Sunday, 10 May 2026

ज्येष्ठ नागरिकांसाठी बोधगया येथे तीर्थदर्शनाची संधी

  

ज्येष्ठ नागरिकांसाठी बोधगया येथे तीर्थदर्शनाची संधी

 

मुंबई दि.०८ : मुंबई शहर जिल्ह्यातील जेष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना अंतर्गत बिहार राज्यातील तीर्थक्षेत्र बोधगया येथे दर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही यात्रा ३ ते ९ जून २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. या यात्रेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी २० मे २०२६ पर्यंत सहाय्यक आयुक्तसमाज कल्याणमुंबई शहर या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन मुंबई शहर सहाय्यक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी केले आहे.

 

या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्जदार राज्यातील ज्येष्ठ नागरिक असणे आवश्यक असून त्यांचे वय किमान ६० वर्षे पूर्ण झालेले असावे. लाभार्थ्यांकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. तथापिआधार उपलब्ध नसल्यास अन्य वैध ओळखपत्र देखील स्वीकारले जाणार आहे. तसेच अर्जदार शिधापत्रिका धारक असावा आणि त्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रुपये २.५० लाखांच्या आत असणे आवश्यक आहे. वरील अटी व शर्तींच्या अधीन राहून पात्र ज्येष्ठ नागरिकांकडून अर्ज स्वीकृती करण्यात येणार आहे.

 

या यात्रेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या जेष्ठ नागरिकांनी  २० मे २०२६ पर्यंत सहाय्यक आयुक्तसमाज कल्याणमुंबई शहरप्रशासकीय इमारतभाग-१चौथा मजलाआर. सी. मार्गचेंबूरमुंबई – ४०००७१ या कार्यालयाशी संपर्क साधावाअसे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

टेक-वारी २.० अंतर्गत संस्कृतीरंग · विविध नृत्याविष्कार सादर

 टेक-वारी २.० अंतर्गत संस्कृतीरंग

·        विविध नृत्याविष्कार सादर

 

मुंबईदि. ८ : सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने आयोजित टेक-वारी २.०’ अंतर्गत महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताह’ कार्यक्रमात शेवटच्या दिवशी संस्कृतीरंग कार्यक्रमातून विविध नृत्याविष्कार सादर करण्यात आले.

 

दि. ४ ते ८ मे २०२६ या कालावधीत  ‘टेक- वारी २.०’  अंतर्गत ‘महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताह’ कार्यक्रम झाला. शेवटच्या दिवशी मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात डॉ. संध्या पुरेचा  संगीत नाटक अकादमीच्या टीमने संस्कृतीरंग  कार्यक्रम सादर करून उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांची दाद मिळवली. कार्यक्रमास  सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधामहाराष्ट्र सदन नवी दिल्लीच्या निवासी आयुक्त आर. विमलामुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या पत्नी मिनाक्षी अग्रवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

 

कार्यक्रमात गणेशवंदनशास्त्रीय संगीत नृत्यओडिसीभरतनाट्यमशिवस्तुतीबाल्या,  पंढरपूर वारी यासह विविध अभंगावर नृत्याविष्कार सादर करण्यात आले. सादरीकरणातून भारतीय संस्कृतीची समृद्ध परंपराभावविश्व आणि कलात्मकता प्रभावीपणे उलगडण्यात आली.

विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेतील माहितीसाठी अधिकृतsupport@mahafyjcadmissions.in

 प्रवेश निश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी 26 ते 28 मे दरम्यान संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात उपस्थित राहून कागदपत्र पडताळणी व शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक राहणार आहे. त्यानंतर 29 मे रोजी रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध करण्यात येणार असून30 मे रोजी दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.

 

विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेतील माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावीअसे आवाहन शिक्षण संचालनालयामार्फत करण्यात आले आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी support@mahafyjcadmissions.in या ई-मेलवर संपर्क साधता येणार असून8530955564 हा हेल्पलाईन क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आला आहे.

नियमित कॅप फेरी-1 अंतर्गत नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी, भाग-1 मधील दुरुस्ती तसेच भाग-2 भरण्याची प्रक्रिया

 नियमित कॅप फेरी-1 अंतर्गत नवीन विद्यार्थ्यांची नोंदणीभाग-1 मधील दुरुस्ती तसेच भाग-2 भरण्याची प्रक्रिया 21 आणि 22 मे रोजी होईल. विद्यार्थ्यांना किमान एक आणि कमाल दहा कनिष्ठ महाविद्यालयांना पसंतीक्रम देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कॅप फेरी-1 ची अलॉटमेंट प्रक्रिया 23 ते 26 मे दरम्यान पार पडणार असून26 मे रोजी प्रवेश वाटप यादी जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनद्वारे प्रवेशासाठी वाटप झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयाची माहिती उपलब्ध होणार असूनएसएमएसद्वारेही संदेश पाठविण्यात येणार आहेत.

 

टेक वारी’ उपक्रमामुळे प्रशासन अधिक भविष्यवेधी

 टेक वारी’ उपक्रमामुळे प्रशासन अधिक भविष्यवेधी

-कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

 

कौशल्य विकासरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी टेक वारी’ उपक्रमामुळे प्रशासन अधिक भविष्यवेधी बनत असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य प्रशासन जागतिक स्तरावरील स्पर्धेसाठी सज्ज होत असूनअधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतःला फ्युचर रेडी’ बनविणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

कार्यक्रमात अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांनी प्रास्ताविकात चार मेपासून आयोजित विविध प्रशिक्षण उपक्रमांची माहिती दिली. डीपीडीपीनवीन तंत्रज्ञानसायबर सुरक्षा आणि भविष्यातील महाराष्ट्राच्या विकासासाठी टेक वारीचे महत्त्व याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

 

कर्मयोगी भारत 2 एप्रिल ते १० एप्रिल २०२६ या सप्ताहात वैशिष्ट्यपूर्ण काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना पुरस्कार 

विकसित महाराष्ट्रासाठी तंत्रज्ञान, संस्कृती आणि प्रशासनाचा संगम आवश्यक

 विकसित महाराष्ट्रासाठी तंत्रज्ञानसंस्कृती आणि प्रशासनाचा संगम आवश्यक

-सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

 

सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी टेक वारीची तुलना पंढरपूरच्या वारीशी करताना सांगितले कीवारीमध्ये जशी शिस्तसातत्यअध्यात्म आणि सामूहिकता आहेत्याचप्रमाणे प्रशासनात तंत्रज्ञान आत्मसात करण्याची वृत्ती विकसित होणे आवश्यक आहे. डिजिटल साक्षरता ही आजच्या काळातील खरी साक्षरता बनली असूनप्रशासनातील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांनी नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेतले पाहिजेअसे त्यांनी नमूद केले.

 

ते पुढे म्हणाले की, ‘टेक वारी 2.0’ ही केवळ कार्यशाळा नसून प्रशासनाच्या भविष्यकालीन तयारीचा भाग आहे. विरासत से विकास तक’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार सांस्कृतिक वारसा जपत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकास साधण्याचा हा प्रयत्न आहे. राज्यातील सुमारे पाच हजार कर्मचारी प्रत्यक्ष आणि नऊ लाखांहून अधिक कर्मचारी ऑनलाईन माध्यमातून या उपक्रमाशी जोडले गेले असूनहा देशातील सर्वांत मोठा तंत्रज्ञानाधारित प्रशिक्षण उपक्रम ठरल्याचे त्यांनी सांगितले.

सामान्य प्रशासन विभागाने ‘टेक वारी 2.0’च्या माध्यमातून राज्याच्या प्रशासनाला

 महसूल मंत्री बावनकुळे म्हणालेसामान्य प्रशासन विभागाने टेक वारी 2.0च्या माध्यमातून राज्याच्या प्रशासनाला नवी दिशा देण्याचे कार्य केले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नागरिकांपर्यंत सेवा अधिक प्रभावीपणे पोहोचविण्याचा हा प्रयत्न असूनविविध विभागांमध्ये तंत्रज्ञानाधिष्ठित कार्यपद्धती विकसित करणे ही काळाची गरज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे कार्य करावेअसे आवाहन त्यांनी केले.

Featured post

Lakshvedhi