Monday, 21 September 2026

माहिती व जनसंपर्क विभागाच्या ‘लोकसंवाद’ अभियानास गणेशोत्सव मंडळांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांना विविध शासकीय योजनांची अधिकाऱ्यांकडून थेट माहिती

 माहिती व जनसंपर्क विभागाच्या लोकसंवादअभियानास

गणेशोत्सव मंडळांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

नागरिकांना विविध शासकीय योजनांची अधिकाऱ्यांकडून थेट माहिती 

 

            मुंबई, दि. २० : शासकीय योजनांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाच्यावतीने राज्यभर लोकसंवादअभियान राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत विविध शासकीय योजनांची माहिती मुंबईतील गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडून नागरिकांना थेट  देण्यात येत आहे. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, शुक्रवारी परेल परिसरातील विविध गणेशोत्सव मंडळांमध्ये अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या योजनांची माहिती देण्यात आली.

            यावेळी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या उपनियंत्रक शिधावाटप (परळ), माधुरी शिंदे, पुरवठा अधिकारी राजेंद्र पवार, आकाश निंबाळकर, सुनील कदम यांच्यासह गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, प्रतिनिधी आणि भाविक उपस्थित होते. सुरुवातीला माहिती व जनसंपर्क विभागाच्या वरिष्ठ सहायक संचालक वंदना थोरात यांनी लोकसंवादउपक्रमाचा उद्देश स्पष्ट करून अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या विविध लोकोपयोगी योजनांची माहिती दिली.

महाराष्ट्रातील तसेच आंतरराज्य मार्गांवर खासगी आराम बससेवेला मोठी मागणी असलेल्या मार्गांचा सर्वंकष

 मागणी असलेल्या मार्गांचा सर्वंकष अभ्यास

            महाराष्ट्रातील तसेच आंतरराज्य मार्गांवर खासगी आराम बससेवेला मोठी मागणी असलेल्या मार्गांचा सर्वंकष अभ्यास करण्यात येणार आहे. प्रवाशांची संख्या, प्रवासाची मागणी, उपलब्ध सेवा, मार्गाचे अंतर, प्रवासाचा कालावधी आणि आर्थिक व्यवहार्यता यांचा विचार करून स्पर्धात्मक मार्गांचे सर्वेक्षण केले जाईल. त्यानंतर नव्या व्होल्वो आणि शयनयान बसेससाठी मार्ग निश्चित करण्यात येतील.

समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या मागास भागात विकासाला आवश्यक असलेल्या सुविधा निर्माण

 समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या मागास भागात विकासाला आवश्यक असलेल्या सुविधा निर्माण होत असून जेएनपीटी बंदरासोबतच वाढवण पोर्ट बंदर हे जगातील पहिल्या दहा बंदरांमध्ये समाविष्ट होणार आहे, येथून डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरद्वारे गडचिरोली पर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे. यामुळे लॉजिस्टिक खर्च ६० टक्के पेक्षा कमी होईल आणि राज्याच्या विकासाला मोठी संधी उपलब्ध होणार आहे. वाढवण बंदर येत्या तीन वर्षात पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त करताना वाढवण हे ग्रीन पोर्ट असून सर्वात सक्षम राहणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

येत्या दहा वर्षात मुंबई झोपडपट्टीमुक्त होईल,

 मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याच्या संदर्भात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, समूह विकास करण्याच्या दृष्टीने येथील रहिवाशांना पर्यायी घर देणे अथवा तीन वर्षाचे भाडे देत असल्यामुळे जागा मोकळी होण्यास मदत होत आहे येत्या दहा वर्षात मुंबई झोपडपट्टीमुक्त होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 येत्या पाच वर्षात मुंबईचा चेहरा बदललेला असेल असा विश्वास व्यक्त करताना मुख्यमंत्री म्हणाले की, वांद्रे वर्सोवा मार्ग २०२८ पर्यंत तर वर्सोवा ते भाईंदर नॉर्थ पोस्टल रोड मार्च २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष आहे. मुंबईतील ६० टक्के प्रवाशांसाठी वेस्टन एक्सप्रेसला एक पूर्णपणे सिग्नल फ्री समांतर मार्ग तयार केला जात आहे. अवघ्या २३ किलोमीटरसाठी लागणारा दीड तासाचा वेळ या बोगद्यामुळे १५ ते १७ मिनिटांवर येणार आहे, हे काम पुढील चार वर्षात पूर्ण होईल.

 

मोबाईलवरून तिकीट बुकिंग; खासगी ॲपवरही आरक्षणाची सुविधा

 मोबाईलवरून तिकीट बुकिंग; खासगी ॲपवरही आरक्षणाची सुविधा

            नव्या आराम बससेवेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रवाशांना डिजिटल पद्धतीने सहज आरक्षण करता येणार आहे. एसटीच्या अधिकृत ऑनलाईन आरक्षण व्यवस्थेबरोबरच खासगी डिजिटल ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मवरूनही या बसेसचे तिकीट आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा महामंडळाचा मानस आहे. त्यामुळे प्रवाशांना बसस्थानकावर येऊन तिकीट काढण्याची आवश्यकता राहणार नाही. मोबाईलवरून बसची वेळ, मार्ग आणि उपलब्ध आसनांची माहिती घेऊन घरबसल्या आरक्षण करता येणार आहे. डिजिटल तिकीट प्रणालीमुळे एसटीची आराम बससेवा आधुनिक प्रवासी वाहतूक व्यवस्थेशी अधिक प्रभावीपणे जोडली जाणार आहे.

अत्याधुनिक २०० व्होल्वो बसेस एसटीच्या ताफ्यात ऑनलाईन बुकिंगपासून दर्जेदार आतिथ्य व्यवस्थेपर्यंत प्रवाशांना आधुनिक सुविधा

 अत्याधुनिक २०० व्होल्वो बसेस एसटीच्या ताफ्यात

ऑनलाईन बुकिंगपासून दर्जेदार आतिथ्य व्यवस्थेपर्यंत प्रवाशांना आधुनिक सुविधा

-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

 

            मुंबई, दि. २० : महाराष्ट्राच्या ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत सर्वसामान्यांची विश्वासार्ह लोकवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाने आता लांब पल्ल्याच्या आरामदायी प्रवासाच्या क्षेत्रातही नवी झेप घेण्याची तयारी केली आहे. खासगी आराम बससेवांकडे वळणाऱ्या प्रवाशांना एसटीकडे आकर्षित करण्यासाठी लवकरच महामंडळाच्या ताफ्यात स्वमालकीच्या २०० अत्याधुनिक, वातानुकूलित व्होल्वो बसेस दाखल करण्यात येणार आहेत. यामध्ये सुरक्षितता, आरामदायीपणा, आधुनिक तंत्रज्ञान आणि दर्जेदार प्रवासी सेवेचा संगम या नव्या सेवेत पाहायला मिळणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच एसटी महामंडळाच्या टप्प्यामध्ये व्होल्वो बसेस समाविष्ट होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

            मंत्री सरनाईक म्हणाले की, लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी सध्या अनेक प्रवासी अधिक भाडे देऊन खासगी आराम बससेवेला पसंती देतात. वातानुकूलित सुविधा, आरामदायी आसनव्यवस्था, कमी प्रवास वेळ आणि रात्रीच्या प्रवासातील सुविधा यामुळे खासगी आराम बससेवेचा स्वतंत्र प्रवासी वर्ग निर्माण झाला आहे. या प्रवाशांना एसटीकडे आकर्षित करण्यासाठी केवळ पर्याय उपलब्ध करून न देता खासगी आराम बससेवेच्या तोडीची आधुनिक, विश्वासार्ह आणि प्रवाशांच्या अपेक्षा पूर्ण करणारी सेवा देण्याचे उद्दिष्ट एसटीने निश्चित केले आहे.

दिवसा आरामदायी प्रवास, रात्री शयनयानाची सुविधा

            २५० किलोमीटरपेक्षा अधिक अंतराच्या किमान पाच ते सहा तासांच्या प्रवासासाठी आरामदायी ४५ आसनी बसेस, तर रात्रीच्या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ३० किंवा ४५ शयनयान क्षमतेच्या बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे दिवसा तसेच रात्रीच्या प्रवाशांना त्यांच्या गरजेनुसार प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

लालपरी’चा आरामदायी प्रवासाचा नवा अध्याय

 लालपरीचा आरामदायी प्रवासाचा नवा अध्याय

            ‘प्रवाशांच्या सेवेसाठीहे घोषवाक्य अधिक व्यापक आणि आधुनिक स्वरूपात प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. एसटी महामंडळाची ताकद म्हणजे राज्याच्या कानाकोपऱ्यातील विस्तृत जाळे आणि प्रवाशांचा असलेला विश्वास. या विश्वासाला आधुनिक सुविधा, डिजिटल आरक्षण व्यवस्था आणि दर्जेदार आतिथ्यसेवेची जोड देऊन लांब पल्ल्याच्या प्रवासी सेवेत नवे मानदंड निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, असे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

            नव्या व्होल्वो बसेसमुळे एसटीच्या सेवेला आधुनिकतेची जोड मिळणार असून, आरामदायी, सुरक्षित, विश्वासार्ह आणि डिजिटल सुविधा असलेला प्रवास प्रवाशांसमोर उपलब्ध होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान, दर्जेदार सुविधा आणि एसटीवरील विश्वास यांच्या बळावर लांब पल्ल्याच्या प्रवासी सेवेत लालपरीआता नव्या दमाने, नव्या रूपात आणि नव्या अनुभवासह सज्ज होत आहे.

Featured post

Lakshvedhi