Sunday, 2 August 2026

युवकांनी समर्पण, त्याग आणि कर्तव्यभावनेने विकसित भारताच्या उभारणीत सहभागी व्हावे

 युवकांनी समर्पण, त्याग आणि कर्तव्यभावनेने विकसित भारताच्या

उभारणीत सहभागी व्हावे

-अजित डोवाल

पुरस्कार स्वीकारल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी लोकमान्य टिळकांचे राष्ट्रवाद, स्वातंत्र्य, समाजजागृती आणि विचारप्रबोधनाचे कार्य आजही तितकेच प्रेरणादायी असल्याचे सांगितले. हा पुरस्कार स्वीकारणे हा आपल्या आयुष्यातील मोठा सन्मान असल्याची भावना व्यक्त करत त्यांनी विकसित, आत्मनिर्भर आणि शक्तिशाली भारताच्या निर्मितीसाठी लोकमान्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले.

स्वातंत्र्य ही सहज मिळालेली देणगी नसून असंख्य स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग आणि बलिदानातून प्राप्त झालेली अमूल्य संपत्ती असल्याचे सांगत त्यांनी "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे" हा संदेश आजच्या काळात विकसित भारताच्या राष्ट्रीय संकल्पात रूपांतरित करण्याची गरज व्यक्त केली. राष्ट्रहित हे सर्वांत सर्वोच्च मानून प्रत्येक नागरिकाने राष्ट्रनिर्माणात योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. युवकांनी लोकमान्य टिळकांचे विचार आणि 'गीतारहस्य'चा अभ्यास करून समर्पण, त्याग आणि कर्तव्यभावनेने विकसित भारताच्या उभारणीत सहभागी व्हावे, असेही त्यांनी सांगितले.

राज्यपालांच्या उपस्थ‍ितीत मुंबई मॅरेथॉन २०२७ नोंदणीचा शुभारंभ

 राज्यपालांच्या उपस्थ‍ितीत मुंबई मॅरेथॉन २०२७ नोंदणीचा शुभारंभ

मुंबई, दि. ३१ : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत १७ जानेवारी २०२७ रोजी होणाऱ्या टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेसाठी नावनोंदणी प्रक्रियेचा शुभारंभ आज मुंबई येथे करण्यात आला.  

मुंबई मॅरेथॉन जगातील सर्वात अधिक स्पर्धक असणारी समावेशक मॅरेथॉन झाल्याबद्दल राज्यपालांनी आयोजकांचे अभिनंदन केले तसेच मॅरेथॉनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांना चालना दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमाला भारतीय नौदलाच्या पश्चिम विभागाचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ऍडमिरल संजय वात्सायन, महाराष्ट्र, गुजरात व गोवा विभागाच्या सैन्य दलाचे जनरल ऑफिसर कमांडिंग ले. जन. डी एस कुशवाह, मॅरेथॉन आयोजक संस्था प्रोकॅमचे व्यवस्थापकीय संचालक अनिल सिंह, सहसंचालक विवेक सिंह तसेच मॅरेथॉन प्रायोजक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) आणि १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून उभारण्यात आलेल्या

 राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) आणि १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून उभारण्यात आलेल्या नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे आणि ब्लॉक सार्वजनिक आरोग्य युनिट्सची कामेही पूर्णत्वास आली आहेत. नागपूर, गडचिरोली, सांगली, सिंधुदुर्ग, नांदेड आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये नवीन आरोग्य सुविधा उभारण्यात आल्या असून, आवश्यक उपकरणे, मनुष्यबळ आणि प्रशासकीय पूर्तता करण्यात आली असुन सर्व संस्था कार्यान्वित होण्यासाठी सज्ज करण्यात आल्या आहेत.

जत, घनसावंगी, अंबड, बदलापूर खर्डी, मोखाडा, डहाणू, सांगोला, कोंढाळ, ब्रह्मपुरी, वाडी (बु.), वाशीम, धुळे, आदी ठिकाणांवरील आरोग्य संस्था उद्घाटनासाठी सज्ज

 जत, घनसावंगी, अंबड, बदलापूर खर्डी, मोखाडा, डहाणू, सांगोला, कोंढाळ, ब्रह्मपुरी, वाडी (बु.), वाशीम, धुळे, आदी ठिकाणांवरील आरोग्य संस्था उद्घाटनासाठी सज्ज आहेत. तसेच चंद्रपूर, धुळे, पुणे, जळगाव, बीड, छत्रपती संभाजीनगर, वाशीम, बुलढाणा, आणि सोलापूर येथील विविध आरोग्य प्रकल्पही नागरिकांच्या सेवेत दाखल होत आहेत. या प्रकल्पांमध्ये आधुनिक ट्रॉमा केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालय आणि प्रशिक्षण केंद्रांचा समावेश आहे.

स्वातंत्र्यदिनी राज्यभर विक्रमी आरोग्य संस्थांचे लोकार्पण" ग्रामीण आरोग्य सेवेला नवी ताकद मिळणार

 स्वातंत्र्यदिनी राज्यभर विक्रमी आरोग्य संस्थांचे लोकार्पण"

ग्रामीण आरोग्य सेवेला नवी ताकद मिळणार

- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

80 टक्के बांधकामे झालेल्या आरोग्य संस्था प्राधान्याने पूर्णत्वास

नेण्याचा निर्णय ठरला मैलाचा दगड

 

मुंबई, दि. १: राज्यातील आरोग्य पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी 80 टक्क्यांहून अधिक बांधकामे पूर्ण झालेल्या आरोग्य संस्थाना युद्धपातळीवर कार्यान्वित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय, तसेच बांधकाम पूर्णत्वास येत असतानाच आवश्यक वैद्यकीय यंत्रसामग्री, फर्निचर, मनुष्यबळ आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्याच्या विभागाच्या निर्णयामुळे स्वातंत्र्यदिनी राज्यात प्रथमच  मोठ्या संख्येने आरोग्य संस्थांचे लोकार्पण होत आहे.

 

राज्यातील उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, ट्रॉमा केअर युनिट, स्त्री रुग्णालय अशा विविध आरोग्य सुविधा नागरिकांच्या सेवेत दाखल होत आहेत. राज्यातील नागरिकांना त्यांच्या परिसरातच  दर्जेदार आणि तातडीच्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या राज्य शासनाच्या धोरणाला यामुळे मोठी चालना मिळणार आहे.

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त गृहमंत्री अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिवादन

 साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त

 गृहमंत्री अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिवादन

 

पुणे, दि. 1 : साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सारसबाग येथील साहित्यरत्न अण्णा भाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे, आमदार अमित गोरखे, योगेश टिळेकर, चेतन तुपे, हेमंत रासने आदी उपस्थित होते.

युवकांनी समर्पण, त्याग आणि कर्तव्यभावनेने विकसित भारताच्या उभारणीत सहभागी व्हावे

 युवकांनी समर्पण, त्याग आणि कर्तव्यभावनेने विकसित भारताच्या

उभारणीत सहभागी व्हावे

-अजित डोवाल

पुरस्कार स्वीकारल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी लोकमान्य टिळकांचे राष्ट्रवाद, स्वातंत्र्य, समाजजागृती आणि विचारप्रबोधनाचे कार्य आजही तितकेच प्रेरणादायी असल्याचे सांगितले. हा पुरस्कार स्वीकारणे हा आपल्या आयुष्यातील मोठा सन्मान असल्याची भावना व्यक्त करत त्यांनी विकसित, आत्मनिर्भर आणि शक्तिशाली भारताच्या निर्मितीसाठी लोकमान्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले.

स्वातंत्र्य ही सहज मिळालेली देणगी नसून असंख्य स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग आणि बलिदानातून प्राप्त झालेली अमूल्य संपत्ती असल्याचे सांगत त्यांनी "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे" हा संदेश आजच्या काळात विकसित भारताच्या राष्ट्रीय संकल्पात रूपांतरित करण्याची गरज व्यक्त केली. राष्ट्रहित हे सर्वांत सर्वोच्च मानून प्रत्येक नागरिकाने राष्ट्रनिर्माणात योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. युवकांनी लोकमान्य टिळकांचे विचार आणि 'गीतारहस्य'चा अभ्यास करून समर्पण, त्याग आणि कर्तव्यभावनेने विकसित भारताच्या उभारणीत सहभागी व्हावे, असेही त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकमान्य टिळकांनी दिलेला स्वराज्याचा विचार आज राष्ट्रीय सुरक्षेच्या बळकटीत अधिक प्रभावीपणे प्रतिबिंबित होत असल्याचे सांगितले. देशाच्या सीमा, अंतर्गत सुरक्षा आणि गुप्तचर व्यवस्थेला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देण्यात अजित डोवाल यांचे योगदान अतुलनीय असल्याचे त्यांनी नमूद केले.  त्यांना मिळालेला पुरस्कार देशाच्या सुरक्षा यंत्रणा, सशस्त्र दल आणि राष्ट्रसेवेला वाहिलेल्या प्रत्येक व्यक्तीचा सन्मान असल्याचे श्री. शिंदे म्हणाले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची गौरवशाली परंपरा राष्ट्रभक्ती, साहस, दूरदृष्टी आणि कर्तव्यनिष्ठेचा गौरव करणारी असल्याचे सांगितले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रदान करण्यात आलेला हा पुरस्कार केवळ एका व्यक्तीचा नसून देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेचाही सन्मान असल्याचे त्यांनी नमूद केले.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जागतिक स्तरावर वेगळी ओळख निर्माण केली असून गृहमंत्री अमित शाह आणि अजित डोवाल यांच्या योगदानामुळे देशाची अंतर्गत सुरक्षा, सीमासुरक्षा आणि दहशतवादविरोधी यंत्रणा अधिक सक्षम झाली आहे. भारतीय पोलीस सेवा, गुप्तचर व्यवस्था आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून विविध आव्हानात्मक परिस्थितीत प्रभावी नेतृत्व करत अजित डोवाल यांनी राष्ट्रसेवेत दिलेले योगदान देशासाठी प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी सांगितले.

डॉ. रोहित टिळक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. 1986 मध्ये लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराला सुरुवात करण्यात आली असून राजकीय, सामाजिक, आर्थिक अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींना त्यांच्या कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो. श्री. डोवाल यांना देशाच्या सुरक्षिततेसाठी केलेल्या बहुमूल्य योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

००००

Featured post

Lakshvedhi