Friday, 6 March 2026

परिवहन मंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली पालघर जिल्ह्यातील आगारसंदर्भात बैठक

 परिवहन मंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली

पालघर जिल्ह्यातील आगारसंदर्भात बैठक

 

मुंबईदि. ५ : पालघर जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या आगारसंदर्भात विधानभवन येथील दालनात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

बैठकीस आमदार विलास तरेमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे वरिष्ठ अधिकारीपालघर एस. टी. विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणालेएस. टी. महामंडळाने सामान्य प्रवासी केंद्रस्थानी ठेवून आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात. बसस्थानक व बस डेपो विकसित करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. पालघर जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या आगारामध्ये मनुष्यबळ व बसगाड्यांची कमतरता दूर करून प्रवासी सेवा अधिक सक्षम करण्यावर भर द्यावा. पालघर जिल्ह्यांसाठी दोन वर्षात २०० नव्या बसेस उपलब्ध करून देण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात यावीअसे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

पर्यावरणस्नेही पर्यटन (इको टूरिझम) यादृष्टीने नियोजित आराखड्यामध्ये काही बदल

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळाचे सुशोभीकरण योग्य प्रकारे करण्यात यावे. पर्यावरणस्नेही पर्यटन (इको टूरिझम) यादृष्टीने नियोजित आराखड्यामध्ये काही बदल करायचे असतील तर ते करण्यात यावेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी संदेश दिलेल्या जलसंवर्धनवृक्षसंवर्धन संकल्पनांची जपणूकचोंडी येथे देशभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी सुव्यवस्थित रस्तेसंग्रहालयमहादेव मंदिर आणि चौंडीश्वरी मंदिर जीर्णोध्दारनिवास व्यवस्थासुसज्ज वाहनतळस्थानिक उत्पादनेखाद्यपदार्थ यांची बाजारपेठ या सोयीसुविधांना प्राधान्य देण्यात यावेअसे महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी स्पष्ट केले.

श्री क्षेत्र चोंडी विकास आराखडा परिपूर्ण असावा

 श्री क्षेत्र चोंडी विकास आराखडा परिपूर्ण असावा

-         महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे

·         पर्यावरणस्नेही पर्यटनच्या दृष्टीने देखील विचार व्हावा

 

मुंबईदि. ५ :श्री क्षेत्र चोंडी विकास आराखडा हा सर्व दृष्टीने परिपूर्ण असावा. त्याचप्रमाणे पर्यावरणस्नेही पर्यटन (इको टूरिझम) यादृष्टीने देखील त्यामध्ये सुधारणा आणि विस्तार करण्यात यावा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे हे जन्मस्थान असल्याने एकावेळी किमान 50 ते 70 हजार भाविकांची यात्रेनिमित्त सोय होऊ शकेल यादृष्टीने नियोजन असावेअशा सूचना महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिल्या. महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे अध्यक्षतेखाली सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वनविभाग यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आलीत्याप्रसंगी ते बोलत होते. 

शैक्षणिक क्षेत्र आणि उद्योग यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्यास

 यावेळी ‘आयआयएम’ मुंबईचे संचालक प्रा. मनोज कुमार तिवारी म्हणालेमुख्य सचिवांच्या भेटीचा आम्हाला अभिमान आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे धोरणनिर्मितीशैक्षणिक क्षेत्र आणि उद्योग यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्यास आम्हाला बळ मिळेल. भविष्याभिमुख नेतृत्व आणि प्रभावी कार्यकारी शिक्षणाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विकासाच्या आकांक्षांना पाठिंबा देण्यासाठी आयआयएम मुंबई कटिबद्ध आहे.

या संवाद कार्यक्रमात संस्थेचे डीनविभागप्रमुख आणि मुख्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

संस्थात्मक क्षमता मजबूत करण्याबरोबरच राज्याच्या विकास व नवोन्मेषाच्या उद्दिष्टांशी उच्च शिक्षण उपक्रमांचे समन्वय साधण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.


राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन, उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधील

 मुख्य सचिव राजेश अग्रवाल म्हणाले, राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासनउद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधील समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे. आयआयएम मुंबईसारख्या संस्थांद्वारे नेतृत्व विकाससंशोधन आणि कार्यकारी शिक्षणाच्या माध्यमातून प्रशासन व उद्योग क्षेत्रात सकारात्मक परिवर्तन घडवून आणता येते. त्यामुळे विकसित महाराष्ट्राच्या ध्येयपूर्तीत अशा संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.

यावेळी ‘आयआयएम’ मुंबईचे संचालक प्रा. मनोज कुमार तिवारी म्हणालेमुख्य सचिवांच्या भेटीचा आम्हाला अभिमान आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे धोरणनिर्मितीशैक्षणिक क्षेत्र आणि उद्योग यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्यास आम्हाला बळ मिळेल. भविष्याभिमुख नेतृत्व आणि प्रभावी कार्यकारी शिक्षणाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विकासाच्या आकांक्षांना पाठिंबा देण्यासाठी आयआयएम मुंबई कटिबद्ध आहे.

या संवाद कार्यक्रमात संस्थेचे डीनविभागप्रमुख आणि मुख्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

संस्थात्मक क्षमता मजबूत करण्याबरोबरच राज्याच्या विकास व नवोन्मेषाच्या उद्दिष्टांशी उच्च शिक्षण उपक्रमांचे समन्वय साधण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

विकसित महाराष्ट्रासाठी 1 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी प्रयत्न आवश्यक

 विकसित महाराष्ट्रासाठी 1 ट्रिलियन डॉलर्स

अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी प्रयत्न आवश्यक

- मुख्य सचिव राजेश अग्रवाल

आयआयएम मुंबईच्या विकास व संशोधनामुळे शिक्षण क्षेत्रात परिवर्तन शक्य

 

मुंबईदि. ५ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत’ या संकल्पनेशी सुसंगत राहून विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेण्याच्या उद्दिष्टात राज्यातील सर्व क्षेत्रांचे सक्रिय योगदान महत्त्वाचे आहेअसे प्रतिपादन मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी केले.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्या उपस्थितीत आयआयएम मुंबई कॅम्पसमधील प्रगती विहार एक्झिक्युटिव्ह डायनिंग हॉल’ चे उद्घाटन करण्यात आले.

विकासकामे करताना पर्यावरणाची हानी होणार नाही आणि स्थानिक नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही,

 विकासकामे करताना पर्यावरणाची हानी होणार नाही आणि स्थानिक नागरिकांना त्याचा त्रास होणार नाहीयाची काळजी घेण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.

प्रलंबित प्रश्न आणि विकासकामांवर होणारे परिणाम यावर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी कार्यवाहीची दिशा निश्चित करण्यात आली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी- दोडा मार्गचा विकास आणि पर्यावरण संवर्धन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच सिंधुदुर्ग च्या पर्यावरणवने आणि हवामान बदल विभागाशी संबंधित विविध तांत्रिक मुद्यांसंदर्भात आढावा घेण्यात आला.

केंद्र सरकारच्या नव्या अधिसूचनेमुळे स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांवर आणि रोजगारावर काय परिणाम होऊ शकतोयावर चर्चा करण्यात आली.

सिंधुदुर्गच्या जैवविविधतेचे संवर्धन आणि विकासप्रकल्पांची अंमलबजावणी करताना स्थानिक नागरिकांच्या भावना लक्षात घेऊनच पावले उचलेली जातील, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Featured post

Lakshvedhi