Saturday, 11 April 2026

खानवडीत ‘ज्योती-सावित्री जिल्हा परिषद शाळेचे’मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

 खानवडीत ज्योती-सावित्री जिल्हा परिषद शाळेचेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

महिलांना लोकसभेत आणि विधानसभेत आरक्षणदेण्याचा निर्णय हे महात्मा फुले यांना खरे अभिवादन

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            पुणे, दि. 11 एप्रिल (जिमाका वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना लोकसभा व विधानसभेत 33 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असून तो महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्त्री-शिक्षण व महिला सक्षमीकरणाच्या विचारांना अनुरूप असून त्यांना खरी आदरांजली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांचे मुळगाव खानवडी (ता. पुरंदर) येथे पुणे जिल्हा परिषदेकडून उभारण्यात आलेल्या ज्योती-सावित्री जिल्हा परिषद शाळेचे’ उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण मंत्री दादाजी भुसे, कृषि मंत्री दत्तात्रय भरणे, अल्पसंख्याक मंत्री अतुल सावे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, शिक्षण राज्यमंत्री योगेश कदम आदी उपस्थित होते.

नारी शक्तीः विकसित भारत की आवाज’ या विषयावर आधारित महिला युवा संसद हा कार्यक्रमाचा

 नारी शक्तीः विकसित भारत की आवाज’ या विषयावर आधारित महिला युवा संसद हा कार्यक्रमाचा विशेष भाग असेल. या सत्रात महिला सहभागी महिला आरक्षण विधेयकावर संसदीय पद्धतीने चर्चा करतील. पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी 12 एप्रिलच्या सायंकाळी भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या सहकार्याने संडे ऑन सायकल’ हा उपक्रम नेरूळ येथील डॉ.डी.वाय. पाटील स्टेडियम येथे आयोजित करण्यात येणार आहे. 

 

13 एप्रिल 2026 रोजी निवडलेल्या  911 सहभागींचा केंद्रीय अर्थसंकल्पातील विविध क्षेत्रांवर सखोल संवाद होईल. राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील गुणवंत विद्यार्थ्यांसह हा संवाद होणार आहे.

सहभागी होऊन केंद्रीय अर्थसंकल्प 2026 शी निगडित विषयांवर

 अमित पुंडे यांनी सांगितले कीया महत्त्वपूर्ण कार्यक्रमात देशभरातून राष्ट्रीय स्पर्धेतून निवड झालेले उत्कृष्ट युवा सहभागी एकत्र येणार आहेत. दोन दिवसीय विचारमंथन सत्रात शिक्षणतज्ज्ञउद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विषयविशेषज्ञ सहभागी होऊन केंद्रीय अर्थसंकल्प 2026 शी निगडित विषयांवर चर्चा करतील. देशभरातील 17 ठिकाणांहून 15,000 हून अधिक युवक या संवादात सहभागी होणार आहेत. 

 

देशभरातून 12 लाखांहून अधिक युवकांनी सहभाग नोंदवला असून 46,500 पेक्षा अधिक निबंध प्राप्त झाले आहेत. मुंबईतील अंतिम फेरीत सहभागी युवक विकसित कृषी ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शेतकरी कल्याण बळकटीकरण तसेच मानवी संसाधन शिक्षणकौशल्य विकास आणि रोजगार या विषयांवर चर्चा पुढे नेतील. 12 एप्रिल रोजी सहभागींचे आगमन व नोंदणी होईल आणि दुपारी महिला युवा संसद आयोजित केली जाईल. 13 एप्रिल रोजी उद्‌घाटन समारंभमाय भारत सत्र आणि दोन तज्ज्ञ पॅनल चर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे.

माय भारत बजेट क्वेस्ट 2026 ची अंतिम फेरी मुंबई येथे 12 व 13 एप्रिल रोजी ‘नारी शक्तीः विकसित भारताचा आवाज’ थीमवर माय भारत बजेट केस्ट 2026 अंतिम फेरीत महिला युवा संसद चे आयोजन

  

माय भारत बजेट क्वेस्ट 2026 ची अंतिम फेरी मुंबई येथे 12 व 13 एप्रिल रोजी

 

  • नारी शक्तीः विकसित भारताचा आवाज’ थीमवर माय भारत बजेट केस्ट 2026
  • अंतिम फेरीत महिला युवा संसद चे आयोजन

 

मुंबई, दि. 11 - भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत माय युवा भारत द्वारे माय भारत बजेट क्वेस्ट 2026 मुंबई झोनच्या अंतिम फेरीची घोषणा करण्यात आली आहे. या झोनमध्ये महाराष्ट्रगोवा आणि पुदुच्चेरीचा समावेश आहे. ही दोन दिवसीय अंतिम फेरी 12 व 13 एप्रिल 2026 दरम्यान नवी मुंबईतील नेरूळ येथील डॉ.डी.वाय. पाटील विद्यापीठ येथे आयोजित करण्यात आली आहेअशी माहिती माय युवा भारत महाराष्ट्र व गोवा चे राज्य संचालक अमित पुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माय युवा भारत मुंबई चे उपसंचालक अनुप इंगोले उपस्थित होते. 

बोरिवलीतील बीएसएनएल व एमटीएनएलची आरक्षित जागा पीएम आवास योजनेसाठी घेण्यास मान्यता

 बोरिवलीतील बीएसएनएल व एमटीएनएलची आरक्षित जागा

पीएम आवास योजनेसाठी घेण्यास मान्यता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. १० : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत परवडणारी घरे बांधण्यासाठी बोरिवली येथील भारत संचार निगम लि. (बीएसएनएल) व महानगर टेलिफोन निगम (एमटीएनएल) यांच्या मालकीची आरक्षित जागा रेडीरेकनर दरानुसार घेण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली.

 

महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात झाली. यावेळी गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्तामित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशीमहामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी त्र्यंबक कासारसंचालक (प्रशासन) प्रवीण कोळीतांत्रिक संचालक अभिजित लोंढेसहायक अधिकारी शिरतेज रसाळ आदी यावेळी उपस्थित होते.

जिवन गाणे खूप छान कविता आहे , जरूर वाचा ... 🙏 💐 *शरीर मृत होण्या आधीच आलिंगन द्यावे* *भुत होऊन जगण्यापेक्षा माणूस म्हणून अजरामर व्हावे.* 💐 💐 *आयुष्य खूप छोटं आहे* *भांडत नका बसू* *डोक्यात राग भरल्यावर* *फुटणार कसं हसू ?*💐 💐 *अहंकार बाळगू नका* *भेटा बसा बोला* *मेल्यावर रडण्यापेक्षा* *जिवंतपणी बोला* 💐 💐 *नातं आपलं कोणतं आहे* *महत्वाचे नाही* *प्रश्न आहे कधीतरी* *गोड बोलतो का नाही ?*💐 💐 *चुका शोधत बसाल तर* *सुख मिळणार नाही* *चूक काय बरोबर काय* *कधीच कळणार नाही* 💐 💐 *काहीतरी खुसपट काढून उगीच नका रुसू* *आयुष्य खूप छोटं आहे* *भांडत नका बसू .....ll 1 ll*💐 💐 *चल निघ चालता हो* *इथे थांबू नको* *हात जोडून विनंती आहे* *अशी भाषा नको*💐 💐 *दारात पाय नको ठेऊ* *तोंड नाही पहाणार* *खरं सांगा असं वागून* *कोण सुखी होणार ?*💐 💐 *तू तिकडे आम्ही इकडे* *म्हणणं सोपं असतं* *पोखरलेलं मन कधीच* *सुखी होत नसतं*💐 💐 *सुखाचा अभास म्हणजे* *खरं सुख नाही* *आपलं माणूस आपलं नसणे* *दुसरं दुःख नाही* 💐 💐 *करमत नाही घरी म्हणून गाळू नका आसु* *आयुष्य खूप छोटं आहे* *भांडत नका बसू ....ll 2 ll*💐 💐 *एकतर्फी प्रेम करून* *उपयोग आहे का ?* *समोरच्याला आपली आठवण* *कधी तरी येते का ?*💐 💐 *नातं टिकलं पाहिजे असं* *दोघांनाही वाटावं* *कधी गायीने कधी वासराने* *एकमेकाला चाटावं*💐 💐 *तुमची काहीच चूक नाही* *असं कसं असेल* *पारा शांत झाल्यावरच* *सत्य काय ते दिसेल*💐 💐 *बघा जरा एकांतात* *डोळे मिटून आत* *चूक कबूल करतांना* *जोडताल दोन्ही हात*💐 💐 *अंधारात अश्रू ढाळत खरंच नका बसू* *आयुष्य खूप छोटं आहे भांडत नका बसू .....ll 3 ll*💐 💐 *दुसऱ्याला दोष देणं* *खूप सोपं असतं* *वेळ आल्यावर कळतं की* *कुणी कुणाचं नसतं*💐 💐 *भेटत नाहीत बोलत नाहीत* *गुन्हा तरी काय ?* *जे वाटतं ते बोलून* *रड धाय धाय*💐 💐 *शक्य आहे ताण जाऊन* *वाटेल हलकं हलकं* *गुळणी धरून बसू नका* *व्हा थोडं बोलकं*💐 💐 *कोण चूक कोण बरोबर* *हिशोब करून टाका* *प्रत्येक क्षण जगून घ्या* *घालवू नका मोका*💐 💐 *त्याच त्याच गोष्टींचे पत्ते नका पिसू* *आयुष्य खूप छोटं आहे भांडत नका बसू ....ll 4 ll*💐 💐 *आपली मतं दुसऱ्यावर* *मुळीच लादू नका* *समोरच्या व्यक्तीचा* *अंत बघू नका*💐 💐 *कोणताही विषय असो* *जास्त नका ताणू* *मीच शहाणा बाकी मूर्ख* *असे नका मानू*💐 💐 *कोण म्हणतं गोड बोलून* *प्रश्न सुटत नाही* *अनेकदा समजूतदार* *माणूस भेटत नाही*💐 💐 *जिभेवर साखर ठेवा* *होणार नाही वाद* *आवडल्यावर मनातून* *द्या की हो दाद*💐 💐 *तडतड बोलून उगीच मनं नका नासु* *आयुष्य खूप छोटं आहे* *भांडत नका बसू ....ll 5 ll*💐 💐 *बचतच कामी येते* *खर्च कमी कर* *जरी मोठा झालास तरी* *रहा जमिनीवर*💐 💐 *विचार करून पाऊल टाका, कुठे नका फसू* *आयुष्य खूप छोटं आहे* *भांडत नका बसू ....ll 6 ll*💐 💐 *ठीक आहे चूक नाही* *तरीही जुळतं घ्या* *बॉडी डेड होण्या आधीच* *आलिंगन द्या*💐 💐 *स्मशानभूमीत चांगलं बोलून* *काय उपयोग आहे* *जिवंतपणी कसे वागलात* *जास्त महत्वाचं आहे*💐 💐 *माझ्या कवितेत कोणतंही* *तत्वज्ञान नाही* *तुम्ही खुशाल म्हणू शकता* *कवीला भान नाही*💐 💐 *ठीक आहे तुमचा आरोप* *मान्य आहे मला* *माझं म्हणणं एवढंच आहे* *वाद नको बोला* 💐 💐💐💐💐 *काय माहीत उद्या आपण असू किंवा नसू* *आयुष्य खूप छोटं आहे* *भांडत नका बसू ...ll 7 ll* *नुसते वाचून सोडू नका यात आपण कुठे बसतोय यावर विचार करा.* *आपलं नातं कसं एल आय सी सारखं* *जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी* 🙏🙏🙏

 खूप छान कविता आहे , जरूर वाचा ... 🙏


💐 *शरीर मृत होण्या आधीच आलिंगन द्यावे* 

*भुत होऊन जगण्यापेक्षा माणूस म्हणून अजरामर व्हावे.* 💐


💐 *आयुष्य खूप छोटं आहे*

*भांडत नका बसू* 

*डोक्यात राग भरल्यावर* 

*फुटणार कसं हसू ?*💐


💐 *अहंकार बाळगू नका* 

*भेटा बसा बोला* 

*मेल्यावर रडण्यापेक्षा*

*जिवंतपणी बोला* 💐


💐 *नातं आपलं कोणतं आहे*

*महत्वाचे नाही*

*प्रश्न आहे कधीतरी*

*गोड बोलतो का नाही ?*💐


💐 *चुका शोधत बसाल तर*

*सुख मिळणार नाही* 

*चूक काय बरोबर काय*

*कधीच कळणार नाही* 💐


💐 *काहीतरी खुसपट काढून उगीच नका रुसू*

*आयुष्य खूप छोटं आहे*

*भांडत नका बसू .....ll 1 ll*💐


💐 *चल निघ चालता हो*

*इथे थांबू नको*

*हात जोडून विनंती आहे*

*अशी भाषा नको*💐


💐 *दारात पाय नको ठेऊ* 

*तोंड नाही पहाणार* 

*खरं सांगा असं वागून* 

*कोण सुखी होणार ?*💐


💐 *तू तिकडे आम्ही इकडे*

*म्हणणं सोपं असतं*

*पोखरलेलं मन कधीच* 

*सुखी होत नसतं*💐


💐 *सुखाचा अभास म्हणजे* 

*खरं सुख नाही* 

*आपलं माणूस आपलं नसणे*

*दुसरं दुःख नाही* 💐


💐 *करमत नाही घरी म्हणून गाळू नका आसु*

*आयुष्य खूप छोटं आहे*

*भांडत नका बसू ....ll 2 ll*💐


💐 *एकतर्फी प्रेम करून*

*उपयोग आहे का ?*

*समोरच्याला आपली आठवण*

*कधी तरी येते का ?*💐


💐 *नातं टिकलं पाहिजे असं*

*दोघांनाही वाटावं*

*कधी गायीने कधी वासराने* 

*एकमेकाला चाटावं*💐


💐 *तुमची काहीच चूक नाही* 

*असं कसं असेल* 

*पारा शांत झाल्यावरच* 

*सत्य काय ते दिसेल*💐 


💐 *बघा जरा एकांतात*

*डोळे मिटून आत*

*चूक कबूल करतांना*

*जोडताल दोन्ही हात*💐


💐 *अंधारात अश्रू ढाळत खरंच नका बसू*

*आयुष्य खूप छोटं आहे भांडत नका बसू .....ll 3 ll*💐


💐 *दुसऱ्याला दोष देणं*

*खूप सोपं असतं*

*वेळ आल्यावर कळतं की*

*कुणी कुणाचं नसतं*💐


💐 *भेटत नाहीत बोलत नाहीत*

*गुन्हा तरी काय ?*

*जे वाटतं ते बोलून*

*रड धाय धाय*💐


💐 *शक्य आहे ताण जाऊन*

*वाटेल हलकं हलकं*

*गुळणी धरून बसू नका*

*व्हा थोडं बोलकं*💐


💐 *कोण चूक कोण बरोबर*

*हिशोब करून टाका*

*प्रत्येक क्षण जगून घ्या*

*घालवू नका मोका*💐


💐 *त्याच त्याच गोष्टींचे पत्ते नका पिसू*

*आयुष्य खूप छोटं आहे भांडत नका बसू ....ll 4 ll*💐


💐 *आपली मतं दुसऱ्यावर*

*मुळीच लादू नका*

*समोरच्या व्यक्तीचा*

*अंत बघू नका*💐


💐 *कोणताही विषय असो*

*जास्त नका ताणू*

*मीच शहाणा बाकी मूर्ख*

*असे नका मानू*💐


💐 *कोण म्हणतं गोड बोलून*

*प्रश्न सुटत नाही*

*अनेकदा समजूतदार*

*माणूस भेटत नाही*💐


💐 *जिभेवर साखर ठेवा*

*होणार नाही वाद*

*आवडल्यावर मनातून*

*द्या की हो दाद*💐


💐 *तडतड बोलून उगीच मनं नका नासु*

*आयुष्य खूप छोटं आहे*

*भांडत नका बसू ....ll 5 ll*💐


💐 *बचतच कामी येते*

*खर्च कमी कर*

*जरी मोठा झालास तरी*

*रहा जमिनीवर*💐


💐 *विचार करून पाऊल टाका, कुठे नका फसू*

*आयुष्य खूप छोटं आहे*

*भांडत नका बसू ....ll 6 ll*💐


💐 *ठीक आहे चूक नाही* 

*तरीही जुळतं घ्या* 

*बॉडी डेड होण्या आधीच* 

*आलिंगन द्या*💐


💐 *स्मशानभूमीत चांगलं बोलून*

*काय उपयोग आहे* 

*जिवंतपणी कसे वागलात*

*जास्त महत्वाचं आहे*💐


💐 *माझ्या कवितेत कोणतंही*

*तत्वज्ञान नाही* 

*तुम्ही खुशाल म्हणू शकता*

*कवीला भान नाही*💐


💐 *ठीक आहे तुमचा आरोप*

*मान्य आहे मला*

*माझं म्हणणं एवढंच आहे*

*वाद नको बोला* 💐


💐💐💐💐

*काय माहीत उद्या आपण असू किंवा नसू*

*आयुष्य खूप छोटं आहे*

*भांडत नका बसू ...ll 7 ll*


*नुसते वाचून सोडू नका यात आपण कुठे बसतोय यावर विचार करा.*

*आपलं नातं कसं एल आय सी सारखं*

*जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी*

 🙏🙏🙏

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किटचे औपचारिक उद्घाटन १३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी वैशिष्ट्य

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किटचे औपचारिक उद्घाटन १३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

 

पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे म्हणाले कीचैत्यभूमीमुक्तीभूमीदीक्षाभूमी सारखी ठिकाणे फक्त धार्मिक स्थळे नसून या ठिकाणांना सामाजिक परिवर्तनाचे महत्त्व आहे. टूर सर्कीट सहल या उपक्रमाद्वारे समतेचा संदेश सर्वदूर पोहोचविण्याचा आमचा मुख्य हेतू आहे. नव्या पिढीला सदर टूर सर्कीट सहलीमधून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक योगदानत्यांचे विचार जवळून अनुभवता येतील. या उपक्रमामध्ये अधिकाधिक पर्यटक सहभागी होतील असा आम्हाला विश्वास आहे.

 

पर्यटन संचालक डॉ. बी.एन.पाटील म्हणाले कीभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारत्यांचे कार्य आजही लाखो लोकांना प्रेरणा देतात. हेच लक्षात घेता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त टूर सर्कीट सहलीचा उपक्रम पर्यटन विभागाने हाती घेतला आहे. यासाठी पर्यटन विभागाने सखोल नियोजन केले आहे. या टूर सर्कीट सहलीद्वारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहासत्यांचे कार्य व विचार समजून घेण्यास पर्यटकांना मदत होईल.

 

टूर सर्कीटची वैशिष्ट्ये

आयोजनाची ठिकाणे – मुंबई नाशिक आणि नागपूर

कालावधी  दि. 13 व 14 एप्रिल2026

सुविधा  प्रत्येक शहरात दोन बसेसद्वारे सहलटूर मार्गदर्शकअल्पोपहारपिण्याचे पाणी

 

सहलीसाठी संपर्क 

मुंबईसाठी संपर्क - पवन पवार : 7666603211सूरज चतुर्वैदी : 8108175530

नाशिकसाठी संपर्क  तुषार शिंदे : 9890255157ऋषिकेश चव्हाण : 8806841468

नागपूरसाठी संपर्क - अविनाश गजघाटे : 9823111203

0000

Featured post

Lakshvedhi