Thursday, 28 May 2026

प्रसवपूर्व गर्भलिंग निदानास आळा घालण्यासाठी

 प्रसवपूर्व गर्भलिंग निदानास आळा घालण्यासाठी समित्यांनी मिशन मोडवर काम करून दोषींवर कडक कारवाई करावी, असे निर्देश देताना खबरी बक्षीस योजनेत अधिकाधिक खबऱ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी यंत्रणांनी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले. जनजागृती आणि प्रबोधन यालाही तितकेच महत्त्व असल्याचे नमूद करत राज्यभर कायद्याविषयी व्यापक जनजागृती मोहीम राबवावी, असे निर्देश त्यांनी दिले. समाज माध्यमे, स्थानिक स्वराज्य संस्था आणि आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून प्रचार-प्रसार वाढवण्यावर भर द्यावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

बैठकीत २३ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीतील मुद्द्यांचा आढावा, आतापर्यंत करण्यात आलेली स्टिंग ऑपरेशन्स, पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत सुरू असलेली न्यायालयीन प्रकरणे तसेच स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी सुरू असलेल्या कारवाईचा आढावा घेण्यात आला.

००००

पीसीपीएनडीटी कायद्याची कठोर अंमलबजावणी करा -

 पीसीपीएनडीटी कायद्याची कठोर अंमलबजावणी करा

-          सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, दि. २७ : बेकायदा गर्भलिंग निदान आणि स्त्री भ्रूणहत्या करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणे अत्यंत आवश्यक असल्याचे स्पष्ट करत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी जिल्हा आणि महापालिका स्तरावरील समित्या अधिक बळकट करण्याचे निर्देश दिले. चुकीचे काम करणाऱ्यांमध्ये कायद्याचा वचक निर्माण व्हावा, यासाठी व्यापक प्रमाणात कारवाई करावी,असेही त्यांनी सांगितले.

पीसीपीएनडीटी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात राज्य पर्यवेक्षकीय मंडळाची बैठक आरोग्य भवन येथे मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस आमदार स्नेहा दुबे, प्रधान सचिव निपुण विनायक, अतिरिक्त संचालक डॉ. संदीप सांगळे, उपसंचालक (विलटो) डॉ. दिगंबर कानगुले, सहाय्यक संचालक डॉ. वैशाली बडधे, विधि सल्लागार ॲड. भाग्यश्री रंगारी यांच्यासह आरोग्य विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री आबिटकर म्हणाले, स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी बेकायदेशीर प्रसवपूर्व गर्भलिंग निदान करणाऱ्यांवर शून्य सहनशीलतेचे धोरण अवलंबण्यात यावे. चुकीचे काम करणाऱ्यांमध्ये भीती निर्माण होणे आवश्यक असून, गर्भलिंग निदान करणाऱ्या हॉस्पिटल्सवरील तपासण्या वाढवून दोषींवर कठोर कारवाई करावी. पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या समित्यांचे कामकाज अधिक प्रभावी होणे आवश्यक असून, समित्यांच्या नियमित बैठका घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे मंत्रालयात अभिवादन

 स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त

मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि. 28 : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे कक्ष अधिकारी निलेश हरड आणि कर्मचारी यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी समन्वयातून प्रभावी यंत्रणा उभारा

 स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी समन्वयातून प्रभावी यंत्रणा उभारा

-          सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, दि. २७ : पीसीपीएनडीटी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासनाचे कठोर धोरण आहे.  या कायद्याच्या व्यापक प्रसार, प्रचार व अंमलबजावणीत राज्य तपासणी व संनियंत्रण समितीच्या सदस्यांनी आवश्यक सहकार्य व मार्गदर्शन करून समन्वयातून प्रभावी यंत्रणा उभारली जावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

आरोग्य भवन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्य तपासणी व संनियंत्रण समितीची बैठक झाली. बैठकीस आमदार स्नेहा दुबे, प्रधान सचिव निपुण विनायक, अतिरिक्त संचालक डॉ. संदीप सांगळे, उपसंचालक (विलटो) डॉ. दिगंबर कानगुले, सहाय्यक संचालक डॉ. वैशाली बडधे व समितीचे सदस्य उपस्थित होते.

मंत्री आबिटकर म्हणाले, पीसीपीएनडीटी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातील सर्व संबधित यंत्रणांमध्ये योग्य समन्वय निर्माण करून त्याचा उपयोग मूळ उद्देश साध्य करण्यासाठी करावा, यासाठी स्वतंत्र डेडिकेटेड टीमआणि डेडिकेटेड यंत्रणानियुक्त करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

यासाठी  ठरविलेली कार्यपद्धती प्रभावीपणे राबविणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री अबिटकर म्हणाले, समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय असल्याने  लोकप्रतिनिधींनी आपल्या कार्यक्षेत्रात वेळ देऊन या मोहिमेत सहभागी झाल्यास या कामाला वेग येईल. यासाठी सर्वांनी जबाबदारीने योगदान द्यावे. समिती सदस्यांनी सुचवलेल्या सूचनांचा विचार केला जाईल, असेही मंत्री आबिटकर यांनी सांगितले.

००००

पीसीपीएनडीटी कायद्याची कठोर अंमलबजावणी करा -

 पीसीपीएनडीटी कायद्याची कठोर अंमलबजावणी करा

-          सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, दि. २७ : बेकायदा गर्भलिंग निदान आणि स्त्री भ्रूणहत्या करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणे अत्यंत आवश्यक असल्याचे स्पष्ट करत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी जिल्हा आणि महापालिका स्तरावरील समित्या अधिक बळकट करण्याचे निर्देश दिले. चुकीचे काम करणाऱ्यांमध्ये कायद्याचा वचक निर्माण व्हावा, यासाठी व्यापक प्रमाणात कारवाई करावी,असेही त्यांनी सांगितले.

पीसीपीएनडीटी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात राज्य पर्यवेक्षकीय मंडळाची बैठक आरोग्य भवन येथे मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस आमदार स्नेहा दुबे, प्रधान सचिव निपुण विनायक, अतिरिक्त संचालक डॉ. संदीप सांगळे, उपसंचालक (विलटो) डॉ. दिगंबर कानगुले, सहाय्यक संचालक डॉ. वैशाली बडधे, विधि सल्लागार ॲड. भाग्यश्री रंगारी यांच्यासह आरोग्य विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री आबिटकर म्हणाले, स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी बेकायदेशीर प्रसवपूर्व गर्भलिंग निदान करणाऱ्यांवर शून्य सहनशीलतेचे धोरण अवलंबण्यात यावे. चुकीचे काम करणाऱ्यांमध्ये भीती निर्माण होणे आवश्यक असून, गर्भलिंग निदान करणाऱ्या हॉस्पिटल्सवरील तपासण्या वाढवून दोषींवर कठोर कारवाई करावी. पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या समित्यांचे कामकाज अधिक प्रभावी होणे आवश्यक असून, समित्यांच्या नियमित बैठका घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

प्रसवपूर्व गर्भलिंग निदानास आळा घालण्यासाठी समित्यांनी मिशन मोडवर काम करून दोषींवर कडक कारवाई करावी, असे निर्देश देताना खबरी बक्षीस योजनेत अधिकाधिक खबऱ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी यंत्रणांनी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले. जनजागृती आणि प्रबोधन यालाही तितकेच महत्त्व असल्याचे नमूद करत राज्यभर कायद्याविषयी व्यापक जनजागृती मोहीम राबवावी, असे निर्देश त्यांनी दिले. समाज माध्यमे, स्थानिक स्वराज्य संस्था आणि आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून प्रचार-प्रसार वाढवण्यावर भर द्यावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

बैठकीत २३ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीतील मुद्द्यांचा आढावा, आतापर्यंत करण्यात आलेली स्टिंग ऑपरेशन्स, पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत सुरू असलेली न्यायालयीन प्रकरणे तसेच स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी सुरू असलेल्या कारवाईचा आढावा घेण्यात आला.

नव्या वसतिगृहाची वैशिष्ट्ये आणि आधुनिक सुविधा सर जे जे स्कूल कला केंद्र

 नव्या वसतिगृहाची वैशिष्ट्ये आणि आधुनिक सुविधा सर जे.जे.:

विद्यार्थ्यांच्या दैनंदिन गरजा आणि आरामदायी निवास लक्षात घेऊन या वसतिगृहाचे अत्यंत नेटके नियोजन करण्यात आले आहे. या प्रकल्पामध्ये प्रामुख्याने खालील सुविधांचा समावेश आहे:

प्रवेश क्षमता : या आधुनिक वसतिगृहामध्ये एकूण १००० विद्यार्थ्यांची (५०० विद्यार्थी आणि ५०० विद्यार्थिनी) निवास क्षमता असेल.

खोल्यांची रचना : वसतिगृहात एकूण ३६४ स्वतंत्र खोल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये मुलांसाठी १८२ आणि मुलींसाठी १८२ खोल्या राखीव आहेत.

 खोलीतील सुविधा : प्रत्येक खोलीत तीन विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र कॉट आणि कपाटाची सुविधा दिली आहे. तसेच प्रत्येक खोलीला  स्वतंत्र प्रसाधनगृह (अटॅच बाथरूम) जोडण्यात आले असून त्यात गिझरद्वारे गरम पाण्याची सोय असेल.

 इतर सोयी : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वसतिगृह परिसरात सुसज्ज वाचन कक्ष, व्यायामाळा, इनडोअर प्ले एरिया, डबल हाईट कॉमन रूम, वार्डन रूम आणि प्रत्येक मजल्यावर शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर फिल्टरची व्यवस्था करण्यात आली आहे.

 विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आणि राहण्यासाठी उत्तम वातावरण मिळणे हा त्यांचा हक्क आहे. हे वसतिगृह मुंबईत शिकणाऱ्या कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी एक आधुनिक आणि सुरक्षित हक्काचे घर ठरेल,असेही मंत्री चंद्रकांत दादा म्हणाले.

या पाहणी दौऱ्याप्रसंगी तंत्र शिक्षण सहसचिव संतोष खोरगडे, अवर सचिव प्रवीण मुंढे, महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे, उपकला संचालक विनोद दांडगे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रतिनिधी आणि संबंधित उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते

पावसाळी मासेमारी बंदी लागू; नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई · १ जून ते ३१ जुलै दरम्यान यांत्रिक व यंत्रचलित मासेमारी नौकांना बंदी

 पावसाळी मासेमारी बंदी लागू; नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई

·        १ जून ते ३१ जुलै दरम्यान यांत्रिक व यंत्रचलित मासेमारी नौकांना बंदी

मुंबई, दि.२७ : मासळीच्या साठ्याचे जतन तसेच मच्छीमारांच्या जीवित व वित्त रक्षणाच्या उद्देशाने राज्य शासनाने महाराष्ट्राच्या सागरी जलक्षेत्रात पावसाळी मासेमारी बंदी लागू केली आहे. मत्स्यव्यवसाय विभागाच्या आदेशानुसार १ जून २०२६ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत (दोन्ही दिवस धरून) महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपर्यंत यांत्रिक व यंत्रचलित मासेमारी नौकांना मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

मत्स्यव्यवसाय विभागाने जारी केलेल्या सूचनेनुसार, या कालावधीत समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या नौकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम (सुधारणा) २०२१ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व मच्छीमार, नौका मालक, तांडेल आणि खलाशी यांनी शासनाच्या आदेशांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पावसाळी हंगामात समुद्र खवळलेला असतो. त्यामुळे मासेमारी करताना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या काळात विविध माशांच्या प्रजातींचा प्रजनन कालावधी असल्याने मासेमारी बंदीमुळे मत्स्यसंपत्तीचे संवर्धन होण्यास मदत होते. या निर्णयामुळे भविष्यात मच्छीमारांना अधिक प्रमाणात मासळी उपलब्ध होऊन आर्थिक लाभ होणार असल्याचे मत मत्स्यव्यवसाय विभागाकडून व्यक्त करण्यात आले आहे.

सर्व संबंधितांनी शासनाच्या नियमांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन मुंबई शहरचे मत्स्यव्यवसाय सहायक आयुक्त यांनी केले आहे.

00000

Featured post

Lakshvedhi