पर्यटन उद्योगाला महाराष्ट्रात मोठा वाव आहे. त्यादृष्टीने छोट्या छोट्या पर्यटन स्थळांचा विकास करून ग्रामीण भागातही अर्थव्यवस्थेला चालना देणे, रोजगार वाढविणे शक्य होणार आहे. उद्योग क्षेत्राचे उत्पादन दीड हजार अब्ज डॉलर्सपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट्य ठेवतांना त्यासाठी विविध धोरणे जाहीर करून सेवा क्षेत्र आणि तंत्रज्ञानाला देखील प्रोत्साहन देण्याचे नियोजन या अर्थसंकल्पात केले आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, अटल सेतूच्या परिसरात तिसरी मुंबई उभारून एकूणच मुंबई महानगराला आणखी शक्तीशाली करण्याचा या अर्थसंकल्पात निर्धार व्यक्त केला आहे. देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रीलियन डॉलर्स करण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे उद्दिष्ट्य आहे आणि यात महाराष्ट्राचे योगदान खूप मोठे असणार आहे, याचे सुतोवाच करणारा हा अर्थसंकल्प आहे, असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
००००
No comments:
Post a Comment