उद्योगाचे मॅग्नेट म्हणून नागपूरच्या विकासात
एक्सएसआयओने महत्वाची भूमिका वठवावी
-
महाराष्ट्रातील पहिल्या एक्सएसआयओ बुद्धीमत्ता एकीकृत
प्रगत औद्योगिक व निर्मिती पार्कचे भूमिपूजन
२५०० लोकांना मिळणार रोजगार ; प्रकल्पामुळे राज्यातील उद्योगाला मिळणार नवी दिशा
नागपूर, दि.७: राज्यशासनाच्या उद्योग पूरक धोरणामुळे निर्मिती क्षेत्र सकारात्मक दिशेने वळण घेत आहे. उद्योगाला चालना देत विदर्भाच्या विकासासाठी नागपूरला उद्योगाचे मॅग्नेट बनविण्याच्या दिशेने पाऊल टाकले असून त्यात एक्सएसआयओ कंपनीने महत्वाची भूमिका वठवावी असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
नागपूर-अमरावती महामार्गावर स्थित लिंगा परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते महाराष्ट्रातील पहिल्या एक्सएसआयओ बुद्धीमत्ता एकीकृत प्रगत औद्योगिक व निर्मिती पार्कचे भूमिपूजन झाले. त्यावेळी ते बोलत होते. महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार सर्वश्री डॉ. आशिष देशमुख, चरणसिंह ठाकूर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, एक्सएसआयओ इंडस्ट्रीयल ॲण्ड लॉजिस्टिक पार्कचे व्यवस्थापकीय संचालक आशिष अग्रवाल आदी उपस्थित होते
No comments:
Post a Comment