Wednesday, 15 April 2026

जगातील विविध तज्ज्ञांच्या मते, 2030 च्या दशकाच्या सुरुवातीस क्वांटम संगणन इतके

 अमित सिंघी म्हणाले कीजगातील विविध तज्ज्ञांच्या मते2030 च्या दशकाच्या सुरुवातीस क्वाटम संगण इतके सक्षम होण्याची शक्यता आहे की ते पारंपरिक क्रिप्टोग्राफी मोडू शकतील. याच पार्श्वभूमीवर जगातील अनेक देशांनी ‘पोस्ट-क्वाटम क्रिप्टोग्राफी’कडे वाटचाल सुरू केली आहे. या संक्रमणासाठी सर्वप्रथम संस्थांनी आपल्या प्रणालीतील क्रिप्टोग्राफीचा सखोल आढावा घेणे आवश्यक आहे. त्यानंतर जोखीम मूल्यांकनधोरण आखणीअंमलबजावणी आणि सातत्याने निरीक्षण या टप्प्यांमधून ‘क्वाटम-सेफ’ प्रणाली विकसित करावी लागेल. यामध्ये शासकीय यंत्रणाखाजगी उद्योगशैक्षणिक संस्था आणि आंतरराष्ट्रीय मानक संस्था यांचे समन्वित प्रयत्न आवश्यक ठरणार आहेत.

 

क्वाटम सुरक्षेसाठी राष्ट्रीय स्तरावर जनजागृतीसशक्त प्रशासकीय यंत्रणातांत्रिक क्षमता विकाससंशोधन आणि नवोन्मेष यांना प्राधान्य देणे गरजेचे असून भविष्यातील सायबर सुरक्षेचा पाया आजच मजबूत करणे ही काळाची गरज असून त्यासाठी तातडीने ठोस पावले उचलण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केल.

क्वांटम संगणन ही केवळ तांत्रिक क्रांती नसून आर्थिक, औद्योगिक आणि सुरक्षेच्या दृष्टीनेही महत्त्वाची

 क्वांटम संगणन ही केवळ तांत्रिक क्रांती नसून आर्थिकऔद्योगिक आणि सुरक्षेच्या दृष्टीनेही महत्त्वाची ठरणार आहे. योग्य वेळी पावले उचलल्यास भारताला या क्षेत्रात आघाडी घेण्याची मोठी संधी उपलब्ध असल्याचे मत सिंघी यांनी यावेळी व्यक्त केले.

 

अमित सिंघी म्हणाले कीक्वाटम संगणनाचा वापर रसायनशास्त्रऔषधनिर्मितीशेतीलॉजिस्टिक्समशीन लर्निंग तसेच हवामान अंदाज यांसारख्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. विशेषतः जटिल गणिती समस्या सोडविणेमोठ्या प्रमाणातील डेटामधून नमुने शोधणे आणि प्रथिनांच्या रचनेचा अभ्यास करणे यामध्ये या तंत्रज्ञानामुळे मोठी क्रांती अपेक्षित आहे. आर्थिक क्षेत्रातही क्वाटम संगणनामुळे अचूक अंदाज बांधण्याची क्षमता वाढत असून काही उदाहरणांमध्ये 30 टक्क्यांहून अधिक अचूकता सुधारणा झाल्याचे सांगण्यात आले.

 

जागतिक स्तरावर क्वाटम संशोधनात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असताना भारतात या क्षेत्रात अधिक लक्ष देण्याची गरज आहे. 2035 पर्यंत भारताला ‘क्वाटम सक्षम अर्थव्यवस्था’ बनविण्याचे उद्दिष्ट भारत सरकारने ठेवले असून त्यासाठी रोडमॅप तयार करण्यात आल्याचे  सिंघी यांनी यावेळी सांगितले.

क्वांटम संगणन तंत्रज्ञानामुळे सायबर सुरक्षेसमोर नवे आव्हान

 क्वाटम संगणन तंत्रज्ञानामुळे सायबर सुरक्षेसमोर नवे आव्हान

                                                – आयबीएमचे संशोधन संचालक अमित सिंघी

 

मुंबईदि. 15 : आगामी काही वर्षांत संगणक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठे बदल घडवून आणण्याची क्षमता असलेले क्वांटम संगणन वेगाने विकसित होत असून जागतिक स्तरावर संशोधन व गुंतवणूक झपाट्याने वाढत आहे. या प्रगतीमुळे भविष्यातील सायबर सुरक्षेसमोर गंभीर आव्हाने उभी राहत असून यासाठी ‘क्वाटम-सेफ’ म्हणजेच क्वाटम-सुरक्षित धोरणात्मक सज्जता आवश्यक असल्याचे मत आयबीएम रिसर्चचे संचालक अमित सिंघी यांनी व्यक्त केले.

 

जागतिक क्वाटम दिनानिमित्त माहिती तंत्रज्ञान विभागाच्या वतीने आयोजित परिषदेत क्वाटम सुरक्षा आणि धोरणात्मक सज्जता या विषयावर संचालक  सिंघी बोलत होते. यावेळी राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवालमाहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव विरेंद्र सिंगमहाआयटीचे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर आदी उपस्थित होते. यावेळी क्वॉंटम संगणक विषयातील जागतिक पातळीवरील घडामोडीधोके आणि भारतासाठीच्या संधी यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

क्वांटम तंत्रज्ञानामुळे भविष्यातील प्रशासनात आमूलाग्र बदल

 क्वांटम तंत्रज्ञानामुळे भविष्यातील प्रशासनात आमूलाग्र बदल

– सचिव विरेंद्र सिंह

 

क्वांटम विज्ञान आता केवळ सैद्धांतिक किंवा प्रयोगशाळेपुरते मर्यादित राहिलेले नाहीतर ते प्रत्यक्ष जीवनातील उपयोगाकडे वेगाने वाटचाल करत आहे. संप्रेषणआरोग्यवित्तऊर्जा आणि विशेषतः राष्ट्रीय सुरक्षेसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये क्वांटम तंत्रज्ञान परिवर्तन घडवू शकते. यामुळे प्रशासनराष्ट्रीय सुरक्षा आणि विविध क्षेत्रांमध्ये मोठे परिवर्तन घडणार असल्याचे माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव विरेंद्र सिंह यांनी सांगितले.

क्वांटम संगणनक्वांटम क्रिप्टोग्राफी आणि क्वांटम सेन्सिंग या तंत्रज्ञानामुळे सध्याच्या तांत्रिक मर्यादा बदलण्याची क्षमता निर्माण होत आहे. मात्रयाचबरोबर धोरणनिर्मात्यांसमोर मोठी जबाबदारीही निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.

क्वांटम तंत्रज्ञानामुळे संगणन, सुरक्षितता व संशोधन क्षेत्रात मोठे परिवर्तन

 क्वांटम तंत्रज्ञानामुळे संगणनसुरक्षितता व संशोधन क्षेत्रात मोठे परिवर्तन

- मुख्य सचिव राजेश अग्रवाल

 

क्वांटम तंत्रज्ञानामुळे संगणनसायबर सुरक्षितताऔषधनिर्मिती आणि शेतीसारख्या विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर परिवर्तन घडणार असूनमहाराष्ट्र शासन या क्षेत्रात सक्रियपणे काम करत असल्याचे राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सांगितले.

क्वांटम संगणन पारंपरिक संगणनापेक्षा वेगळ्या पद्धतीने कार्य करत असूनक्यूबिट्सच्या साहाय्याने एकाच वेळी अनेक गणना करण्याची क्षमता त्यात आहे. त्यामुळे गुंतागुंतीच्या समस्यांचे निराकरण अत्यल्प वेळेत करता येतेअसे त्यांनी सांगितले.

क्वांटम सुपरपोजिशनमुळे क्यूबिट एकाच वेळी शून्य आणि एक या दोन्ही स्थितीत राहू शकतोज्यामुळे संगणनाची गती घातांकी वाढते. याचा उपयोग औषध शोधकृषी संशोधन आणि विविध औद्योगिक प्रक्रियांमध्ये होणार आहेक्वांटम इनटँगलमेंट ही संकल्पना सुरक्षित संप्रेषणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असूनभविष्यातील क्वांटम कम्युनिकेशन प्रणालींमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर होणार आहे. सध्याच्या क्रिप्टोग्राफी प्रणालींवर क्वांटम संगणनाचा प्रभाव पडू शकतोमात्र त्याचवेळी क्वांटम आधारित सुरक्षितता उपाय विकसित होत असल्याचे  मुख्य सचिव अग्रवाल यांनी सांगितले.

भारतामध्ये तसेच जागतिक स्तरावर क्वांटम संशोधन वेगाने प्रगती करत असून, 50 ते 100 क्यूबिट क्षमतेच्या प्रणाली विकसित होत आहेत. काही प्रगत संगणकांनी अत्यंत जटिल समस्या अल्पावधीत सोडविल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र शासनाने या क्षेत्रासाठी निधी उपलब्ध करून दिला असूनविविध संशोधन संस्थाशैक्षणिक संस्था आणि उद्योग क्षेत्र यांच्यासोबत सहकार्याने काम सुरू आहे. पुणे आणि मुंबई येथील प्रमुख संस्था या संशोधनात आघाडीवर असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेचकेंद्र सरकारकडूनही स्टार्टअप्स आणि खाजगी कंपन्यांना प्रोत्साहन दिले जात असल्याचे मुख्य सचिव अग्रवाल यांनी सांगितले

क्वांटम तंत्रज्ञान हे केवळ सायन्स फिक्शन राहिलेले नाही, तर संगणक, संवाद

 माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.शेलार म्हणाले कीक्वांटम तंत्रज्ञान हे केवळ सायन्स फिक्शन राहिलेले नाहीतर संगणकसंवाद व्यवस्थाआरोग्यवित्त आणि राष्ट्रीय सुरक्षेसारख्या क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवणारे पुढील पाऊल आहे. पारंपरिक संगणकातील ‘बिट्स’पासून ‘क्युबिट्स’पर्यंत झालेला प्रवास हा तंत्रज्ञानातील मोठा टप्पा असल्याचे त्यांनी सांगितले.

क्वांटमची संकल्पना सोप्या शब्दांत स्पष्ट करताना मंत्री ॲड.शेलार यांनी ‘परिमाण आणि मापन’ यावर आधारित उदाहरण दिले. नकाशावर दिसणारे अंतर आणि प्रत्यक्षातील अंतर यातील फरक समजून घेण्याची मानवी क्षमता हीच पुढे क्वांटम तंत्रज्ञानाच्या रूपात विकसित झाल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री ॲड.शेलार यांनी उद्योग क्षेत्र आणि तरुणांना या क्वांटम क्रांतीत सहभागी होण्याचे आवाहन करत शासनाकडून आवश्यक पायाभूत सुविधाप्रोत्साहन आणि सहकार्य उपलब्ध करून दिले जाईलअसे सांगितले. तसेच तंत्रज्ञानावर आपण आरूढ झालो नाहीतर तंत्रज्ञान आपल्यावर आरूढ होईलअसे सांगून त्यांनी क्वांटम युगात सक्रिय सहभागाची गरज व्यक्त 

आयआयटी बॉम्बे येथे 720 कोटी रुपयांची क्वांटम फॅब्रिकेशन सुविधा

 आयआयटी बॉम्बे येथे 720 कोटी रुपयांची क्वांटम फॅब्रिकेशन सुविधा

- माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार


· क्वांटम तंत्रज्ञानात महाराष्ट्र जागतिक नेतृत्वाकडे

मुंबई, दि. 15 : प्रधानमंत्री नरेंद मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2023 मध्ये 6000 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय क्वांटम मिशनची सुरुवात झाली. त्यामुळे देशाच्या क्वांटम क्षेत्रातील प्रगतीस मोठा वेग मिळाला. त्याचबरोबर, महाराष्ट्र शासनानेही या क्षेत्रात पुढाकार घेत ‘महाराष्ट्र क्वांटम टेक्नॉलॉजी मिशन’ सुरू केले असून, उद्योग-सिद्ध मनुष्यबळ तयार करण्यावर भर दिला जात आहे. त्यात आयआयटी बॉम्बे येथे 720 कोटी रुपयांची क्वांटम फॅब्रिकेशन सुविधा उभारली जात असून, ही भारतातील पहिली फुल-स्टॅक क्वांटम हार्डवेअर प्रणाली ठरणार आहे. तसेच टाटा कन्स्ल्टन्सी सर्व्हिसेस आणि आयआयटी बॉम्बे यांच्या सहकार्याने देशातील पहिल्या क्वांटम डायमंड मायक्रोचिप इमेजरवर काम सुरू आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही काही कंपन्यांनी हजारो किलोमीटर अंतरावर हॅक-प्रूफ क्वांटम कम्युनिकेशनमध्ये यश मिळवले आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिली.

Featured post

Lakshvedhi