करंजा मत्स्य बंदर प्रकल्प कामांसाठी अत्याधुनिक यंत्रणेसह
अनुभवी मनुष्यबळाचा वापर करावा
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
· ४,५०० मेट्रिक टन मत्स्य उत्पादन हाताळण्याची क्षमता
· दुसऱ्या टप्प्यात पायाभूत सुविधांच्या उभारणीस मिळणार गती
मुंबई, दि.५ : रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील करंजा मत्स्य बंदराच्या प्रकल्पातून वार्षिक ४,५०० मेट्रिक टन मत्स्य उत्पादन हाताळण्याची क्षमता निर्माण होणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यातील कामांसाठी १४९ कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली होती. मंजूर कामे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने (एमएमबी) पूर्ण केली असून उर्वरित कामे गतीने होण्यासाठी अनुभवी तंत्रज्ञ आणि आधुनिक यंत्रणेचा वापर करावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.