुक्त जे.एम. फायनान्शिअल फाउंडेशनसोबत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार ’

 वाशिम जिल्हा होणार मोतीबिंदू मुक्त

·         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जे.एम. फायनान्शिअल फाउंडेशनसोबत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार

            मुंबई,दि.21: वाशिम जिल्ह्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागातील नागरिकांना आता अत्यंत दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध होणार असून जिल्ह्याला मोतीबिंदू मुक्तकरण्याच्या दिशेने राज्य शासनाने एक मोठे पाऊल उचलले आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत वाशिम जिल्हा प्रशासन आणि जे. एम. फायनान्शिअल फाऊंडेशनयांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या ऐतिहासिक करारावर वाशिम प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर आणि जे.एम. फायनान्शियल फाउंडेशनच्या वतीने कार्यकारी संचालक पूजा दवे यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

            यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, गेली अनेक वर्षे आपण 'मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र' घडविण्याचे स्वप्न पाहत आहोत. प्रशासनाच्या प्रयत्नांना जेव्हा जे. एम. फायनान्शिअल फाऊंडेशनसारख्या जबाबदार संस्थेची साथ मिळते, तेव्हा विकासाचे आणि सेवेचे हे प्रयत्न अनेक पटींनी वाढतात. शासनाला समांतर व्यवस्था उभी न करता, शासनाच्याच यंत्रणेला बळ देण्याचा फाऊंडेशनचा विचार अत्यंत स्तुत्य आणि विचारपूर्वक आहे. या करारामुळे वाशिम जिल्ह्यालाच नव्हे, तर भविष्यात सार्वजनिक-खासगी भागीदारीतून काम करण्यासाठी संपूर्ण राज्याला एक उत्तम 'मॉडेल' मिळेल.

महाराष्ट्रातील युवक –युवतींना परदेशातील रोजगार संधी सुलभ व्हाव्यात आणि भाषिक अडचणी दूर व्हाव्यात यासाठी

 युवक युवतींना भाषा प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार

            महाराष्ट्रातील युवक –युवतींना परदेशातील रोजगार संधी सुलभ व्हाव्यात आणि भाषिक अडचणी दूर व्हाव्यात यासाठी केंद्र शासनाचा डिजिटल इंडिया भाषिणी, मित्रा आणि महिमा  यांच्यात सामंजस्य करार झाला. भाषांतर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उमेदवारांना परदेशी आणि व्यवसायनिहाय भाषांचे मोफत व सुलभ प्रशिक्षण मिळणार असून, या प्रायोगिक प्रकल्पाचा औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि तंत्रनिकेतनमधील विद्यार्थ्यांना लाभ होईल.

            राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल म्हणाले की, आंतरराष्ट्रीय कामगार गतिशीलता ही केवळ मनुष्यबळाच्या स्थलांतराची प्रक्रिया नसून कौशल्य, गुंतवणूक, प्रवासी भारतीय समुदाय आणि जागतिक बाजारपेठेला जोडणारी आर्थिक भागीदारी आहे. मुंबईतील परदेशी वाणिज्य दूतावासांचे नेटवर्क, उद्योग, विद्यापीठे आणि कौशल्य विकास संस्थांचा समन्वय साधून महाराष्ट्रातील प्रतिभेला जागतिक संधींशी जोडण्यात येईल.

            कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, जागतिक रोजगारासाठी आवश्यक कौशल्य आणि भाषा प्रशिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना संबंधित देशातील स्थानिक संस्कृतीशी समरस होण्यासाठी सक्षम करण्यावर शासन भर देत आहे. परदेशात जाणारे कामगार महाराष्ट्र आणि संबंधित देशांमधील मैत्री अधिक दृढ करणारे दूत म्हणूनही भूमिका बजावतील.

देशनिहाय स्किल पासपोर्ट, अद्ययावत प्रशिक्षण आणि सुरक्षित भरती प्रक्रियेवर राज्य शासनाचा भर; महाराष्ट्रासाठी जागतिक कार्यबल गतीशिलता धोरण २०२६ जाहीर

 देशनिहाय स्किल पासपोर्ट, अद्ययावत प्रशिक्षण आणि सुरक्षित भरती

प्रक्रियेवर राज्य शासनाचा भर;

महाराष्ट्रासाठी जागतिक कार्यबल गतीशिलता धोरण २०२६ जाहीर

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

            मुंबई, दि. २१ : जागतिक रोजगाराच्या बदलत्या गरजांनुसार महाराष्ट्रातील युवक-युवतींना कौशल्य आणि भाषा प्रशिक्षण देऊन आंतरराष्ट्रीय रोजगारासाठी सक्षम करण्यात येत आहे. विविध देशांची कुशल मनुष्यबळाची गरज ओळखून देशनिहाय स्किल पासपोर्टतयार करावा, औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि अन्य प्रशिक्षण संस्थांनी अभ्यासक्रम अद्ययावत करावा. तसेच महाराष्ट्रासाठी जागतिक कार्यबल गतीशिलता धोरणातंर्गत परदेशातील रोजगारासाठी सुरक्षित भरती व्यवस्था विकसित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

            सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित आंतरराष्ट्रीय कामगार गतिशीलतेवरील एकदिवसीय उच्चस्तरीय परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा), राजशिष्टाचार विभाग, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि महाराष्ट्र एजन्सी फॉर होलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी अँड ॲडव्हान्समेंट (महिमा) यांनी संयुक्तपणे या परिषदेचे आयोजन केले होते.

            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जागतिक स्तरावरील बदलती लोकसंख्या आणि वाढते वृद्धत्व यामुळे कुशल मनुष्यबळाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. भारतातील युवा मनुष्यबळाची क्षमता लक्षात घेऊन जागतिक मागणीशी कुशल मनुष्यबळाची प्रभावी सांगड घालावी लागेल. त्यातून सर्क्युलर मोबिलिटी ऑफ टॅलेंटही संकल्पना अधिक सक्षम होईल आणि महाराष्ट्र या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावेल.

२८ देशांसोबत कामगार गतिशीलतेसंदर्भात करार

            भारताने सुमारे २८ देशांसोबत कामगार गतिशीलतेसंदर्भात करार केले आहेत. या देशांमध्ये अभियांत्रिकी, आरोग्यसेवा, बांधकाम आणि विविध तांत्रिक क्षेत्रांतील कुशल मनुष्यबळाला मोठी मागणी आहे. जागतिक आर्थिक मंचाच्या फ्युचर ऑफ जॉब्स रिपोर्ट २०२५नुसार  २०३० पर्यंत जगभरात सुमारे १७ कोटी नवीन रोजगार निर्माण होतील, तर सुमारे ९ कोटी २० लाख रोजगार विस्थापित होण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय कार्यबल गतिशीलतेच्या क्षेत्रात पुढाकार घेईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

            विविध देशांच्या मनुष्यबळ विषयक गरजांची माहिती प्रशिक्षण संस्थांपर्यंत पोहोचवण्यासाठी भरती संस्थांच्या अनुभवाचा उपयोग करावा. पारंपरिक प्रशिक्षणासह डिजिटल आणि प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा संमिश्र वापर करावा. ऑनलाइन भाषा प्रशिक्षणासाठी निश्चित कालावधी, किमान चाचण्या तसेच डिजिटल भाषांतर आणि इंटरप्रिटेशन साधनांचा उपयोग करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

            राज्य शासनाच्या धोरण मसुद्यात कौशल्य विकास, जागतिक मागणीनुसार प्रशिक्षण, भाषा प्रशिक्षण, प्रमाणपत्र, कागदपत्रांसाठी सहाय्य आणि प्रस्थानपूर्व मार्गदर्शनाला प्राधान्य दिले आहे. परदेशातून परतलेल्या कुशल मनुष्यबळाला राज्यातील उद्योगांशी जोडण्यावरही शासन भर देईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

स्वच्छतेचा संदेश घराघरांत पोहोचविण्याचा संकल्प

 स्वच्छतेचा संदेश घराघरांत पोहोचविण्याचा संकल्प

सेवा संकल्प अभियानअंतर्गत राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करण्यासोबतच स्वच्छ शाळा, सुंदर परिसर आणि कचऱ्याचे योग्य वर्गीकरण याबाबत जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या मोहिमेतून करण्यात आला.

0000

सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत मुंबईतील मनपा शाळांमध्ये ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीम

 सेवा संकल्प अभियानअंतर्गत मुंबईतील मनपा शाळांमध्ये स्वच्छता ही सेवामोहीम

 

मुंबई, दि. २१ : मुंबई शहर जिल्ह्यामध्ये सेवा संकल्प अभियानअंतर्गत घोघारी मोहल्ला, मस्जिद स्ट्रीट येथील अब्दुल कादिर हाफिजका मनपा उर्दू शाळा तसेच कुंभारवाडा येथील गुलालवाडी मनपा हिंदी शाळेत स्वच्छता ही सेवामोहीम राबविण्यात आली.

जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या निर्देशानुसार या मोहिमेचे नियोजन करण्यात आले.

सीविभागाचे सहायक आयुक्त सुनील माने यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या मोहिमेत महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने दोन्ही शाळांमध्ये स्वच्छता करण्यात आली. तसेच शालेय परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले. या उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या सवयी, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन आणि ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. दैनंदिन जीवनात स्वच्छतेचे महत्व जाणून घेत विद्यार्थ्यांनीही परिसर स्वच्छ राखण्याचा संदेश आत्मसात केला.

लोकसंवाद २०२६’ उपक्रमासाठी माहिती व जनसंपर्क

 विविध विभागांचा समन्वय

लोकसंवाद २०२६उपक्रमासाठी माहिती व जनसंपर्क विभागासोबत समाजकल्याण, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, महसूल आदी विभागांच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने सहभाग घेतला. विभागीय संपर्क अधिकारी ब्रिजकिशोर झंवर आणि संजय ओरके यांनी विविध गणेश मंडळांना भेट देऊन लोकसंवाद उपक्रमाचे समन्वयन केले.

 

यावेळी ग्राम महसूल अधिकारी घोषिता गोसावी, समाजकल्याण कार्यालयाच्या अतिरिक्त प्रकल्प अधिकारी नंदना गजभिये; तालुका समन्वयक आनंदा कांबळे, समतादूत सिद्धार्थ शिरसाट आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे जिल्हा समन्वयक परेश प्रभाकर अपंडकर यांनी नागरिकांशी संवाद साधला.

 

गणेशोत्सवाच्या उत्सवी वातावरणाला शासकीय योजनांच्या जनजागृतीची जोड देत लोकसंवाद २०२६च्या माध्यमातून शासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सार्वजनिक उत्सवाच्या व्यासपीठाचा उपयोग लोककल्याणकारी योजनांची माहिती, उपलब्ध सेवा आणि रोजगाराच्या संधी नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी होत असून, गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनीही या उपक्रमाला सहकार्य केले.

000

२९ सप्टेंबरच्या रोजगार महाकुंभ मेळाव्याची माहिती

 २९ सप्टेंबरच्या रोजगार महाकुंभ मेळाव्याची माहिती

लोकसंवाद उपक्रमादरम्यान २९ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबई उपनगर जिल्ह्यात आयोजित करण्यात येणाऱ्या रोजगार महाकुंभ मेळावाचीही माहिती युवक आणि नागरिकांना देण्यात आली. रोजगाराच्या संधी, कौशल्य विकास, रोजगार मार्गदर्शन आणि उद्योजकतेशी संबंधित उपलब्ध संधींचा लाभ घेण्यासाठी युवकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

 

विशेषतः विद्यार्थी आणि रोजगाराच्या शोधात असलेल्या युवकांपर्यंत रोजगार मेळाव्याची माहिती पोहोचविण्यावर भर देण्यात आला. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध संधींची माहिती देत युवकांना योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी संवाद साधला.

Featured post

Lakshvedhi