Saturday, 7 March 2026

आरोग्य क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव

 आरोग्य क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव

 

जागतिक महिला दिनानिमित्त सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिला डॉक्टर्सस्त्रीरोग तज्ज्ञस्त्री शल्यचिकित्सकपरिचारिकाआरोग्य सेविकाआरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकार यांचा सन्मान करण्यात येणार येईल. ग्रामीण व दुर्गम भागात मातृत्वबाल आरोग्यकर्करोग प्रतिबंध आणि जनजागृती मोहिमांमध्ये त्यांनी बजावलेल्या भूमिकेचा विशेष गौरव करण्यात आला. महिला सक्षमीकरणस्त्री-पुरुष समानता आणि आरोग्य हक्कांविषयी जनजागृती करण्यासाठी हे उपक्रम प्रेरणादायी ठरणार असून महिलांच्या स्वप्नांना बळ देऊयाउद्याचे उज्ज्वल भविष्य घडवूया! या संदेशाला प्रत्यक्ष कृतीची जोड देणारे ठरतीलअसा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.

राज्यव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

 राज्यव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

 

गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधासाठी राष्ट्रीय ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) लसीकरण मोहिमेचा राज्यव्यापी  शुभारंभ महिला दिनानिमित्त होत आहे. 14 वर्षे पूर्ण झालेल्या परंतु 15 वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींना गार्डसिल-4’ या लसीचा एक मोफत डोस देण्यात येणार आहे. राज्यातील एकूण 9 लाख 84 हजार 414 मुलींना या मोहिमेचा लाभ मिळणार असून लसीकरण पूर्णपणे मोफत व पालकांच्या संमतीने ऐच्छिक स्वरूपात होणार आहे.

 

 भारतामध्ये महिलांमधील कर्करोगांमध्ये गर्भाशयमुखाचा कर्करोग दुसऱ्या क्रमांकावर असून दरवर्षी सुमारे 80 हजार नवीन रुग्ण आढळतात व 42 हजारांहून अधिक मृत्यू होतात. एचपीव्ही प्रकार 16 व 18 पासून संरक्षण देणारी ही लस अत्यंत प्रभावी मानली जाते. ही मोहीम सलग तीन महिने विशेष अभियान म्हणून राबविण्यात येणार असून त्यानंतर ती नियमित लसीकरण कार्यक्रमाचा भाग होईल. प्राथमिक आरोग्य केंद्रेग्रामीण रुग्णालयेजिल्हा रुग्णालयेमहानगरपालिका रुग्णालये व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लसीकरण केले जाईल. सर्व लाभार्थ्यांची नोंदणी व प्रमाणपत्र वितरण केंद्र शासनाच्या U-WIN या डिजिटल पोर्टलद्वारे करण्यात येणार आहे.

राज्यव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

 राज्यव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

 

गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधासाठी राष्ट्रीय ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) लसीकरण मोहिमेचा राज्यव्यापी  शुभारंभ महिला दिनानिमित्त होत आहे. 14 वर्षे पूर्ण झालेल्या परंतु 15 वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींना गार्डसिल-4’ या लसीचा एक मोफत डोस देण्यात येणार आहे. राज्यातील एकूण 9 लाख 84 हजार 414 मुलींना या मोहिमेचा लाभ मिळणार असून लसीकरण पूर्णपणे मोफत व पालकांच्या संमतीने ऐच्छिक स्वरूपात होणार आहे.

जागतिक महिला दिनानिमित्त राज्यात ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहीमेचा शुभारंभ आरोग्य क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

 जागतिक महिला दिनानिमित्त राज्यात

एचपीव्ही’ लसीकरण मोहीमेचा शुभारंभ

आरोग्य क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

 

 

 

मुंबईदि.7 : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत मार्च रोजी महिला सक्षमीकरण आणि आरोग्य  संरक्षणासाठी राज्यभरात विविध महत्त्वपूर्ण उपक्रमांचा शुभारंभ करण्यात येत आहे. महिलांच्या आरोग्य विषयी हक्कांना बळ देत गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधासाठी 14 वर्षे पूर्ण झालेल्या परंतु 15 वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींसाठी राज्यव्यापी एचपीव्ही’ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ होत आहे. या दिवशी आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान देखील करण्यात येणार आहे.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) व आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या पुढाकाराने हे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. हा कार्यक्रम रविवार, 8 मार्च 2026 रोजी मुख्य सभागृहयशवंतराव चव्हाण सेंटरनरिमन पॅाईटमुंबई येथे दुपारी 3.00 वाजता आयोजित करण्यात आला आहे

फिनलंड अध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांची मुंबई विद्यापीठास भेट

 फिनलंड अध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांची मुंबई विद्यापीठास भेट

 

मुंबईदि.6 : फिनलंड देशाचे अध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांनी आज मुंबई विद्यापीठ येथे भेट दिली.

 

या भेटी दरम्यान फिनलंड येथील शिक्षण पद्धतीभारतीय आणि फिनलंड मधील शैक्षणिक संधीबदलते आंतरराष्ट्रीय राजकारणतंत्रज्ञान, संशोधन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आदि विषयांवर निमंत्रित मान्यवर, अध्यापक आणि विद्यार्थी यांच्याशी मुक्त संवाद साधला. विद्यार्थ्यांनी त्यांना विचारलेल्या विविध प्रश्नांवर उत्तरे देत चर्चा केली.

 

            यावेळी फिनलंड कॉन्सिलेट जनरल एरिफ अफ हॅलोस्ट्रॉम, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णीमुख्य राजशिष्टाचार अधिकारी राजेश गवांदे आदी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दैनिक द हिंदूच्या विनया देशपांडे यांनी केले

पर्यटन उद्योगाला महाराष्ट्रात मोठा वाव आहे

 पर्यटन उद्योगाला महाराष्ट्रात मोठा वाव आहे. त्यादृष्टीने छोट्या छोट्या पर्यटन स्थळांचा विकास करून ग्रामीण भागातही अर्थव्यवस्थेला चालना देणेरोजगार वाढविणे शक्य होणार आहे. उद्योग क्षेत्राचे उत्पादन दीड हजार अब्ज डॉलर्सपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट्य ठेवतांना त्यासाठी विविध धोरणे जाहीर करून सेवा क्षेत्र आणि तंत्रज्ञानाला देखील प्रोत्साहन देण्याचे नियोजन या अर्थसंकल्पात केले आहेअसे सांगून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कीअटल सेतूच्या परिसरात तिसरी मुंबई उभारून एकूणच मुंबई महानगराला आणखी शक्तीशाली करण्याचा या अर्थसंकल्पात निर्धार व्यक्त केला आहे. देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रीलियन डॉलर्स करण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे उद्दिष्ट्य आहे आणि यात महाराष्ट्राचे योगदान खूप मोठे असणार आहेयाचे सुतोवाच करणारा हा अर्थसंकल्प आहे, असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

००००

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दीनिमित्त जनकल्याणाचे उपक्रमही

 हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दीनिमित्त जनकल्याणाचे उपक्रमही राज्यात हाती घेण्यात येणार आहेतत्याविषयी सविस्तर माहिती आणि नियोजन लवकरच जाहीर करण्यात येत आहे असे सांगून उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले कीराज्यातील नागरिकांना शासकीय योजनासेवा सहजपणेसुलभ आणि उत्तरदायी पद्धतीने देण्यासाठी तशी यंत्रणा उभारण्यात येत आहे. त्याचप्रमाणे शासनातली ७५ हजार रिक्त पदेही भरण्यात येणार असल्याने युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधीही उपलब्ध होणार आहे.

Featured post

Lakshvedhi