राजर्षी शाहू महाराज स्मारकासाठी शाहू मिलची जागा
कोल्हापूर महापालिकेला देण्यास तत्त्वतः मान्यता
वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत बैठक
मुंबई: दि. ५: राजर्षी शाहू महाराज स्मारक उभारण्यासाठी कोल्हापूर येथील शाहू छत्रपती मिलची वस्त्रोद्योग विभागाच्या अखत्यारितील जागा कोल्हापूर महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यास वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या अध्यक्षतेखाली आणि सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत तत्त्वतः मान्यता देण्यात आली. यासंदर्भात जागा हस्तांतरणाच्या कायदेशीर प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी दिले.
वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीस सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त के. मंजूलक्ष्मी उपसचिव तुषार पवार यांच्यासह वस्त्रोद्योग विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment