Monday, 21 September 2026

येत्या दहा वर्षात मुंबई झोपडपट्टीमुक्त होईल,

 मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याच्या संदर्भात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, समूह विकास करण्याच्या दृष्टीने येथील रहिवाशांना पर्यायी घर देणे अथवा तीन वर्षाचे भाडे देत असल्यामुळे जागा मोकळी होण्यास मदत होत आहे येत्या दहा वर्षात मुंबई झोपडपट्टीमुक्त होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 येत्या पाच वर्षात मुंबईचा चेहरा बदललेला असेल असा विश्वास व्यक्त करताना मुख्यमंत्री म्हणाले की, वांद्रे वर्सोवा मार्ग २०२८ पर्यंत तर वर्सोवा ते भाईंदर नॉर्थ पोस्टल रोड मार्च २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष आहे. मुंबईतील ६० टक्के प्रवाशांसाठी वेस्टन एक्सप्रेसला एक पूर्णपणे सिग्नल फ्री समांतर मार्ग तयार केला जात आहे. अवघ्या २३ किलोमीटरसाठी लागणारा दीड तासाचा वेळ या बोगद्यामुळे १५ ते १७ मिनिटांवर येणार आहे, हे काम पुढील चार वर्षात पूर्ण होईल.

 

मोबाईलवरून तिकीट बुकिंग; खासगी ॲपवरही आरक्षणाची सुविधा

 मोबाईलवरून तिकीट बुकिंग; खासगी ॲपवरही आरक्षणाची सुविधा

            नव्या आराम बससेवेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रवाशांना डिजिटल पद्धतीने सहज आरक्षण करता येणार आहे. एसटीच्या अधिकृत ऑनलाईन आरक्षण व्यवस्थेबरोबरच खासगी डिजिटल ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मवरूनही या बसेसचे तिकीट आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा महामंडळाचा मानस आहे. त्यामुळे प्रवाशांना बसस्थानकावर येऊन तिकीट काढण्याची आवश्यकता राहणार नाही. मोबाईलवरून बसची वेळ, मार्ग आणि उपलब्ध आसनांची माहिती घेऊन घरबसल्या आरक्षण करता येणार आहे. डिजिटल तिकीट प्रणालीमुळे एसटीची आराम बससेवा आधुनिक प्रवासी वाहतूक व्यवस्थेशी अधिक प्रभावीपणे जोडली जाणार आहे.

अत्याधुनिक २०० व्होल्वो बसेस एसटीच्या ताफ्यात ऑनलाईन बुकिंगपासून दर्जेदार आतिथ्य व्यवस्थेपर्यंत प्रवाशांना आधुनिक सुविधा

 अत्याधुनिक २०० व्होल्वो बसेस एसटीच्या ताफ्यात

ऑनलाईन बुकिंगपासून दर्जेदार आतिथ्य व्यवस्थेपर्यंत प्रवाशांना आधुनिक सुविधा

-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

 

            मुंबई, दि. २० : महाराष्ट्राच्या ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत सर्वसामान्यांची विश्वासार्ह लोकवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाने आता लांब पल्ल्याच्या आरामदायी प्रवासाच्या क्षेत्रातही नवी झेप घेण्याची तयारी केली आहे. खासगी आराम बससेवांकडे वळणाऱ्या प्रवाशांना एसटीकडे आकर्षित करण्यासाठी लवकरच महामंडळाच्या ताफ्यात स्वमालकीच्या २०० अत्याधुनिक, वातानुकूलित व्होल्वो बसेस दाखल करण्यात येणार आहेत. यामध्ये सुरक्षितता, आरामदायीपणा, आधुनिक तंत्रज्ञान आणि दर्जेदार प्रवासी सेवेचा संगम या नव्या सेवेत पाहायला मिळणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच एसटी महामंडळाच्या टप्प्यामध्ये व्होल्वो बसेस समाविष्ट होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

            मंत्री सरनाईक म्हणाले की, लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी सध्या अनेक प्रवासी अधिक भाडे देऊन खासगी आराम बससेवेला पसंती देतात. वातानुकूलित सुविधा, आरामदायी आसनव्यवस्था, कमी प्रवास वेळ आणि रात्रीच्या प्रवासातील सुविधा यामुळे खासगी आराम बससेवेचा स्वतंत्र प्रवासी वर्ग निर्माण झाला आहे. या प्रवाशांना एसटीकडे आकर्षित करण्यासाठी केवळ पर्याय उपलब्ध करून न देता खासगी आराम बससेवेच्या तोडीची आधुनिक, विश्वासार्ह आणि प्रवाशांच्या अपेक्षा पूर्ण करणारी सेवा देण्याचे उद्दिष्ट एसटीने निश्चित केले आहे.

दिवसा आरामदायी प्रवास, रात्री शयनयानाची सुविधा

            २५० किलोमीटरपेक्षा अधिक अंतराच्या किमान पाच ते सहा तासांच्या प्रवासासाठी आरामदायी ४५ आसनी बसेस, तर रात्रीच्या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ३० किंवा ४५ शयनयान क्षमतेच्या बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे दिवसा तसेच रात्रीच्या प्रवाशांना त्यांच्या गरजेनुसार प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

लालपरी’चा आरामदायी प्रवासाचा नवा अध्याय

 लालपरीचा आरामदायी प्रवासाचा नवा अध्याय

            ‘प्रवाशांच्या सेवेसाठीहे घोषवाक्य अधिक व्यापक आणि आधुनिक स्वरूपात प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. एसटी महामंडळाची ताकद म्हणजे राज्याच्या कानाकोपऱ्यातील विस्तृत जाळे आणि प्रवाशांचा असलेला विश्वास. या विश्वासाला आधुनिक सुविधा, डिजिटल आरक्षण व्यवस्था आणि दर्जेदार आतिथ्यसेवेची जोड देऊन लांब पल्ल्याच्या प्रवासी सेवेत नवे मानदंड निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, असे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

            नव्या व्होल्वो बसेसमुळे एसटीच्या सेवेला आधुनिकतेची जोड मिळणार असून, आरामदायी, सुरक्षित, विश्वासार्ह आणि डिजिटल सुविधा असलेला प्रवास प्रवाशांसमोर उपलब्ध होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान, दर्जेदार सुविधा आणि एसटीवरील विश्वास यांच्या बळावर लांब पल्ल्याच्या प्रवासी सेवेत लालपरीआता नव्या दमाने, नव्या रूपात आणि नव्या अनुभवासह सज्ज होत आहे.

उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी

 देशातील सर्वात मोठी सोलर इकोसिस्टीम नागपूरात

उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांचा उद्योजकांसोबत संवाद

 

नागपूर दि. २0 : देशातील सर्वात मोठी सोलर मॉडेल इकोसिस्टीम नागपूर येथे आकार घेत आहे. येत्या दहा वर्षात नागपूर हे सोलर इकोसिस्टीमचे हब होणार आहे, त्यामुळे उद्योजकांनी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

 अतिरिक्त बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रातील अवादा समूहाला  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली तसेच सोलर मॉडेल निर्मितीची  पहाणी केली, त्यानंतर उद्योजकांशी संवाद साधला.

 अवादा उद्योग समूहाचे संस्थापक व अध्यक्ष विनीत मित्तल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष मुलाखत घेतली, यावेळी  राज्यातील पायाभूत सुविधा औद्योगिक विकास आणि मुंबईच्या भविष्यातील बदलांवर उद्योजकांसोबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी संवाद साधला.

 नवीन नागपूरच्या प्रकल्पाविषयी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, येथे स्मार्ट इंडस्ट्रीसाठी इकोसिस्टीम तयार करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी पन्नास टक्के पेक्षा जागा अधिकृत झाली असून गुंतवणुकीलाही प्रोत्साहन मिळत आहे. देशातील पहिले सोलर मॉडेल अतिरिक्त बुटीबोरी क्षेत्रात तयार होत असून अवादा समूहाला त्यांच्या प्रकल्पाच्या विस्तारासाठी  २५० एकर जागेची आवश्यकता असून ती देण्याची घोषणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी केली. अतिरिक्त बुटीबोरी क्षेत्रात उद्योगांसाठी अधिगृहीत केलेल जमीन संपली असून  तिसरी अतिरिक्त बुटीबोरी औद्योगिक वसाहत तयार करावयाची आहे, तसेच वर्धा जिल्ह्यातील नवीन औद्योगिक क्षेत्रासाठी भूसंपादन सुरू असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

 अवादा हा सोलर मॉडल बनवणारा सर्वात मोठा सुपर उद्योग असून, डव्हान्स इंटिग्रेशनमुळे स्मार्ट मॉड्युलची निर्मिती होत आहे.  भूमिपूजनानंतर वेगाने प्रकल्प पूर्ण झाला असून  आज पाच हजार कामगार येथे काम करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

      

गौरी गणपती चे सणाला, राकेश शेलार, लक्षवेधी पत्रकार दापोली


 

गणपती महोत्सव लोकसंगीत, निखील भगत, मुरुड


 

Featured post

Lakshvedhi