Thursday, 28 May 2026

नव्या वसतिगृहाची वैशिष्ट्ये आणि आधुनिक सुविधा सर जे जे स्कूल कला केंद्र

 नव्या वसतिगृहाची वैशिष्ट्ये आणि आधुनिक सुविधा सर जे.जे.:

विद्यार्थ्यांच्या दैनंदिन गरजा आणि आरामदायी निवास लक्षात घेऊन या वसतिगृहाचे अत्यंत नेटके नियोजन करण्यात आले आहे. या प्रकल्पामध्ये प्रामुख्याने खालील सुविधांचा समावेश आहे:

 

प्रवेश क्षमता : या आधुनिक वसतिगृहामध्ये एकूण १००० विद्यार्थ्यांची (५०० विद्यार्थी आणि ५०० विद्यार्थिनी) निवास क्षमता असेल.

खोल्यांची रचना : वसतिगृहात एकूण ३६४ स्वतंत्र खोल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये मुलांसाठी १८२ आणि मुलींसाठी १८२ खोल्या राखीव आहेत.

 खोलीतील सुविधा : प्रत्येक खोलीत तीन विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र कॉट आणि कपाटाची सुविधा दिली आहे. तसेच प्रत्येक खोलीला  स्वतंत्र प्रसाधनगृह (अटॅच बाथरूम) जोडण्यात आले असून त्यात गिझरद्वारे गरम पाण्याची सोय असेल.

 इतर सोयी : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वसतिगृह परिसरात सुसज्ज वाचन कक्ष, व्यायामाळा, इनडोअर प्ले एरिया, डबल हाईट कॉमन रूम, वार्डन रूम आणि प्रत्येक मजल्यावर शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर फिल्टरची व्यवस्था करण्यात आली आहे.

 

 विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आणि राहण्यासाठी उत्तम वातावरण मिळणे हा त्यांचा हक्क आहे. हे वसतिगृह मुंबईत शिकणाऱ्या कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी एक आधुनिक आणि सुरक्षित हक्काचे घर ठरेल,असेही मंत्री चंद्रकांत दादा म्हणाले.

या पाहणी दौऱ्याप्रसंगी तंत्र शिक्षण सहसचिव संतोष खोरगडे, अवर सचिव प्रवीण मुंढे, महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे, उपकला संचालक विनोद दांडगे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रतिनिधी आणि संबंधित उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi