Monday, 11 May 2026

केंद्र शासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने ग्रामपंचायत स्तरावर 20 पेक्षा अधिक कामे सुरू करण्याची

 केंद्र शासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने ग्रामपंचायत स्तरावर 20 पेक्षा अधिक कामे सुरू करण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे शासनमान्य शेत/ पाणंद रस्त्यांच्या कामांना प्राधान्याने मंजुरी देण्याचे निर्देश मंत्री गोगावले यांनी दिले. संभाव्य एल निनो’ परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्यासाठी शेत/ पाणंद रस्त्यांच्या कामांवर विशेष भर देण्याचेही त्यांनी सांगितले.

या बैठकीस रोजगार हमी योजना विभागाचे सचिव आप्पासाहेब धुळाज यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

शेत/ पाणंद रस्त्यांची कामे ही राज्य शासनाची प्राधान्याची योजना असल्याचे

 शेत/ पाणंद रस्त्यांची कामे ही राज्य शासनाची प्राधान्याची योजना असल्याचे सांगत मंत्री भरत गोगावले यांनी या कामांमध्ये अधिक गतिमानता आणण्याचे निर्देश दिले. ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायतींकडून प्राप्त झालेल्या मागण्या आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊन शासनस्तरावर मोठ्या प्रमाणात शेत/ पाणंद रस्त्यांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. क्षेत्रीय स्तरावर या कामांच्या अंमलबजावणीस गती द्यावीअसे त्यांनी सांगितले. मंजूर कामांची अंदाजपत्रके तातडीने तयार करून त्यांना तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्यात यावी तसेच संबंधित कामांचे वर्ककोड तत्काळ तयार करून कार्यारंभ आदेशासह हजेरीपत्रके निर्गमित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सुरू असलेल्या कामांची उर्वरित हजेरीपत्रके देखील त्वरित निर्गमित करून कामांचे मोजमाप घेऊन देयके नरेगासॉफ्ट प्रणालीवर विनाविलंब नोंदविण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

शेत/ पाणंद रस्त्यांना प्राधान्य देऊन ग्रामीण रोजगाराला गती द्यावी

 शेत/ पाणंद रस्त्यांना प्राधान्य देऊन ग्रामीण रोजगाराला गती द्यावी

-मंत्री भरत गोगावले

 

मुंबईदि. 7 - रोजगार हमी योजना विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या मातोश्री ग्राम समृद्धी शेत/ पाणंद रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देऊन तसेच या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करुन ग्रामीण रोजगाराला गती देण्याचे निर्देश रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

ग्रामीण भागातील रोजगार निर्मितीशेतकऱ्यांना आवश्यक सुविधा आणि ग्रामविकासाला गती देण्याच्या दृष्टीने मंत्री भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात विभागीय आढावा बैठक घेण्यात आली.

मंत्री भरत गोगावले यांनी विविध जिल्ह्यांतील रोजगार हमी योजनेच्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करत सध्या सुरू असलेल्या मनरेगा व मातोश्री ग्राम समृद्धी योजनेंतर्गत कामांचा जिल्हानिहाय आढावा घेतला. यामध्ये रोजगार हमी योजनेतील नोंदणीकृत मजुरांची संख्याप्रत्यक्ष सुरू असलेली कामेप्रलंबित मंजुरीनिधी वापरतसेच शेत/ पाणंद रस्त्यांच्या कामांबाबतची सद्यस्थिती यावर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना मंत्री भरत गोगावले म्हणालेकेंद्र शासनाने व्ही.बी.जी राम जी अधिनियम 2025 पारित केला असला तरी सदर अधिनियम अद्याप अंमलात आलेला नसून मनरेगा योजना पूर्ववत सुरू आहे. त्यामुळे विद्यमान कार्यपद्धतीनुसार सर्व कामे वेळेत आणि नियमबद्ध पद्धतीने पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच केंद्र शासनाकडून मनरेगा कामांसाठी कोणतीही अंतिम कालमर्यादा निश्चित करण्यात आलेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश पशुसंवर्धन सेवेतील ३१०३ अधिकारी पदांसाठी ११ जूनला परीक्षा

 पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

पशुसंवर्धन सेवेतील ३१०३ अधिकारी पदांसाठी ११ जूनला परीक्षा

 

मुंबईदि. ७ राज्यातील पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदांमुळे ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय सेवांवर पडणारा ताण कमी करण्यासाठी या पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्यासाठी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पशुधन विकास अधिकारीमहाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट च्या २ हजार ७९५ आणि सहाय्यक आयुक्तपशुसंवर्धन गट च्या ३०८ पदांसाठी संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ही परीक्षा ११ जून २०२६ रोजी मुंबईछत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे होणार आहे.

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी केले असून संबंधित उमेदवारांची परीक्षा सायंकाळी ५.३० ते ७ या वेळेत होणार असल्याचे नमूद केले आहे. परीक्षेतील गुणांच्या आधारे स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार असून त्यानंतर पुढील निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

 

राज्यातील पशुसंवर्धन विभागात मोठ्या प्रमाणावर अधिकारी रिक्त असल्याने पशुवैद्यकीय सेवापशुधन आरोग्य तपासणीलसीकरण आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्यात अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

 

या निर्णयाबाबत आनंद व्यक्त करताना पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या कीखूप दिवस झाले आपण ज्या अत्यंत आनंदाच्या बातमीची प्रतीक्षा करत आहातती बातमी तुम्हा सर्वांना देण्यासाठी मला आनंद होत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पशुधन विकास अधिकारी गट ’ या पदासाठी २७९५ तर सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन गट ’ या पदासाठी ३०८ जागांच्या परीक्षा घेण्याचा निर्णय झालेला आहे. ११ जून २०२६ रोजी ही परीक्षा आहे. एवढे सर्व अधिकारी पशुसंवर्धन खात्यात रुजू झाल्यानंतर विभागाच्या कामाला मोठा वेग मिळेल. ग्रामीण भागातील लोकांच्या आणि त्यांच्या पशुधनाची अधिक चांगली काळजी घेणे शक्य होईल.

 

            या भरतीमुळे राज्यातील पशुवैद्यकीय यंत्रणेला मोठे बळ मिळणार असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेलअशी अपेक्षा व्यक्त करून या परीक्षेला बसणाऱ्या सर्व परीक्षार्थींना मंत्री पंकजा मुंडे यांनी शुभेच्छा दिल्या.

द्विपक्षीय सहकार्य अधिक प्रभावी करण्यासाठी व्यापार सुलभीकरण, आर्थिक सहकार्य वाढविणे, पायाभूत सुविधा

 द्विपक्षीय सहकार्य अधिक प्रभावी करण्यासाठी व्यापार सुलभीकरणआर्थिक सहकार्य वाढविणेपायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक कनेक्टिव्हिटी मजबूत करणेकौशल्य विकासाला चालना देणे आणि गुंतवणूक प्रक्रियेत अधिक सुलभता आणणे या प्रमुख बाबींवर भर देण्यात येणार असल्याचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी सांगितले. व्यापार क्षेत्रात सहकार्य वाढविण्यासाठी दोन्ही देशांनी एकमेकांच्या अनुभवांचा लाभ घ्यावाअसेही ते म्हणाले. भारतीय उद्योगांना व्हिएतनाममध्ये अधिक गुंतवणूक करण्याचे आणि अनुभव व तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

भारत-व्हिएतनाम आर्थिक भागीदारी नव्या उंचीवर नेण्यासाठी उद्योग क्षेत्राने पुढे यावे

 भारत-व्हिएतनाम आर्थिक भागीदारी नव्या उंचीवर नेण्यासाठी उद्योग क्षेत्राने पुढे यावे

-       राष्ट्राध्यक्ष तो लाम

भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील सर्वंकष आर्थिक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी उद्योगतंत्रज्ञानपायाभूत सुविधा आणि व्यापार क्षेत्रात दोन्ही देशांनी एकत्रितपणे पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी या फोरममध्ये बोलताना केले.

मुंबई हे भारताचे प्रमुख आर्थिक आणि औद्योगिक केंद्र असून येथे आयोजित हा कार्यक्रम भारत-व्हिएतनाम संबंधांना नवी दिशा देणारा असल्याचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी नमूद केले. बदलत्या जागतिक परिस्थितीत आर्थिक सहकार्यजागतिकीकरणातील नव्या संधी आणि विश्वासार्ह भागीदारीचे महत्त्व अधिक वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

भारत-व्हिएतनाम द्विपक्षीय व्यापार सातत्याने वाढत असल्याचे सांगून यामुळे दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध अधिक मजबूत होत असल्याचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी नमूद केले. इलेक्ट्रिक वाहनेपायाभूत सुविधातंत्रज्ञान सेवाऊर्जा आणि उद्योग क्षेत्रात भारत आणि व्हिएतनाम यांच्यात सहकार्याच्या मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक भारतीय उद्योग व्हिएतनाममध्ये विविध क्षेत्रात कार्यरत असून हे सहकार्य भविष्यातील व्यापार आणि उत्पादन क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी स्पष्ट 

मुंबई, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नागपूर, गडचिरोली आदी शहरांमध्ये असलेल्या

 मुंबईनवी मुंबईछत्रपती संभाजीनगरपुणेनागपूरगडचिरोली आदी शहरांमध्ये असलेल्या औद्योगिक संधींबद्दल माहिती देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिएतनामच्या उद्योजकांना उद्योगऊर्जाऔषधनिर्माणमाहिती तंत्रज्ञानपर्यटन अशा विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. मुंबई आणि पुणे येथील औषधनिर्माण क्षेत्र जागतिक दर्जाचे असून व्हिएतनामला परवडणारी जेनेरिक औषधे आणि लसींचा विश्वासार्ह पुरवठा करण्याची क्षमता राज्यात असल्याचेही त्यांनी नमूद केले. महाराष्ट्र-व्हिएतनाम व्यावसायिक परिषद दरवर्षी मुंबई आणि हो चि मिन्ह सिटी येथे आळीपाळीने आयोजित करण्याचाही प्रस्ताव मुख्यमंत्री यांनी मांडला. व्हिएतनामच्या प्रतिनिधींच्या मुंबईतील पहिल्या भेटीबद्दल आनंद व्यक्त करत त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भेटीसाठी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.

Featured post

Lakshvedhi