एक्सएसआयओ बुद्धीमत्ता एकीकृत प्रगत औद्योगिक व निर्मिती पार्क विषयी
महाराष्ट्रातील औद्योगिक पायाभूत सुविधांच्यादृष्टीने महत्वाचा असलेल्या या पार्कच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू होणार आहे. ब्लॅकस्टोन समर्थित हे पार्क ७०० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीतून साकारले जात आहे. तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले हे राज्यातील पहिलेच 'इंटेलिजन्स-इंटिग्रेटेड' औद्योगिक संकुल आहे.
या प्रकल्पामुळे नागपूर आणि परिसरात सुमारे २,५०० प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. हे औद्योगिक संकुल केवळ कारखाना नसून 'स्मार्ट कॅम्पस' असेल. यात आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित इमारत व्यवस्थापन यंत्रणा आणि 'डिजिटल ट्विन' तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे ऊर्जेची बचत आणि कामाचा दर्जा सुधारण्यास मदत होते.
एक्सएसआयओ मार्फत महाराष्ट्रात एकूण ८,१४२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात असून त्याद्वारे राज्यात ३५,००० हून अधिक रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे.
No comments:
Post a Comment