Thursday, 14 May 2026

न्हावरा फाटा ते जामखेड रस्ता (एनएच-548डी) काम सुयोग्य दर्जाचे करा

 न्हावरा फाटा ते जामखेड रस्ता (एनएच-548डी) काम सुयोग्य दर्जाचे करा

-सभापती प्रा. राम शिंदे

·         जामखेड शहरातून जात असलेला हा रस्ता अतिक्रमणे हटवून पूर्ण करा

 

मुंबई, दि. 13 : न्हावरा फाटा ते जामखेड रस्त्याचे (एनएच-548डी) काम सुयोग्य दर्जाचे झालेले नसून रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे तडे गेले आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनांना अपघात होत आहेत, जीवितहानी होत आहे. 2019 साली सुरु झालेले काम अद्याप अपूर्ण असणे ही देखील अत्यंत गंभीर बाब आहे. यासंदर्भात सचिव (राष्ट्रीय महामार्ग), सा.बां.विभाग यांनी आठ दिवसाच्या आत तेथे प्रत्यक्ष भेट देऊन वस्तूनिष्ठ पाहणी अहवाल सादर करावा. नियमानुसार दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, त्याचप्रमाणे जामखेड शहरातील ज्या भागातून हा रस्ता जातो तेथील अतिक्रमणे हटवून रस्त्याचे काम पूर्ण करण्याची कार्यवाही करावी, पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होणार नाही यादृष्टीने दक्षता घ्यावी, असे निर्देश  विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले.

 

 विधानभवन येथे  न्हावरा फाटा ते जामखेड रस्ता तसेच जामखेड शहरातील रस्त्याबाबत महत्वाची बैठक आयोजित करण्यात होती. . या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (राष्ट्रीय महामार्ग) संतोष शेलार, अधीक्षक अभियंता तृप्ती नाग, कार्यकारी अभियंता संजय शेवाळे उपस्थित होते. तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे अहिल्यानगरचे अपर जिल्हाधिकारी व संबंधित अधिकारी सहभागी झाले होते

एकल संवर्गाच्या भरती प्रक्रियेसाठी

 एकल संवर्गाच्या भरती प्रक्रियेसाठी प्रतिक्षा यादी कार्यान्वित राहील व बहुसंवर्गीय पदांच्या भरती प्रक्रियेसाठी प्रतिक्षा यादी राहणार नाही.

 

बहुसंवर्गीय पदभरतीत उमेदवाराला ज्या पदावर अगोदरच नियुक्ती मिळाली आहे अशा पदाचा किंवा निम्न पदाचा पर्याय उमेदवाराने पसंतीक्रमात दिल्यास त्याचा त्या पदावरील किंवा निम्न पदावरील शिफारशीसाठी विचार केला जाणार नाही.

 

हा निर्णय १३ मे २०२६ पासून अमलात येणार असल्याचे आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

एमपीएससीकडून ‘ऑप्टिंग आऊट’ आणि ‘संमती’ पर्याय रद्द

 एमपीएससीकडून ऑप्टिंग आऊटआणि संमतीपर्याय रद्द

 

मुंबई, दि. १३ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) भरती प्रक्रियेत महत्त्वाचा बदल करत उमेदवारांना उपलब्ध असलेले ऑप्टिंग आऊटतसेच संमती’ (गिव्ह अप / ॲक्सेप्टेड) हे पर्याय रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाने जारी केले आहे.

 

आयोगाने भरती प्रक्रियेत सुधारणा करण्याच्या उद्देशाने यापूर्वी ऑप्टिंग आऊटही संकल्पना लागू केली होती. त्यानुसार निवड यादीतील उमेदवारांना भरती प्रक्रियेतून स्वेच्छेने बाहेर पडण्याचा पर्याय देण्यात आला होता. मात्र, या पर्यायासंदर्भात आयोगाच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर आता हा पर्याय रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला

मुंबई शहरातील ‘म्हाडा’च्या ३८८ इमारतींच्या पुनर्विकासाबाबत शासन सकारात्मक

 मुंबई शहरातील ‘म्हाडा’च्या ३८८ इमारतींच्या 

पुनर्विकासाबाबत शासन सकारात्मक

- प्रभारी गृहनिर्माण मंत्री शंभूराज देसाई

 

मुंबई,दि.१३: मुंबई शहरातील ‘म्हाडा’च्या ३८८ इमारतींच्या  पुनर्विकासाबाबत शासन सकारात्मक असून या कामाला गती देण्यासाठी नगरविकास विभागाने गतीने कार्यवाही करण्याचे निर्देश प्रभारी गृहनिर्माण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

 

विधिमंडळ अधिवेशनादरम्यान लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या प्रश्न व लक्षवेधींतील मुंबई शहरातील म्हाडाच्या ३८८ इमारतींच्या पुनर्विकासात येणाऱ्या अडचणी संदर्भात मेघूदत या शासकीय निवासस्थानी आयोजित बैठकीत प्रभारी गृहनिर्माण मंत्री शंभूराज देसाई बोलत होते.

 

बैठकीत आमदार मनोज जामसुतकर, आमदार रईस शेख, आमदार मनीषा चौधरी, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद शंभरकर व म्हाडा इमारत पुनर्विकासातील रहिवासी उपस्थित होते.

 

मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याशी चर्चा करून म्हाडाच्या इमारतीच्या पुनर्विकासाबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. म्हाडाच्या पुनर्विकासाबाबत येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी प्राधान्याने कार्यवाही करण्यात येईल. नगर विकास विभागाला याबाबत सविस्तर सूचना देण्यात येतील असेही ते म्हणाले.

Governor wants to trim convoy size to reduce fuel consumption Asks Home Department to Rationalize Security Convoy

 Governor wants to trim convoy size to reduce fuel consumption

Asks Home Department to Rationalize Security Convoy

Mumbai May 13 : In line with Prime Minister Narendra Modi's call to reduce the consumption of petrol and diesel and promote efficient utilization of public resources, the Governor of Maharashtra Jishnu Dev Varma has initiated steps to rationalize the size of his official convoy.

The Governor has directed the State Home Department to review the existing security arrangements relating to the Governor’s convoy and assess the feasibility of reducing the number of vehicles deployed.

In a letter addressed to Additional Chief Secretary (Home) Manisha Mhaiskar, Secretary to the Governor Dr Prashant Narnaware stated that the Governor desired a reassessment of the present threat perception and an examination of measures to optimize convoy deployment for energy conservation.

The Governor’s initiative is aimed at encouraging responsible use of fuel and public resources while maintaining necessary security standards.

 

ईंधन बचत के लिए राज्यपाल ने काफिला कम करने के निर्देश दिए गृह विभाग को सुरक्षा काफिले को तर्कसंगत बनाने के निर्देश

 ईंधन बचत के लिए राज्यपाल ने काफिला कम करने के निर्देश दिए

गृह विभाग को सुरक्षा काफिले को तर्कसंगत बनाने के निर्देश

मुंबई, दि. 13 मई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी द्वारा पेट्रोल और डीजल की खपत कम करने तथा सीमित संसाधनों के अधिक कार्यक्षम उपयोग को प्रोत्साहन देने के आह्वान के अनुरूप महाराष्ट्र के राज्यपाल जिष्णु देव वर्मा ने अपने काफिले में वाहनों की संख्या कम करने के संबंध में निर्देश दिए हैं।

राज्यपाल ने राज्य शासन के गृह विभाग को वर्तमान सुरक्षा व्यवस्था की समीक्षा कर उनके काफिले में वाहनों की संख्या कम करने की संभावनाओं का परीक्षण करने के निर्देश दिए हैं।

गृह विभाग की अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर को भेजे गए पत्र में राज्यपाल के सचिव डॉ. प्रशांत नारनवरे ने राज्यपाल के निर्देशों से अवगत कराया है। 

पत्र में राज्यपाल की सुरक्षा व्यवस्था की समीक्षा कर ऊर्जा बचत के दृष्टिकोण से वाहनों की संख्या निर्धारित करने को कहा गया है।

सीमित संसाधनों के जिम्मेदारीपूर्ण उपयोग को प्रोत्साहित करने के उद्देश्य से राज्यपाल ने यह निर्देश दिए हैं।

इंधन बचतीसाठी ताफा कमी करण्याची राज्यपालांची सूचना गृह विभागाला सुरक्षा ताफा तर्कसंगत करण्याचे निर्देश

 इंधन बचतीसाठी ताफा कमी करण्याची राज्यपालांची सूचना

गृह विभागाला सुरक्षा ताफा तर्कसंगत करण्याचे निर्देश

मुंबई, दि. 13 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार पेट्रोल व डिझेलचा वापर कमी करण्याच्या आणि मर्यादित संसाधनांच्या कार्यक्षम वापरास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्याच्या दृष्टीने सूचना केल्या आहेत. 

राज्यपालांनी राज्य शासनाच्या गृह विभागाला विद्यमान सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन त्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्याची शक्यता तपासण्याचे निर्देश दिले आहेत.  

गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांना पाठविलेल्या पत्रात राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी राज्यपालांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन ऊर्जा बचतीच्या अनुषंगाने वाहनांची संख्या निर्धारित करण्याच्या राज्यपालांच्या सूचना कळवल्या आहेत. 

मर्यादित संसाधनांचा जबाबदारीने वापर करण्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राज्यपालांनी सदर सूचना केल्या आहेत. 

Featured post

Lakshvedhi