परिवहन मंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली
पालघर जिल्ह्यातील आगारसंदर्भात बैठक
मुंबई, दि. ५ : पालघर जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या आगारसंदर्भात विधानभवन येथील दालनात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
बैठकीस आमदार विलास तरे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी, पालघर एस. टी. विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, एस. टी. महामंडळाने सामान्य प्रवासी केंद्रस्थानी ठेवून आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात. बसस्थानक व बस डेपो विकसित करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. पालघर जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या आगारामध्ये मनुष्यबळ व बसगाड्यांची कमतरता दूर करून प्रवासी सेवा अधिक सक्षम करण्यावर भर द्यावा. पालघर जिल्ह्यांसाठी दोन वर्षात २०० नव्या बसेस उपलब्ध करून देण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात यावी, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment