Wednesday, 4 March 2026

महा-रेराअंतर्गत थकबाकी वसुलीसाठी कडक कारवाई

 महा-रेराअंतर्गत थकबाकी वसुलीसाठी कडक कारवाई

-मंत्री शंभूराज देसाई

 

मुंबईदि. २६ : महा-रेराअंतर्गत थकीत रकमेच्या वसुलीसाठी राज्य शासनाने कडक भूमिका घेतली असून वसुली ३४ टक्क्यांपेक्षा अधिक करणार असल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत दिली.

महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणाने घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईपोटी जारी केलेल्या आदेशांची अंमलबजावणी होत नसल्याबाबत सदस्य अतुल भातखळकर यांनी प्रश्न विचारला होता.

            मंत्री शंभूराज देसाई म्हणाले कीघर खरेदीदारांच्या हितासाठी महा-रेराची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत. महा-रेरा कायदा हा ग्राहकांच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारने आणला असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांसोबत आढावा बैठक घेऊन वसुलीबाबत कठोर धोरण राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. राज्य शासनाने वसुली प्रक्रिया अधिक प्रभावी करण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना विशेष निर्देश दिले आहेत. बिल्डरांच्या मालमत्तेचा शोध घेण्यासाठी भूमी अभिलेखमुद्रांक विभागमालमत्ता कर विभागकंपनी नोंदणी विभागआरटीओ तसेच आवश्यकतेनुसार आयकर विभागाकडून अतिरिक्त माहिती घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित विकासकांची इतर जिल्ह्यांतील मालमत्ता शोधून आरआरसी’ प्रक्रियेद्वारे वसुली केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्य सचिवांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन वेळोवेळी आढावा घेतला आहे. कोल्हापूरमुंबई आणि पालघरसह ज्या जिल्ह्यांमध्ये वसुलीचे प्रमाण कमी आहे तेथे विशेष लक्ष दिले जाणार आहे.           

उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनीही सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नियमित पुनरावलोकन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वसुलीचे प्रमाण ३४ टक्क्यांवरून वाढविण्यासाठी पुढील काळात कठोर कारवाई केली जाईलअसे मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले.

00000

नदीकिनारी असलेल्या गोठ्यांवर आत्तापर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात

 राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले की, नदीकिनारी असलेल्या गोठ्यांवर आत्तापर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तथापि, अनेक गोठ्यांची नोंदणी अद्याप न झाल्याने कारवाईत विलंब होत आहे. दहिसर नदी प्रकल्पात १३०, पोयसरमध्ये २,५५४ आणि ओशिवरा नदी प्रकल्पात ७०० घरे व दुकाने बाधित असून, पात्र बांधकामांच्या पर्यायी सदनिकांअभावी अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया प्रलंबित असल्याचेही त्यांनी सांगितले.

या चर्चेत विधानसभा सदस्य मनिषा चौधरीयोगेश सागरदिलीप लांडेअस्लम शेख यांनी सहभाग घेतला.

दहिसर, पोयसर, ओशिवरा आणि वालभट नद्या यांचे

 राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी माहिती दिली कीदहिसरपोयसरओशिवरा आणि वालभट नद्या यांचे पुनरुज्जीवन कार्य सुरू आहे. दहिसर नदीसाठी दोन मलजल प्रक्रिया केंद्रांचे काम पूर्ण झाले असून प्रकल्प ३१ मार्च २०२६ पर्यंत कार्यान्वित होईल. पोयसर नदीसाठी १० मलजल प्रक्रिया केंद्रांपैकी नऊ केंद्रांचे काम प्रगतीपथावर आहे. ओशिवरा आणि वालभट नदीसाठी पाच प्रक्रिया केंद्रांची कामे सुरू असून तीही प्रगतीपथावर आहेत.

मुंबई प्रदूषण नियंत्रण मंडळाने नदी प्रदूषण रोखण्यासाठी आतापर्यंत

 विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनीमुंबई प्रदूषण नियंत्रण मंडळाने नदी प्रदूषण रोखण्यासाठी आतापर्यंत कोणती कारवाई केलीयाची माहिती सभागृहात सादर करण्याचे निर्देश दिले. त्यांनी सांगितले कीमंडळाने त्वरित जबाबदारी घ्यावी आणि एका आठवड्यात अहवाल सादर करावा.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी माहिती दिली कीदहिसरपोयसरओशिवरा आणि वालभट नद्या यांचे पुनरुज्जीवन कार्य सुरू आहे. दहिसर नदीसाठी दोन मलजल प्रक्रिया केंद्रांचे काम पूर्ण झाले असून प्रकल्प ३१ मार्च २०२६ पर्यंत कार्यान्वित होईल. पोयसर नदीसाठी १० मलजल प्रक्रिया केंद्रांपैकी नऊ केंद्रांचे काम प्रगतीपथावर आहे. ओशिवरा आणि वालभट नदीसाठी पाच प्रक्रिया केंद्रांची कामे सुरू असून तीही प्रगतीपथावर आहेत.

            राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले कीनदीकिनारी असलेल्या गोठ्यांवर आत्तापर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तथापिअनेक गोठ्यांची नोंदणी अद्याप न झाल्याने कारवाईत विलंब होत आहे. दहिसर नदी प्रकल्पात १३०पोयसरमध्ये २,५५४ आणि ओशिवरा नदी प्रकल्पात ७०० घरे व दुकाने बाधित असूनपात्र बांधकामांच्या पर्यायी सदनिकांअभावी अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया प्रलंबित असल्याचेही त्यांनी सांगितले.

या चर्चेत विधानसभा सदस्य मनिषा चौधरीयोगेश सागरदिलीप लांडेअस्लम शेख यांनी सहभाग घेतला.

00000

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

 दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे

काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

-राज्यमंत्री माधुरी मिसाळ

 

मुंबईदि. २६ : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहेअसे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले. दहिसर (मुंबई) नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत आमदार अबू आझमी यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नास उत्तर देताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ बोलत होत्या.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले कीदहिसर नदी परिसरातील गोठ्यांच्या स्थलांतराची प्रक्रिया सुरू असून त्यासाठी जागाही निश्चित करण्यात आली आहे. महसूल विभागाने संबंधित नकाशा जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला असून आर्थिक तरतूदही करण्यात आली आहे. गोठे हलविण्याबाबत मुंबई महानगरपालिकेला निर्देश देण्यात आले असूननोटिस देऊन स्थलांतराची कारवाई सुरू आहे.

ब्लिंकइट'द्वारे कालबाह्य अन्न वितरण प्रकरणात कंपनीवर कारवाई

 'ब्लिंकइट'द्वारे कालबाह्य अन्न वितरण प्रकरणात कंपनीवर कारवाई

-अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

 

मुंबईदि. २६ : पुणे शहरात ब्लिंकइट या ऑनलाईन अन्न वितरण सेवेच्या माध्यमातून कालबाह्य खाद्य पदार्थांचे वितरण होत असल्याबाबत तक्रार प्राप्त झाली होती. तक्रार प्राप्त झाल्यानंतर विभागाने चौकशी केली असता प्रारंभी कोणताही ठोस पुरावा सापडला नव्हता. मात्र लेखापरीक्षण अहवाल आणि संबंधित कागदपत्रांचा अभ्यास केल्यानंतर काही दिवसांपूर्वी 'ब्लिंकइट'च्या माध्यमातून कालबाह्य अन्न वितरित झाल्याचे स्पष्ट झाले. कंपनीवर कायदेशीर कारवाईही सुरू असून दोन लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहेअसे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले.

पुणे शहरात ब्लिंकइट या ऑनलाईन अन्न वितरण सेवेच्या माध्यमातून कालबाह्य खाद्य पदार्थांचे वितरण होत असल्याबाबत आमदार भिमराव तापकीर यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री झिरवाळ बोलत होते.

अन्न व औषध प्रशासन विभागात १९१ अधिकाऱ्यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली असून अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सर्व आस्थापनांना सूचना देण्यात येतीलअसे त्यांनी सांगितले.

यावेळी चर्चेत विधानसभा सदस्य अमित देशमुखअजय चौधरी आणि सिद्धार्थ शिरोळे यांनी सहभाग घेतला. 

औरंगपुरा व मकबरा रोडवरील दोन ठिकाणी महानगरपालिकेने

 राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्याऔरंगपुरा व मकबरा रोडवरील दोन ठिकाणी महानगरपालिकेने शौचालये उभारली आहेत. त्यापैकी औरंगपुरा येथील महिलांसाठीचे शौचालय जय काल भैरवनाथ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्याकडे तीन वर्षांसाठी भाडेतत्वावर देण्यात आले असून ते कार्यरत आहे. तर मकबरा रोडवरील शौचालय सध्या महानगरपालिकेमार्फतच वॉर्ड अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली चालविण्यात येत आहे.

राज्यमंत्री मिसाळ यांनी सांगितले कीनागरिकांच्या आरोग्यविषयक तक्रारी व अस्वच्छतेच्या समस्यांबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेचशौचालये लवकरात लवकर उभारून नागरिकांना स्वच्छतेच्या मूलभूत सोयी उपलब्ध करून देण्याचे काम प्राधान्याने हाती घेण्यात येत आहे.

Featured post

Lakshvedhi