फिनलंड अध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांची मुंबई विद्यापीठास भेट
मुंबई, दि.6 : फिनलंड देशाचे अध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांनी आज मुंबई विद्यापीठ येथे भेट दिली.
या भेटी दरम्यान फिनलंड येथील शिक्षण पद्धती, भारतीय आणि फिनलंड मधील शैक्षणिक संधी, बदलते आंतरराष्ट्रीय राजकारण, तंत्रज्ञान, संशोधन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आदि विषयांवर निमंत्रित मान्यवर, अध्यापक आणि विद्यार्थी यांच्याशी मुक्त संवाद साधला. विद्यार्थ्यांनी त्यांना विचारलेल्या विविध प्रश्नांवर उत्तरे देत चर्चा केली.
यावेळी फिनलंड कॉन्सिलेट जनरल एरिफ अफ हॅलोस्ट्रॉम, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी राजेश गवांदे आदी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दैनिक ' द हिंदू' च्या विनया देशपांडे यांनी केले
No comments:
Post a Comment