Wednesday, 15 April 2026

क्वांटम संगणन तंत्रज्ञानामुळे सायबर सुरक्षेसमोर नवे आव्हान

 क्वांटम संगणन तंत्रज्ञानामुळे सायबर सुरक्षेसमोर नवे आव्हान

                                                – आयबीएमचे संशोधन संचालक अमित सिंघी

 

मुंबई, दि. 15 : आगामी काही वर्षांत संगणक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठे बदल घडवून आणण्याची क्षमता असलेले क्वांटम संगणन वेगाने विकसित होत असून जागतिक स्तरावर संशोधन व गुंतवणूक झपाट्याने वाढत आहे. या प्रगतीमुळे भविष्यातील सायबर सुरक्षेसमोर गंभीर आव्हाने उभी राहत असून यासाठी ‘क्वांटम-सेफ’ म्हणजेच क्वांटम-सुरक्षित धोरणात्मक सज्जता आवश्यक असल्याचे मत आयबीएम रिसर्चचे संचालक अमित सिंघी यांनी व्यक्त केले.

 

जागतिक क्वांटम दिनानिमित्त माहिती तंत्रज्ञान विभागाच्या वतीने आयोजित परिषदेत क्वांटम सुरक्षा आणि धोरणात्मक सज्जता या विषयावर संचालक  सिंघी बोलत होते. यावेळी राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव विरेंद्र सिंग, महाआयटीचे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर आदी उपस्थित होते. यावेळी क्वॉंटम संगणक विषयातील जागतिक पातळीवरील घडामोडी, धोके आणि भारतासाठीच्या संधी यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi