Friday, 7 August 2026

करंजा मत्स्य बंदर प्रकल्प कामांसाठी अत्याधुनिक यंत्रणेसह अनुभवी मनुष्यबळाचा वापर करावा

 करंजा मत्स्य बंदर प्रकल्प कामांसाठी अत्याधुनिक यंत्रणेसह

अनुभवी मनुष्यबळाचा वापर करावा

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         ४,५०० मेट्रिक टन मत्स्य उत्पादन हाताळण्याची क्षमता

·         दुसऱ्या टप्प्यात पायाभूत सुविधांच्या उभारणीस मिळणार गती

मुंबई, दि.५ : रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील करंजा मत्स्य बंदराच्या प्रकल्पातून वार्षिक ४,५०० मेट्रिक टन मत्स्य उत्पादन हाताळण्याची क्षमता निर्माण होणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यातील कामांसाठी १४९ कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली होती. मंजूर कामे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने (एमएमबी) पूर्ण केली असून उर्वरित कामे गतीने होण्यासाठी अनुभवी तंत्रज्ञ आणि आधुनिक यंत्रणेचा वापर करावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.

पशुसंवर्धन विभागामार्फत मेंढ्या-शेळ्यांसाठी आरोग्य सेवांचा विस्तार, नियमित लसीकरण, उपचार सुविधा अधिक प्रभावी

 पशुसंवर्धन विभागामार्फत मेंढ्या-शेळ्यांसाठी आरोग्य सेवांचा विस्तार, नियमित लसीकरण, उपचार सुविधा अधिक प्रभावी करण्याबाबत चर्चा झाली. तसेच मेंढपाळ समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक धोरणात्मक उपाययोजनांचा अभ्यास करून त्याबाबत शासन स्तरावर पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या.

यावेळी समाजाच्या प्रतिनिधींनी शासनाने त्यांच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. शासनाकडूनही या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले

मेंढपाळ समाजाच्या प्रश्नांवर महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा प्रलंबित मागण्यांवर संबंधित विभागांना समन्वयाने कार्यवाही करण्याच्या सूचना

 मेंढपाळ समाजाच्या प्रश्नांवर महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा

प्रलंबित मागण्यांवर संबंधित विभागांना समन्वयाने कार्यवाही करण्याच्या सूचना

मुंबई, दि. ६ : महाराष्ट्रातील भटक्या मेंढपाळ समाजासमोरील विविध समस्या, प्रलंबित मागण्या आणि त्यावरील उपाययोजनांचा सविस्तर आढावा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

 समाजाच्या मागण्यांबाबत संबंधित विभागांनी परस्पर समन्वय साधून नियमानुसार सकारात्मक कार्यवाही करावी, अशा सूचना मंत्री बावनकुळे यांनी यावेळी दिल्या.

बैठकीत मेंढपाळ समाजाच्या प्रतिनिधींनी वनक्षेत्रातील पारंपरिक चराई हक्क, वन विभागाकडून होणारी कारवाई, दाखल गुन्ह्यांचा पुनर्विचार, पारंपरिक चराई मार्गांचे संरक्षण, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, मुक्कामासाठी आवश्यक सुविधा, पशुवैद्यकीय सेवा, स्वतंत्र कल्याणकारी योजना, आरक्षण, मेंढपाळ विकास महामंडळाची स्थापना तसेच नैसर्गिक आपत्ती, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे किंवा साथीच्या रोगांमुळे मृत्यू पावणाऱ्या मेंढ्यांसाठी नुकसानभरपाई आदी विविध मागण्या मांडल्या.

महसूल मंत्री बावनकुळे यांनी मेंढपाळ समाजाच्या समस्या संवेदनशील असून त्या सर्व संबंधित विभागांनी समन्वयातून सोडविणे आवश्यक असल्याचे नमूद केले. प्रत्येक मागणीची वस्तुनिष्ठ तपासणी करून कायदेशीर तरतुदींच्या चौकटीत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

याशिवाय, सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी

 याशिवाय, सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रस्तावित  मातृतीर्थ 'जिजाऊ सृष्टी' उभारण्याबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. सिंदखेड राजा येथील राजमाता जिजाऊ जन्मस्थळ विकास आराखड्याअंतर्गत यापूर्वी विविध संवर्धन व जतनाची कामे पूर्ण करण्यात आली असून, या ऐतिहासिक स्थळाला अधिक आकर्षक, अभ्यासपूर्ण आणि पर्यटनदृष्ट्या सक्षम स्वरूप देण्याच्या दृष्टीने जिजाऊ सृष्टी विकसित करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

हातणी व वळती येथील प्रस्तावित माईस प्रकल्पासाठी आवश्यक जमीन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे

 हातणी व वळती येथील प्रस्तावित माईस  प्रकल्पासाठी आवश्यक जमीन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्याबाबत बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. तसेच प्रकल्पाचा मास्टर प्लॅन, वास्तुरचना, सविस्तर प्रकल्प अहवाल आणि खर्चाचा अंदाज तातडीने तयार करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. प्रकल्पासाठी आवश्यक आर्थिक तरतूद, निधी नियोजन तसेच पुढील अंमलबजावणीच्या आराखड्यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली.

Featured post

Lakshvedhi