Monday, 11 May 2026

इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची प्रसिद्ध

 इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची प्रसिद्ध

 

मुंबई, दि. 7 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार 26 एप्रिल, 2026 रोजी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. चौथी) आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. सातवी) आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची परिषदेच्या www.mscepune.in व https://puppssmsce.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.

अंतरिम उत्तरसूचीवरील आक्षेप नोंदविण्याची कार्यपद्धती

या अंतरिम उत्तरसूचीवर काही आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन परिषदेच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन स्वरूपात करता येईल. हे निवेदन पालकांकरिता संकेतस्थळावर व शाळांकरिता त्यांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्रुटी/ आक्षेपाबाबतचे ऑनलाईन निवेदन भरण्याकरिता 7 ते 14 मे 2026 या कालावधीची मुदत देण्यात येत आहे. त्यानंतर निवेदन स्वीकारले जाणार नाही. तसेच ऑनलाईन निवेदनाशिवाय इतर कोणत्याही प्रकारे प्राप्त त्रुटी/ आक्षेपाबाबतच्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही, असेही परीक्षा परिषदेमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

दहावीचा निकाल शुक्रवारी दुपारी एक वाजता

 दहावीचा निकाल शुक्रवारी दुपारी एक वाजता

 

मुंबई, दि. 7 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेचा निकाल उद्या शुक्रवार दि. 8 मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे सचिव डॉ. दिपक माळी यांनी दिली आहे.

राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वीच्या परीक्षेचा निकाल पुढील अधिकृत संकेतस्थळांवर ऑनलाईन जाहीर करण्यात येईल. 

 

1) https://results.digilocker.gov.in 2) https://mahahsscboard.in 3) https://sscresult.mkcl.org 4)  https://results.targetpublications.org 5) https://results.navneet.com 6) https://www.tv9marathi.com आणि 7) https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-ssc-10-results

 

परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवर उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. त्याचप्रमाणे Digilocker App मध्ये Digital गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच https://mahahsscboard.in (in school login) या संकेतस्थळावर शाळांना त्यांच्या शाळांचा एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

 

       ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ https://mahahsscboard.in वरून स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या असल्याचे मंडळामार्फत कळविण्यात आले आहे.

गेली 27 वर्ष काळा घोडा फेस्टिव्हलचे आयोजन केले जाते आहे. या फेस्टीव्हलमध्ये

 काळा घोडा फेस्टिव्हलच्या आयोजक तथा संस्थापक बृंदा मेलर म्हणाल्या की, गेली 27 वर्ष काळा घोडा फेस्टिव्हलचे आयोजन केले जाते आहे. या फेस्टीव्हलमध्ये सातत्यता असल्यामुळेच हा फेस्टिव्हल यशस्वी आहे. कोणत्याही खाजगी फेस्टिव्हलला जर शासनाचा पाठिंबा मिळाला तर ते काम चांगले यशस्वी  होते हेच काळाघोडा फेस्टिव्हलचे यश आहे. सुरूवातीला या फेस्टिव्हलला मर्यादा होती. आता फेस्टिव्हल शासनाच्या मदतीमुळे चांगला होत आहे याबद्दल त्यांनी शासनाचे आभार मानले.

एआय उपयुक्त, पण मानवी भावना आणि सर्जनशीलतेला पर्याय नाही’

 एआय उपयुक्त, पण मानवी भावना आणि सर्जनशीलतेला पर्याय नाही’

  • ‘टेक वारी 2.0’ कार्यक्रमातील ‘कलारंग : आर्ट, एआय अँड गव्हर्नन्स’ परिसंवादात मान्यवरांचे मत

 

मुंबई, दि. 7 : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ही कला, चित्रपटसृष्टी तसेच सर्वच क्षेत्रासाठी उपयुक्त तांत्रिक साधन असले, तरी मानवी भावना, संवेदना आणि सर्जनशीलतेची जागा ती कधीच घेऊ शकत नाही, असा सूर मंत्रालयात आयोजित ‘टेक वारी 2.0’ कार्यक्रमातील ‘कलारंग : आर्ट, एआय अँड गव्हर्नन्स’ या परिसंवादात उमटला. कला, चित्रपट आणि शिल्पकलेतील मान्यवरांनी एआयच्या वाढत्या प्रभावावर भाष्य करताना तंत्रज्ञानाचा वापर सजगतेने आणि विचारपूर्वक करण्याची गरज अधोरेखित केली.

 

सामान्य प्रशासन विभागातर्फे मंत्रालयात त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित ‘टेक वारी 2.0’ अंतर्गत ‘कलारंग : आर्ट, एआय अँड गव्हर्नन्स’ या विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात काळा घोडा आर्ट्स फेस्टिव्हलच्या संस्थापक आणि कलाकार बृंदा मिलर, शिल्पकार अरझान खंबाटा, चित्रपट दिग्दर्शक रोहन सिप्पी आणि ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक अशोक कौल यांनी सहभाग घेतला. राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयाच्या संचालक निधी चौधरी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही.राधा उपस्थि‍त होत्या.

 

टेक-वारी 2.0 अंतर्गत जनरेटिव्ह एआय विषयावर विशेष तांत्रिक सत्र संपन्न

 टेक-वारी 2.0 अंतर्गत जनरेटिव्ह एआय विषयावर विशेष तांत्रिक सत्र संपन्न

 

मुंबई, दि. ७ : चॅट जीपीटी, जेमिनी यांसारख्या एआय प्लॅटफॉर्मचा शासकीय पत्रव्यवहार, अहवाल तयार करणे, डेटा विश्लेषण आणि नागरिक सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी कसा उपयोग होत आहे, याची माहिती फ्रंटियर टेक्नॉलॉजी, नसकॉम चे संचालक एम. चोक्कालिंगम यांनी दिली.

 

सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने मंत्रालय येथे टेक-वारी 2.0 अंतर्गत आर्टिफिशियल इंटेलिजन्स: हँड ऑन विथ जनरेटिव एआय या विषयावर विशेष तांत्रिक सत्राचे आयोजन मंत्रालयात करण्यात आले होते.

 

शासन व्यवस्था आणि सार्वजनिक प्रशासनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) चे वाढते महत्त्व या सत्रात अधोरेखित करण्यात आले. प्रमुख वक्ते चोक्कालिंगम यांनी तमिळनाडू ई-गव्हर्नन्स एजन्सी आणि नॅसकॉम मधील आपल्या अनुभवांच्या आधारे शासनाच्या कामकाजात एआय तंत्रज्ञानामुळे कार्यक्षमता आणि सेवा वितरण कसे सुधारत आहे, याविषयी माहिती दिली.

 

सत्रादरम्यान सहभागी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग आणि जनरेटिव्ह एआय यांच्या मूलभूत संकल्पना सोप्या आणि व्यावहारिक उदाहरणांच्या माध्यमातून समजावून सांगण्यात आल्या.

केंद्र शासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने ग्रामपंचायत स्तरावर 20 पेक्षा अधिक कामे सुरू करण्याची सुविधा

 केंद्र शासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने ग्रामपंचायत स्तरावर 20 पेक्षा अधिक कामे सुरू करण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे शासनमान्य शेत/ पाणंद रस्त्यांच्या कामांना प्राधान्याने मंजुरी देण्याचे निर्देश मंत्री गोगावले यांनी दिले. संभाव्य ‘एल निनो’ परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्यासाठी शेत/ पाणंद रस्त्यांच्या कामांवर विशेष भर देण्याचेही त्यांनी सांगितले.

या बैठकीस रोजगार हमी योजना विभागाचे सचिव आप्पासाहेब धुळाज यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

ग्रामपंचायत स्तरावर 20 पेक्षा अधिक कामे सुरू करण्याची सुविधा उपलब्ध

 केंद्र शासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने ग्रामपंचायत स्तरावर 20 पेक्षा अधिक कामे सुरू करण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे शासनमान्य शेत/ पाणंद रस्त्यांच्या कामांना प्राधान्याने मंजुरी देण्याचे निर्देश मंत्री गोगावले यांनी दिले. संभाव्य ‘एल निनो’ परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्यासाठी शेत/ पाणंद रस्त्यांच्या कामांवर विशेष भर देण्याचेही त्यांनी सांगितले.

Featured post

Lakshvedhi