Thursday, 13 August 2026

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे काम अत्यंत संवेदनशील असून, प्राधिकरणाने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचा व्यापक सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय परिणाम

 महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे काम अत्यंत संवेदनशील असून, प्राधिकरणाने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचा व्यापक सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय परिणाम लक्षात घेणे आवश्यक आहे. कोणाला काय वाटतेयापेक्षा निर्णयाची व्याप्ती, त्याचे संभाव्य परिणाम आणि क्षेत्रीय वास्तव लक्षात घेऊन काम झाले पाहिजे, असे मंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

जलक्षेत्रातील स्थानिक समस्या आणि क्षेत्रीय विषमता समजून घेण्यासाठी नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर यांसह विविध भागांत प्रादेशिक कार्यशाळा आयोजित करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. अशा कार्यशाळांमधून शेतकरी, अधिकारी आणि संबंधित घटकांचे प्रश्न प्रत्यक्ष जाणून घेऊन स्थानिक गरजांनुसार उपाययोजना करणे शक्य होईल, असे त्यांनी सांगित

१५ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट २०२६ या जलसंधारण सप्ताह दरम्यान राज्यातील सर्व जिल्ह्यात मृद व जलसंवर्धन ‘रील्स स्पर्धाचे ‘आयोजन

 १५ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट २०२६ या जलसंधारण सप्ताह दरम्यान राज्यातील सर्व जिल्ह्यात मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील १५ ते ३० वयोगटातील युवक-युवतींच्या कल्पकतेचा उपयोग करुन इन्स्ट्राग्राम (Instagram) च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मृद व जलसंधारणाबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्यासाठी राज्यव्यापी "Reel for Soil and Water Conservation" स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. याची थीम  Save Soil, Save Water, Secure Tomorrow अशी असून सोशल मीडियावर #SaveSoil Save Water हे हॅशटॅग वापरण्यात यावे. यामुळे एकाच हॅशटॅगखाली विक्रमी संख्येने रील्स तयार होऊन मोठ्या डिजिटल सहभागाची नोंद होणार असल्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी सांगितलेया स्पर्धेचा पात्र वयोगट १५ ते ३० वर्षे असा ठेवण्यात आला आहे. प्रत्येक स्पर्धकाने ३० ते ६० सेकंदांची Instagram Reel तयार करावी. व्हिडीओ/ रीलच्या सुरुवातीला व्हिडीओ / रीलचा उद्देश, स्वतःचे संपूर्ण नाव, जिल्ह्याचे नाव नमूद सहभागी स्पर्धकांनी करणे आवश्यक आहे. स्पर्धाकाने रील स्वतःच्या Public Instagram Account वर पोस्ट करावी. स्पर्धकांनी मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकृत Instagram Account ला Tag करणे बंधनकारक राहील. यासाठी अधिकृत हॅशटॅग #Save Soil Save Water वापरणे अनिवार्य राहणार आहे.

मृद व जलसंधारण विभागाचे Instagram – https://www.instagram.com/mahawalkathon2026/?hl=en , Facebook - https://www.facebook.com/mahawalkathon2026/, Twitter https://x.com/MahaWalkathon26 सोशल मीडिया अकाऊंट आहेत असे त्यांनी सांगितले

.


 महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटरउपक्रमात

सहभागी होण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करावा

-

महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ उपक्रमात सहभागी होण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करावा -

 महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटरउपक्रमात

सहभागी होण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करावा

-मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

 

मुंबई,दि. १३ : मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने २१ ऑगस्ट रोजी राज्यभर जलसंधारण दिन साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने राज्यव्यापी महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर, जलसंधारणाची शपथ, युवकांसाठी लघुचित्रफीत स्पर्धा,शाळा-महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धा असे विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर सहभागी होण्यासाठी क्यूआर कोड तयार करण्यात आला असून हा क्यूआर कोड स्कॅन करुन नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन  मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले आहे.

 

            जलसंधारण मंत्री संजय राठोड म्हणाले, महा वॉकेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी क्यूआरआधारित ऑनलाईन नोंदणी गरजेची आहे. तसेच २१ ऑगस्ट रोजी महा वॉकेथॉन मध्ये सहभागी प्रत्येक व्यक्तीस ई-प्रमाणपत्र मिळणार आहे. मीडियासाठी #MahaWalkathon, #WalkForWater, #SaveSoilSave Water हे हॅशटॅग वापरण्यात याव्यात. १५ ते २१ ऑगस्ट दरम्यान जलसंधारण सप्ताह आणि त्यानंतर १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत जलसंधारण अभियान राबविण्यात येणार आहे.

२०२७ मध्ये मेट्रोसारख्या २३८ उपनगरीय लोकल ट्रेन मुंबईकरांच्या सेवेत

 २०२७ मध्ये मेट्रोसारख्या २३८ उपनगरीय लोकल ट्रेन मुंबईकरांच्या सेवेत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबई महानगरमध्ये एकीकडे स्वच्छ सुंदर व वातानुकूलित मेट्रोचा प्रवास आहे तर दुसरीकडे कष्टप्रद वाटत असणारा लोकलचा प्रवास आहे. यामधील तफावत लवकरच दूर होणार आहे. मुंबईकरांच्या सेवेत मेट्रोसारख्या २३८ उपनगरीय लोकल ट्रेन २०२७ मध्ये येणार असून मार्च २०३० पर्यंत संपूर्ण लोकल ट्रेन मेट्रोसारख्या होतील.

मुंबईच्या दळणवळणाला गतिमानतेचा 'बुस्टर' मिळणार

 मुंबईच्या दळणवळणाला गतिमानतेचा 'बुस्टर' मिळणार

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         मुंबईकरांच्या सेवेत २०२७ मध्ये मेट्रो सारख्या उपनगरीय लोकल ट्रेन*

·         भारत नगर रोड (विद्यापीठ परिसर) ते वाकोला जंक्शन या सांताक्रुज - चेंबूर जोडमार्ग टप्पा दोन उन्नत मार्गिकेचे लोकार्पण

·         चेंबूर मेट्रो स्थानकाचे लोकार्पण

·         ठाणे ते बोरिवली दुहेरी मार्गाच्या प्रकल्पातील 'टीबीएम अर्जुना'चा शुभारंभ

·         माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर बाबासाहेब अनंतराव भोसले उड्डाणपूल नामकरण

 

मुंबई, दि. १३: केंद्र शासनाने उपनगरीय लोकलची मेट्रोच्या धर्तीवर निर्मिती करण्यास मान्यता दिली आहे. यामुळे वंदे भारतसारखी आधुनिक रेल्वे बनवित असलेल्या कारखान्यात स्वयंचलित दरवाजे, वातानुकूलित, स्वच्छ अशा मेट्रो सारख्या लोकल ट्रेनची निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 

मुंबई महानगराच्या दळणवळणासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा असून लोकार्पण होणाऱ्या पायाभूत सुविधांमुळे मुंबईतील दळणवळणाला 'गतिमानतेचा बूस्टर' मिळाला असल्याचा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

 

सह्याद्री अतिथी गृह येथे दूरदृष्य प्रणाली द्वारे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या दोन पायाभूत सुविधांचे ई-लोकार्पण, ठाणे ते बोरिवली दुहेरी भुयारी मार्गाच्या प्रकल्पातील ठाणे बाजूकडील टीबीएम अर्जुनाचा शुभारंभ आणि वांद्रे कुर्ला संकुलाच्या जी ब्लॉकला पूर्व द्रुतगती मार्गासोबत जोडणाऱ्या उड्डाणपूलाला माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर बाबासाहेब अनंतराव भोसले उड्डाणपूल नामकरण कार्यक्रम झाला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

लोकसहभागातून २०३० पूर्वी क्षयरोग निर्मूलनाचे लक्ष्य साध्य करू

 लोकसहभागातून २०३० पूर्वी क्षयरोग निर्मूलनाचे लक्ष्य साध्य करू

- राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर

क्षयरोग निर्मूलनासाठी शासनाच्या प्रयत्नांना समाजातील विविध घटकांची साथ आवश्यक आहे. सर्वांच्या सहभागातून २०३० पूर्वी क्षयरोग निर्मूलनाचे लक्ष्य निश्चितपणे साध्य करता येईल, असा विश्वास सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी व्यक्त केला.

 

राज्यमंत्री साकोरे बोर्डीकर यांनी सांगितले की, केंद्र किंवा राज्य शासन एकट्याने सामाजिक बदल घडवू शकत नाही. त्यासाठी नागरिक, सामाजिक संस्था आणि विविध क्षेत्रांतील सहकाऱ्यांचा सक्रिय सहभाग व सहकार्य आवश्यक आहे.

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली क्षयरोगमुक्त भारत अभियानाशी संबंधित निक्षय मित्रउपक्रम राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः निक्षय मित्र झाले असून, अनेक लोकप्रतिनिधी आणि समाजातील नागरिकांनीही या उपक्रमात सहभाग घेतला आहे. क्षयरुग्णांना औषधांसह आवश्यक प्रथिनयुक्त आहार उपलब्ध करून देण्यासाठी निक्षय मित्र योगदान देत आहे. राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये रजोनिवृत्ती आणि पीसीओडीसाठी स्वतंत्र दवाखाने सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचेही त्यांनी सांगितले. पीसीओडीमुळे अनेक किशोरवयीन मुलींना शारीरिक तसेच मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर संबंधित आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा उपक्रम महत्वाचा ठरत आहे.

 


Featured post

Lakshvedhi