Friday, 6 March 2026

उपक्रमाच्या माध्यमातून अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना जर्मन आणि जपानी भाषांचे प्रशिक्षण

 उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांच्या पुढाकाराने हा सामंजस्य करार करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना जर्मन आणि जपानी भाषांचे प्रशिक्षण देऊन त्यांना परदेशातील रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

मंत्री पाटील म्हणालेया करारानुसार महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाशी संलग्न तसेच स्वायत्त संस्थांमधील विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठामार्फत जर्मन व जपानी भाषांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन या दोन्ही माध्यमांतून आयोजित केले जाणार असून संबंधित भाषांची परीक्षा घेणे आणि श्रेयांक प्रदान करण्याची प्रक्रिया मुंबई विद्यापीठामार्फत राबविण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ आणि मुंबई विद्यापीठ यांच्यात जर्मन व जपानी भाषा प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार

 महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ आणि मुंबई विद्यापीठ यांच्यात

जर्मन व जपानी भाषा प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार


मुंबई, दि.5 : अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना परदेशातील रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच जर्मनी व जपान येथील भाषाचे ज्ञान मिळावे या उद्देशाने महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ आणि मुंबई विद्यापीठ यांच्यात जर्मन व जपानी भाषा प्रशिक्षणासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला.


उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे आणि महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी विभागाचे अपर मुख्य सचिव वेणूगोपोल रेड्डी, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर तसेच संबंधित विद्यापीठांचे कुलगुरू सचिव डॉ. मारुती जाधव, डॉ. भामरे उपस्थित होते.


उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांच्या पुढाकाराने हा सामंजस्य करार करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना जर्मन आणि जपानी भाषांचे प्रशिक्षण देऊन त्यांना परदेशातील रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

नवी दिल्लीत 'महाराष्ट्र साडी महोत्सवा'चे भव्य आयोजन राज्याचा विणकाम वारसा देशाच्या राजधानीत

 नवी दिल्लीत 'महाराष्ट्र साडी महोत्सवा'चे भव्य आयोजन

राज्याचा विणकाम वारसा देशाच्या राजधानीत

 

नवी दिल्ली,५: भारतीय संस्कृती आणि वस्त्रांचा अनमोल वारसा जपणाऱ्या महाराष्ट्रातील विणकरांच्या कलेला दाद देण्यासाठी आणि राज्याचा गौरवशाली हातमाग वारसा साजरा करण्यासाठीनवी दिल्लीतील  महाराष्ट्र सदन येथे भव्य महाराष्ट्र साडी महोत्सवा चे आयोजन करण्यात आले आहे. १९ ते २२ मार्च २०२६ या कालावधीत कस्तुरबा गांधी मार्ग  येथील महाराष्ट्र सदन येथे हा सोहळा रंगणार असूनयामध्ये महाराष्ट्राची शान असलेली पैठणीऔरंगाबादचे प्रसिद्ध हिमरूखणनारायणपेठीहॅन्ड पेंटेड साडी यांसह इतर अस्सल हस्तकला कापडांचे भव्य प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.

या महोत्सवाचा मुख्य उद्देश राज्यातील विणकर आणि कारागीर समुदायासाठी व्यापक प्रसिद्धी आणि बाजारपेठेतील नवीन संधी निर्माण करणे हा आहे. या महोत्सवांतर्गत २१ मार्च २०२६ रोजी एका विशेष फॅशन शोचे देखील आयोजन करण्यात आले असूनया कार्यक्रमामुळे महाराष्ट्राच्या पारंपरिक वस्त्रकलेला आधुनिक व्यासपीठ मिळणार आहे. या फॅशन शोच्या माध्यमातून राज्याच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडवले जाणार असूनयामुळे उपस्थित विणकर आणि सहभागी कारागिरांना मोठी प्रेरणा मिळणार आहे.

सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत सर्वांसाठी खुले असणाऱ्या या प्रदर्शनात ग्राहकांना थेट विणकरांकडून खरेदी करण्याची संधी मिळणार आहेज्यामुळे साड्यांच्या शुद्धतेची खात्री आणि रास्त दर मिळण्यास मदत होईल. आधुनिक काळातील महिलांच्या आवडीनुसार पारंपरिक विणकामाला नव्या डिझाईन्सची जोड देऊन येथे विविध साड्यांचे प्रकार मांडले जाणार आहेत. दिल्लीतील साडी प्रेमींनी आणि नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन महाराष्ट्राच्या या समृद्ध वारशाचे साक्षीदार व्हावेअसे आवाहन  महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर विमला यांनी केले आहे.

शाहू मिलच्या परिसराचा सर्वांगीण विकास करताना वस्त्रोद्योग क्षेत्राशी संबंधित उपक्रम उभारण्याचा

 शाहू मिलच्या परिसराचा सर्वांगीण विकास करताना वस्त्रोद्योग क्षेत्राशी संबंधित उपक्रम उभारण्याचा प्रस्तावही यावेळी मांडण्यात आला. या ठिकाणी फॅशन टेक्नॉलॉजी आणि डिझाईन शिक्षणासाठी राष्ट्रीय स्तरावरील संस्थांच्या शाखा सुरू करण्याच्या प्रस्तावावर तसेच या स्मारकासाठी जमीन हस्तांतरण करताना प्रचलित नियमानुसार जमिनीच्या मूल्याचा विचार करून आवश्यक आर्थिक समायोजन करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.

राजर्षी शाहू महाराज स्मारकासाठी शाहू मिलची जागा कोल्हापूर महापालिकेला देण्यास तत्त्वतः मान्यता

  

राजर्षी शाहू महाराज स्मारकासाठी शाहू मिलची जागा

 कोल्हापूर महापालिकेला देण्यास तत्त्वतः मान्यता

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारेआरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत बैठक

 

मुंबई: दि. ५: राजर्षी शाहू महाराज स्मारक उभारण्यासाठी कोल्हापूर येथील शाहू छत्रपती मिलची वस्त्रोद्योग विभागाच्या अखत्यारितील जागा कोल्हापूर महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यास वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या अध्यक्षतेखाली आणि सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत तत्त्वतः मान्यता  देण्यात आली. यासंदर्भात जागा हस्तांतरणाच्या कायदेशीर प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी दिले.

 

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीस सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकरआमदार राजेश क्षीरसागरआमदार अमल महाडिककोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त के. मंजूलक्ष्मी  उपसचिव तुषार पवार यांच्यासह वस्त्रोद्योग विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

दिघी बंदराचे आतापर्यंतचे काम अत्यंत शिस्तबद्ध आणि पूर्वनियोजित आराखड्यानुसार सुरू

  दिघी बंदराचे आतापर्यंतचे काम अत्यंत शिस्तबद्ध आणि पूर्वनियोजित आराखड्यानुसार सुरू असल्याचे मंत्री राणे यांनी नमूद केले. राज्यातील रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी आगामी काळात जलवाहतूक हा उत्तम पर्याय ठरणार आहे. यावर सरकार विशेष भर देत तसेच दिघी बंदर हे केवळ मालाची ने-आण करण्याचे केंद्र न राहताते जागतिक स्तरावरील एक लॉजिस्टिक हब म्हणून विकसित करण्याचा सरकारचा मानस असल्याचे बंदरे मंत्री राणे यांनी सांगितले.

 

राज्याच्या किनारपट्टीचा वापर करून दळणवळण अधिक वेगवान करण्यासाठी जलवाहतूक व्यवस्था सुधारण्यावर प्राधान्य दिले जाईल. यामुळे इंधनाची बचत होण्यासोबतच पर्यावरणाचे रक्षण होण्यासही मदत होईल. या विकास प्रकल्पामुळे रायगड जिल्ह्यातील स्थानिक रोजगार वाढण्यास आणि राज्याच्या महसुलात भर पडण्यास मोठी मदत होणार असल्याचे बंदरे मंत्री राणे यांनी सांगितले.

जलवाहतूक क्षेत्रात जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण करणार

 जलवाहतूक क्षेत्रात जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण करणार

- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

-         दिघी बंदर विकासाचे सादरीकरण

 

मुंबईदि.५ : रायगड जिल्ह्यातील दिघी बंदराचा कायापालट करून तेथे जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यावर राज्य सरकारचा भर असल्याचे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले.

मंत्रालयात आयोजित बैठकीत अदानी पोर्ट्सकडून दिघी बंदराच्या विकास आराखड्याबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आलेत्यावेळी ते बोलत होते.

बैठकीत बंदराच्या प्रगतीचा आणि सुरू असलेल्या विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

Featured post

Lakshvedhi