Saturday, 7 March 2026

फिनलंड प्रत्येक क्षेत्रात भारतासोबत काम करण्यास तयार आहे. पायाभूत सुविधांमध्ये होत आलेल्या

 अध्यक्ष अलेक्झांडर स्टब म्हणालेनवी दिल्ली येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीपरराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्याशी चर्चा झाली. मागील काही वर्षांपासून भारतात मोठ्या प्रमाणावर विकासाचे वारे वाहत आहेत. प्रत्येक क्षेत्रात भारताने नेत्रदीपक प्रगती केली आहे. फिनलंड प्रत्येक क्षेत्रात भारतासोबत काम करण्यास तयार आहे. पायाभूत सुविधांमध्ये होत आलेल्या सुधारणा हे त्याचेच प्रतीक आहे. फिनलंडचा जीडीपी (ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्शन) हे आपल्या राज्याच्या बजेटपेक्षा कमी आहे. मात्र खाजगी क्षेत्राच्या सहकार्याने ते वाढविण्याचा प्रयत्न आहे. 

पर्यावरणाचे संवर्धन करीत शाश्वत विकासाचे ध्येय गाठण्यासाठी दोन्ही देशांनी सोबत काम करणे आवश्यक आहे. प्रगतीसाठी क्वांटम कम्प्युटिंगसुपर कम्प्युटिंगसंशोधननावोन्मेष यांच्यासह नवीनीकरणीय ऊर्जाहरित ऊर्जा क्षेत्रात परिवर्तन झाले पाहिजे. युरोप भारतासोबत मुक्त व्यापार करीत आहे. यावरून भारताचे जागतिक पातळीवर असलेले महत्व विषद होतेअसेही अध्यक्ष अलेक्झांडर स्टब म्हणाले. यावेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय टी- ट्वेन्टी क्रिकेट जागतिक स्पर्धेतील अंतिम सामन्यासाठी भारतीय क्रिकेट संघाला शुभेच्छाही दिल्या. 

यावेळी मुंबईतील फिनलंडचे कॉन्सिलेट जनरल एरिक अफ हॅलोस्ट्रॉम यांनी सूत्र संचालन केले. तसेच नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष चौहानमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे मुख्य गुंतवणूक अधिकारी डॉ शंकर देशपांडेतसेच फिनलंड येथील काही कंपन्यांचे प्रतिनिधींनी विचार व्यक्त केले. 

 


भारत व फिनलंड येथील कंपन्यांच्या प्रतिनिधीसोबत चर्चा भारत हा जगातील वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था

 भारत व फिनलंड येथील कंपन्यांच्या प्रतिनिधीसोबत चर्चा


भारत हा जगातील वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था

मुंबईदि. 7: भारत आणि फिनलंड यांच्यातील दीपक्षीय संबंध दृढ आहे. या दौऱ्यामुळे  हे  संबंध अधिक दृढ होणार आहे. भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. फिनलंडला शाश्वत विकासासाठी भारताचे सहकार्य आवश्यक असल्याची बाब फिनलंडचे अध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांनी अधोरेखित केली.

फिनलंडचे अध्यक्ष अलेक्झांडर स्टब मागील तीन ते चार दिवसांपासून भारताच्या दौऱ्यावर आहेत. हॉटेल ताज पॅलेस येथे भारत आणि फिनलंड येथील विविध कंपन्यांच्या प्रतिनिधीसोबत अध्यक्ष श्री. स्टब यांच्या संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फिनलंडचे रोजगार मंत्री मॅटियास मार्टिनेननॅशनल स्टॉक एक्सचेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष चौहानमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे मुख्य गुंतवणूक अधिकारी डॉ. शंकर देशपांडेफिनलंड परराष्ट्र मंत्रालयाचे राज्य सचिव जुका सोलोवारामुंबईतील फिनलंडचे कॉन्सिलेट जनरल एरिक अफ हॅलोस्ट्रॉमसहाय्यक सजू नायर आदी उपस्थित होते. 

फिनलंड अध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांची मुंबई विद्यापीठास भेट

 फिनलंड अध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांची मुंबई विद्यापीठास भेट

 

मुंबईदि.6 : फिनलंड देशाचे अध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांनी आज मुंबई विद्यापीठ येथे भेट दिली. या भेटी दरम्यान फिनलंड येथील शिक्षण पद्धतीभारतीय आणि फिनलंड मधील शैक्षणिक संधीबदलते आंतरराष्ट्रीय राजकारणतंत्रज्ञान, संशोधन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आदि विषयांवर निमंत्रित मान्यवर, अध्यापक आणि विद्यार्थी यांच्याशी मुक्त संवाद साधला. विद्यार्थ्यांनी त्यांना विचारलेल्या विविध प्रश्नांवर उत्तरे देत चर्चा केली.

            यावेळी फिनलंड कॉन्सिलेट जनरल एरिफ अफ हॅलोस्ट्रॉम, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णीमुख्य राजशिष्टाचार अधिकारी राजेश गवांदे आदी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दैनिक द हिंदूच्या विनया देशपांडे यांनी केले.

0000

भागीदारी केवळ पायाभूत सुविधांच्या विकासाचे प्रतिनिधित्व करत नाही

 मंत्री नितेश राणे म्हणालेया तीनही कंपन्या ससून मासेमारी बंदराला सुरक्षितस्वच्छ आणि आधुनिक करण्यास काम करतील.  प्लास्टिक कचरा पुनर्वापरटाकून दिलेल्या मासेमारी जाळ्यांचे पुनर्वापर आणि क्षमता बांधणीद्वारे नेट दुरुस्ती प्रणाली मजबूत करण्यास मदत होईल. ही भागीदारी केवळ पायाभूत सुविधांच्या विकासाचे प्रतिनिधित्व करत नाहीतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार जागतिक मानकांनुसार ससून डॉकला आदर्श मासेमारी बंदर बनवण्याच्या दिशेने उचललेले पाऊल आहे.

 मच्छीमारांच्या कल्याणासाठीमत्स्यव्यवसायाच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्यासाठी आणि शाश्वत किनारी विकासासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. ससून डॉक मच्छीमार समुदायासाठी प्रगतीनावीन्य आणि समृद्धीचे प्रतीक बनविण्यासाठी एकत्र काम करण्याचे आवाहनही मंत्री श्री. राणे यांनी केले.

000

डॉक, आज आपल्या मासेमारी समुदायासाठी एक महत्त्वाचे आर्थिक केंद्र म्हणून

 मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे म्हणाले,  मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मालकीखालील जुना ससून डॉक,  महाराष्ट्र आणि भारत सरकारच्या अंतर्गत नवीन डॉकआज आपल्या मासेमारी समुदायासाठी एक महत्त्वाचे आर्थिक केंद्र म्हणून उभे आहे. सुमारे 1,560 नोंदणीकृत मोटार चालवलेल्या मासेमारी नौका आणि सरासरी वार्षिक 50 ते 60 हजार मेट्रिक टन मासेमारी उत्पादनासहससून डॉक महाराष्ट्र तसेच भारताच्या मासेमारी अर्थव्यवस्थेत  महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. गेल्या काही वर्षांत येथे नेट मेंडिंग शेडवर्कशॉपभूमिगत पाण्याची टाकीपाणीपुरवठा पाईपलाईनपंप हाऊससंरक्षण भिंतसार्वजनिक शौचालये आणि सुरक्षा रक्षक घराचे नूतनीकरणकचराकुंड्यांची व्यवस्था करणेजुन्या संरचना पाडणेइलेक्ट्रिकल सबस्टेशनसाठी बांधकाम आदी कामे करण्यात आली आहे. सध्या बर्फ संयंत्रघाटाच्या भिंतीचे मजबुतीकरणमच्छिमारांसाठी विश्रांती कक्षांचे बांधकाम आणि आधुनिक लिलाव हॉलची कामे प्रगतीपथावर आहेत.

ससून गोदीला आधुनिककार्यक्षमस्वच्छ आणि पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत मासेमारी बंदरात रूपांतरित करण्याचे शासनाचे ध्येय आहे. या आधुनिकीकरण उपक्रमाचे उद्दिष्ट तंत्रज्ञानाचा विस्तार करणेडिजिटायझेशनला प्रोत्साहन देणेसुधारणा करणे असल्याचेही मत्स्य व्यवसाय मंत्री श्री राणे म्हणाले. 

फिनलंड देशातील कंपन्यांसोबत सामंजस्य करार ससून मासेमारी बंदराला जगातील सर्वोत्तम बनविणार

 फिनलंड देशातील कंपन्यांसोबत सामंजस्य करार


ससून मासेमारी बंदराला जगातील सर्वोत्तम बनविणार

-मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

 

मुंबईदि. 7: मुंबईस्थित ससून मासेमारी बंदर हे मोठ्या मासेमारी बंदरांपैकी एक आहे. ससून मासेमारी बंदराचा विकास हा राज्य शासनाचा प्राधान्याचा विषय आहे. ससून मासेमारी बंदराला जगातील

 सर्वोत्तम बनविण्यासाठी फिनलंड देशाच्या कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहेअसे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

हॉटेल ताज पॅलेस येथे फिनलंड देशातील  हेल्वरमिरासिस आणि रिव्हर रीसायकल  कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मत्स्य व्यवसाय विभागाचे सचिव एन रामास्वामीमत्स्य व्यवसाय आयुक्त विजय सूर्यवंशीमहाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपालेफिनलंडचे कॉन्सिलेट जनरल एरिक अफ हॅलोस्ट्रॉमसहाय्यक सजू नायर,  फिनलंडच्या परराष्ट्र मंत्रालयाचे राज्य सचिव जुका सोलोवारा आदी उपस्थित होते. 

एक्सएसआयओ बुद्धीमत्ता एकीकृत प्रगत औद्योगिक व निर्मिती पार्क विषयी

 एक्सएसआयओ बुद्धीमत्ता एकीकृत प्रगत औद्योगिक व निर्मिती पार्क विषयी

           महाराष्ट्रातील औद्योगिक पायाभूत सुविधांच्यादृष्टीने महत्वाचा असलेल्या या पार्कच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू होणार आहे. ब्लॅकस्टोन समर्थित हे पार्क ७०० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीतून साकारले जात आहे. तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले हे राज्यातील पहिलेच 'इंटेलिजन्स-इंटिग्रेटेडऔद्योगिक संकुल आहे.

          या प्रकल्पामुळे नागपूर आणि परिसरात सुमारे २,५०० प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. हे औद्योगिक संकुल केवळ कारखाना नसून 'स्मार्ट कॅम्पसअसेल. यात आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित इमारत व्यवस्थापन यंत्रणा आणि 'डिजिटल ट्विनतंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहेज्यामुळे ऊर्जेची बचत आणि कामाचा दर्जा सुधारण्यास मदत होते.

          एक्सएसआयओ मार्फत महाराष्ट्रात एकूण ८,१४२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात असून त्याद्वारे राज्यात ३५,००० हून अधिक रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे.

Featured post

Lakshvedhi