Wednesday, 4 March 2026

मुंबई प्रदूषण नियंत्रण मंडळाने नदी प्रदूषण रोखण्यासाठी आतापर्यंत

 विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनीमुंबई प्रदूषण नियंत्रण मंडळाने नदी प्रदूषण रोखण्यासाठी आतापर्यंत कोणती कारवाई केलीयाची माहिती सभागृहात सादर करण्याचे निर्देश दिले. त्यांनी सांगितले कीमंडळाने त्वरित जबाबदारी घ्यावी आणि एका आठवड्यात अहवाल सादर करावा.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी माहिती दिली कीदहिसरपोयसरओशिवरा आणि वालभट नद्या यांचे पुनरुज्जीवन कार्य सुरू आहे. दहिसर नदीसाठी दोन मलजल प्रक्रिया केंद्रांचे काम पूर्ण झाले असून प्रकल्प ३१ मार्च २०२६ पर्यंत कार्यान्वित होईल. पोयसर नदीसाठी १० मलजल प्रक्रिया केंद्रांपैकी नऊ केंद्रांचे काम प्रगतीपथावर आहे. ओशिवरा आणि वालभट नदीसाठी पाच प्रक्रिया केंद्रांची कामे सुरू असून तीही प्रगतीपथावर आहेत.

            राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले कीनदीकिनारी असलेल्या गोठ्यांवर आत्तापर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तथापिअनेक गोठ्यांची नोंदणी अद्याप न झाल्याने कारवाईत विलंब होत आहे. दहिसर नदी प्रकल्पात १३०पोयसरमध्ये २,५५४ आणि ओशिवरा नदी प्रकल्पात ७०० घरे व दुकाने बाधित असूनपात्र बांधकामांच्या पर्यायी सदनिकांअभावी अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया प्रलंबित असल्याचेही त्यांनी सांगितले.

या चर्चेत विधानसभा सदस्य मनिषा चौधरीयोगेश सागरदिलीप लांडेअस्लम शेख यांनी सहभाग घेतला.

00000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi