भारत व फिनलंड येथील कंपन्यांच्या प्रतिनिधीसोबत चर्चा
भारत हा जगातील वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था
-
मुंबई, दि. 7: भारत आणि फिनलंड यांच्यातील दीपक्षीय संबंध दृढ आहे. या दौऱ्यामुळे हे संबंध अधिक दृढ होणार आहे. भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. फिनलंडला शाश्वत विकासासाठी भारताचे सहकार्य आवश्यक असल्याची बाब फिनलंडचे अध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांनी अधोरेखित केली.
फिनलंडचे अध्यक्ष अलेक्झांडर स्टब मागील तीन ते चार दिवसांपासून भारताच्या दौऱ्यावर आहेत. हॉटेल ताज पॅलेस येथे भारत आणि फिनलंड येथील विविध कंपन्यांच्या प्रतिनिधीसोबत अध्यक्ष श्री. स्टब यांच्या संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फिनलंडचे रोजगार मंत्री मॅटियास मार्टिनेन, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष चौहान, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे मुख्य गुंतवणूक अधिकारी डॉ. शंकर देशपांडे, फिनलंड परराष्ट्र मंत्रालयाचे राज्य सचिव जुका सोलोवारा, मुंबईतील फिनलंडचे कॉन्सिलेट जनरल एरिक अफ हॅलोस्ट्रॉम, सहाय्यक सजू नायर आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment