Tuesday, 30 June 2026

नगर प्रदक्षिणा मार्गाचा विकास, चंद्रभागा नदी घाटांचे सुशोभीकरण, आधुनिक वाहनतळ आणि व्यापारी संकुल, शहर सुशोभीकरण, शहराला जोडणारे रस्ते व पूल आणि

 नगर प्रदक्षिणा मार्गाचा विकास, चंद्रभागा नदी घाटांचे सुशोभीकरण, आधुनिक वाहनतळ आणि व्यापारी संकुल, शहर सुशोभीकरण, शहराला जोडणारे रस्ते व पूल आणि पालखी तळांचा विकास अशा विविध कामांसाठी एकूण १,३८७.९१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

 

आराखड्यात बाधित नागरिकांच्या हितालाही सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. भूसंपादन, पुनर्वसन आणि बाधित इमारतींच्या मोबदल्यासाठी तब्बल २,०२६.७२ कोटी रुपयांची  तरतूद करण्यात आली असून, विकासासोबत सामाजिक न्यायाचाही समतोल साधण्यात येणार आहे.

 

राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्या मागणीनुसार भूसंपादनासाठी आवश्यक निधीपैकी त्वरित ३० टक्के निधी वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार सन २०२६-२७ च्या पावसाळी अधिवेशनात या आराखड्यासाठी ६०० कोटी रुपयांची पुरवणी मागणीद्वारे तरतूद करण्यात आली आहे.

 

दरम्यान, पंढरपूर नगरपरिषद क्षेत्रातील बाधित नागरिकांच्या पुनर्वसनासाठी विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी मिळावी यासाठी जिल्हाधिकारी, सोलापूर यांनी नगर विकास विभागाकडे प्रस्तावही सादर केला आहे. त्यामुळे विकासकामे अधिक वेगाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेला हा महत्त्वाकांक्षी विकास आराखडा पंढरपूरला जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करण्यासोबतच वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित आणि सुविधायुक्त ठरेल; तसेच धार्मिक पर्यटनाला चालना मिळून स्थानिक अर्थव्यवस्था, व्यापार आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊन पंढरपूरच्या सर्वांगीण विकासाला मोठी गती मिळणार आहे.


पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा नगरविकास विभागामार्फत राबविण्यात येणार

 पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा नगरविकास विभागामार्फत राबविण्यात येणार

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वारकऱ्यांना जागतिक दर्जाच्या सुविधा देणार

 

मुंबई, दि. २९ : श्रीक्षेत्र पंढरपूरचा आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून,  'श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर विकास व वाणिज्य संकुल आराखड्या'च्या माध्यमातून पंढरपूरचा कायापालट केला जाणार आहे. हा संपूर्ण विकास आराखडा नगरविकास विभागामार्फत राबविण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच वारकऱ्यांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देतानाच स्थानिकांच्या हिताचे संरक्षण, पुनर्वसन आणि रोजगारनिर्मितीला प्राधान्य दिले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी  स्पष्ट केले.

 

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत विधान भवनात बैठक झाली, त्यावेळी फडणवीस बोलत होते. बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, आमदार समाधान अवताडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जिल्हाधिकारी सोलापूर यांनी सादर केलेल्या 'श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर विकास व वाणिज्य संकुल आराखड्या'स राज्यस्तरीय शिखर समितीच्या मान्यतेनंतर १८ जून २०२६ रोजी शासनाने ३,९९३.९० कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली आहे. हा आराखडा पंढरपूरच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरणार आहे. या महत्त्वाकांक्षी आराखड्यात वारकऱ्यांसाठी समग्र सोयीसुविधा विकसित करण्यासाठी २८८.६६ कोटी, पुरातन मंदिरे व मठांचे जतन आणि संवर्धनासाठी ३६ कोटी तसेच मंदिर परिसरात भव्य कॉरिडॉर उभारण्यासाठी २५४.६१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या सर्व कामांवर मिळून पंढरपूर कॉरिडॉरसाठी ५७९.२७ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

राज्यातील कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार, उत्पादनवाढ, शाश्वत

 राज्यातील कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार, उत्पादनवाढ, शाश्वत शेती, सेंद्रिय शेती, फलोत्पादन आणि कृषी विस्तार क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यासाठी हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. कृषी क्षेत्रातील उत्कृष्टतेचा सन्मान करून इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देणे हा या पुरस्कारांचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, जिजामाता कृषिभूषण पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार,  उद्यानपंडित पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार(सर्वसाधारण गट/आदिवासी गट ) तसेच पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार (आयुक्तालय/मंत्रालय स्तर) या  विविध पुरस्कारांचा समावेश आहे. राज्यभरातील पुरस्कारार्थी, त्यांचे कुटुंबीय, कृषी अधिकारी, कृषी तज्ज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार असून महाराष्ट्राच्या कृषी विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या कृषी क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा हा सन्मान सोहळा ठरणार आहे.

                                                              

राज्यपाल व मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कृषी दिनानिमित्त राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळा-२०२६; एकूण १८९ पुरस्कारार्थ्यांचा होणार गौरव

 राज्यपाल  व मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कृषी दिनानिमित्त

राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळा-२०२६;

एकूण १८९ पुरस्कारार्थ्यांचा होणार गौरव : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

 

मुंबई, दि. २८ : हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या कृषी दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत दिनांक १ जुलै २०२६ रोजी डोम, सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, वरळी, मुंबई-१८ येथे राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात सन २०२३ व २०२४ या वर्षांतील राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांचे राज्यपाल  जिष्णू देव वर्मा  व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण करण्यात येणार असून कृषी,  कृषि संलग्न क्षेत्र, फलोत्पादन, सेंद्रिय शेती, कृषी विस्तार व कृषी विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एकूण १८९ शेतकरी, संस्था व कृषी अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात येणार असल्याची माहिती  कृषी मंत्री  दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

 या पुरस्कार सोहळ्यास महाराष्ट्राचे  राज्यपाल  जिष्णू देव वर्मा यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून त्यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस,  उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे,  उपमुख्यमंत्री  श्रीमती सुनेत्रा पवार, महसूल मंत्री  चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, रोजगार हमी, फलोत्पादन मंत्री भरतशेठ  गोगावले, राज्यमंत्री(कृषी) अॅड.आशिष जयस्वाल, राज्यमंत्री(मृद व जलसंधारण ) इंद्रनील नाईक व इतर  मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र कायद्याचे राज्य, इथे गुन्हेगारांना अभय नाही नसरापूर हत्या प्रकरणाच्या निकालावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले समाधान फास्ट ट्रॅक न्यायालयीन प्रक्रिया आणि कठोर शिक्षेसाठी सरकार कटिबद्ध

 महाराष्ट्र कायद्याचे राज्य, इथे गुन्हेगारांना अभय नाही

नसरापूर हत्या प्रकरणाच्या निकालावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले समाधान

फास्ट ट्रॅक न्यायालयीन प्रक्रिया आणि कठोर शिक्षेसाठी सरकार कटिबद्ध

 

मुंबई, दि. २९ : नसरापूर बालिका बलात्कार व हत्या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. या निकालावर शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाधान व्यक्त केले. न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावल्याने महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे आणि इथे गुन्हेगारांना कोणतेही अभय नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला. विधीमंडळाच्या आवारात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.   

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, या निकालाने न्याय मिळाला असून, महिलांवर आणि बालिकांवर अत्याचार करणाऱ्यांना स्पष्ट इशारा आहे. यापुढे कुणी असे घृणास्पद कृत्य करण्यास धजावणार नाही, असा हा कडक इशारा आहे. अशा नराधमांना समाजात किंवा कायद्याच्या राज्यात कोणतीही जागा नाही. त्यांना जगण्याचा अधिकारच नाही! महिला, मुली आणि लहान बालिकांविरुद्ध होणाऱ्या अत्याचारांविरोधात महायुती सरकारची भूमिका सदैव कठोर राहिली आहे, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. प्रत्येक मुलगी आणि महिला सुरक्षित वातावरणात जगावी, यासाठी सरकार सातत्याने प्रभावी उपाययोजना राबवत आहे. जलद तपास, फास्ट ट्रॅक न्यायालयीन प्रक्रिया आणि कठोर शिक्षा यांसाठी सरकार कटिबद्ध आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. नसरापूर प्रकरणात आज न्याय झाल्याची भावना सर्वांमध्ये निर्माण झाल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

.....

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना सक्षम करून देशाची निर्यात वाढवण्यावर भर द्यावा · वर्ल्ड ट्रेड सेंटर येथील परिषदेत तज्ज्ञांचे आवाहन

 सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना सक्षम करून देशाची निर्यात वाढवण्यावर भर द्यावा

·        वर्ल्ड ट्रेड सेंटर येथील परिषदेत तज्ज्ञांचे आवाहन

 

मुंबई, दि.२९ : देशाची आर्थिक प्रगती आणि रोजगार निर्मितीमध्ये 'सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग' (एमएसएमई) अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात. या उद्योगांना सक्षम करून भारताची जागतिक स्तरावरील निर्यात दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असे प्रतिपादन वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे आयोजित 'निर्यात वाढवणे, आणि एमएसएमई सक्षम करणे' या विषयावरील विशेष सत्रात तज्ज्ञांनी केले.

या कार्यक्रमात परकीय व्यापार महासंचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक राजेशकुमार मिश्रा, एक्झिम बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक हर्षा बंगारी आणि एमव्हीआयआरडीसी वर्ल्ड ट्रेड सेंटरचे अध्यक्ष डॉ. विजय कलंत्री प्रामुख्याने उपस्थित होते.

 

'डिस्ट्रिक्ट एक्सपोर्ट हब' मुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती

- राजेशकुमार मिश्रा

परकीय व्यापार महासंचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक राजेशकुमार मिश्रा यांनी सरकारच्या 'डिस्ट्रिक्ट एक्सपोर्ट हब' या महत्त्वाकांक्षी योजनेवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, "२०१९ मध्ये सुरू झालेल्या या योजनेची आता पूर्ण अंमलबजावणी होत आहे. याद्वारे देशाच्या ग्रामीण आणि अंतर्गत भागातील लघु व मोठ्या उत्पादकांना जागतिक बाजारपेठेशी जोडले जात आहे. महाराष्ट्रातील नाशिक, ठाणे, रायगड, जळगाव आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये जिल्हा न्याय निर्यात आराखड्यांवर काम सुरू आहे."

त्यांनी पुढे सांगितले की, नवीन 'निर्यात प्रोत्साहन मिशन' अंतर्गत एमएसएमई क्षेत्राला नॉन-फायनान्शियल ट्रेड बॅरियर्स पार करण्यासाठी ५० लाख रुपयांपर्यंतचे आर्थिक साहाय्य दिले जात आहे. तसेच ई-कॉमर्सच्या माध्यमातून लहान प्रमाणावर निर्यात करणाऱ्या उत्पादकांसाठी क्रेडिट गॅर

आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे

 आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे

- संचालक गोविंद अहंकारी

संचालक गोविंद अहंकारी म्हणाले की, कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यानंतर खुलासे करण्याची वेळ येऊ न देता संबंधित विभागांनी स्वतःहून तत्काळ, अचूक आणि पारदर्शक माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी. त्यामुळे जनतेची गैरसोय टळेल, अफवांना आळा बसेल आणि शासनाविषयीचा अनावश्यक रोषही कमी होईल. दरवर्षी पावसाळ्यात विविध प्रकारच्या आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होतात.


 

 

 

एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेची किंवा इतर कोणत्याही यंत्रणेची चूक असली तरी नागरिकांचा रोष शासनावर व्यक्त होतो. त्यामुळे प्रत्येक विभागाने अशा परिस्थितीकडे अत्यंत गांभीर्याने पाहून पूर्वतयारी ठेवणे आवश्यक आहे.

संचालक अहंकारी म्हणाले की, रेल्वे सेवा, वीजपुरवठा, पाणी साचणे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे अडचणी निर्माण झाल्यास त्या संदर्भातील माहिती नागरिकांना वेळेवर देणे गरजेचे आहे. कोणत्या मार्गावर वाहतूक विस्कळीत आहे, कोणत्या रेल्वेगाड्या उशिराने धावत आहेत, कोणत्या भागात पाणी साचले आहे किंवा नागरिकांनी कोणते मार्ग टाळावेत, याची माहिती तत्काळ प्रसिद्ध केल्यास नागरिक योग्य नियोजन करू शकतात, ही माहिती  व्हॉटसअप ग्रुपव्दारे, आकाशवाणी तसेच समाजमाध्यमांच्या माध्यमातून त्वरित प्रसारित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सतर्कता बाळगून सूचना देणे अधिक प्रभावी ठरते, असे त्यांनी स्पष्ट केले.

 मुंबईतील विविध शासकीय व निमसकीय यंत्रणांच्या जनसंपर्क अधिकारी यांनी यावेळी आपत्कालीन कालावधीत घ्यावयावची खबरदारी व करावयाच्या कामांची माहिती सादर केली.

Featured post

Lakshvedhi