Saturday, 7 March 2026

फिनलंड प्रत्येक क्षेत्रात भारतासोबत काम करण्यास तयार आहे. पायाभूत सुविधांमध्ये होत आलेल्या

 अध्यक्ष अलेक्झांडर स्टब म्हणालेनवी दिल्ली येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीपरराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्याशी चर्चा झाली. मागील काही वर्षांपासून भारतात मोठ्या प्रमाणावर विकासाचे वारे वाहत आहेत. प्रत्येक क्षेत्रात भारताने नेत्रदीपक प्रगती केली आहे. फिनलंड प्रत्येक क्षेत्रात भारतासोबत काम करण्यास तयार आहे. पायाभूत सुविधांमध्ये होत आलेल्या सुधारणा हे त्याचेच प्रतीक आहे. फिनलंडचा जीडीपी (ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्शन) हे आपल्या राज्याच्या बजेटपेक्षा कमी आहे. मात्र खाजगी क्षेत्राच्या सहकार्याने ते वाढविण्याचा प्रयत्न आहे. 

पर्यावरणाचे संवर्धन करीत शाश्वत विकासाचे ध्येय गाठण्यासाठी दोन्ही देशांनी सोबत काम करणे आवश्यक आहे. प्रगतीसाठी क्वांटम कम्प्युटिंगसुपर कम्प्युटिंगसंशोधननावोन्मेष यांच्यासह नवीनीकरणीय ऊर्जाहरित ऊर्जा क्षेत्रात परिवर्तन झाले पाहिजे. युरोप भारतासोबत मुक्त व्यापार करीत आहे. यावरून भारताचे जागतिक पातळीवर असलेले महत्व विषद होतेअसेही अध्यक्ष अलेक्झांडर स्टब म्हणाले. यावेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय टी- ट्वेन्टी क्रिकेट जागतिक स्पर्धेतील अंतिम सामन्यासाठी भारतीय क्रिकेट संघाला शुभेच्छाही दिल्या. 

यावेळी मुंबईतील फिनलंडचे कॉन्सिलेट जनरल एरिक अफ हॅलोस्ट्रॉम यांनी सूत्र संचालन केले. तसेच नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष चौहानमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे मुख्य गुंतवणूक अधिकारी डॉ शंकर देशपांडेतसेच फिनलंड येथील काही कंपन्यांचे प्रतिनिधींनी विचार व्यक्त केले. 

 


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi