Wednesday, 15 April 2026

क्वांटम तंत्रज्ञानामुळे भविष्यातील प्रशासनात आमूलाग्र बदल

 क्वांटम तंत्रज्ञानामुळे भविष्यातील प्रशासनात आमूलाग्र बदल

– सचिव विरेंद्र सिंह

 

क्वांटम विज्ञान आता केवळ सैद्धांतिक किंवा प्रयोगशाळेपुरते मर्यादित राहिलेले नाही, तर ते प्रत्यक्ष जीवनातील उपयोगाकडे वेगाने वाटचाल करत आहे. संप्रेषण, आरोग्य, वित्त, ऊर्जा आणि विशेषतः राष्ट्रीय सुरक्षेसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये क्वांटम तंत्रज्ञान परिवर्तन घडवू शकते. यामुळे प्रशासन, राष्ट्रीय सुरक्षा आणि विविध क्षेत्रांमध्ये मोठे परिवर्तन घडणार असल्याचे माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव विरेंद्र सिंह यांनी सांगितले.

क्वांटम संगणन, क्वांटम क्रिप्टोग्राफी आणि क्वांटम सेन्सिंग या तंत्रज्ञानामुळे सध्याच्या तांत्रिक मर्यादा बदलण्याची क्षमता निर्माण होत आहे. मात्र, याचबरोबर धोरणनिर्मात्यांसमोर मोठी जबाबदारीही निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi