एआय उपयुक्त, पण मानवी भावना आणि सर्जनशीलतेला पर्याय नाही’
- ‘टेक वारी 2.0’ कार्यक्रमातील ‘कलारंग : आर्ट, एआय अँड गव्हर्नन्स’ परिसंवादात मान्यवरांचे मत
मुंबई, दि. 7 : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ही कला, चित्रपटसृष्टी तसेच सर्वच क्षेत्रासाठी उपयुक्त तांत्रिक साधन असले, तरी मानवी भावना, संवेदना आणि सर्जनशीलतेची जागा ती कधीच घेऊ शकत नाही, असा सूर मंत्रालयात आयोजित ‘टेक वारी 2.0’ कार्यक्रमातील ‘कलारंग : आर्ट, एआय अँड गव्हर्नन्स’ या परिसंवादात उमटला. कला, चित्रपट आणि शिल्पकलेतील मान्यवरांनी एआयच्या वाढत्या प्रभावावर भाष्य करताना तंत्रज्ञानाचा वापर सजगतेने आणि विचारपूर्वक करण्याची गरज अधोरेखित केली.
सामान्य प्रशासन विभागातर्फे मंत्रालयात त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित ‘टेक वारी 2.0’ अंतर्गत ‘कलारंग : आर्ट, एआय अँड गव्हर्नन्स’ या विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात काळा घोडा आर्ट्स फेस्टिव्हलच्या संस्थापक आणि कलाकार बृंदा मिलर, शिल्पकार अरझान खंबाटा, चित्रपट दिग्दर्शक रोहन सिप्पी आणि ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक अशोक कौल यांनी सहभाग घेतला. राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयाच्या संचालक निधी चौधरी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही.राधा उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment