Wednesday, 4 March 2026

ब्लिंकइट'द्वारे कालबाह्य अन्न वितरण प्रकरणात कंपनीवर कारवाई

 'ब्लिंकइट'द्वारे कालबाह्य अन्न वितरण प्रकरणात कंपनीवर कारवाई

-अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

 

मुंबईदि. २६ : पुणे शहरात ब्लिंकइट या ऑनलाईन अन्न वितरण सेवेच्या माध्यमातून कालबाह्य खाद्य पदार्थांचे वितरण होत असल्याबाबत तक्रार प्राप्त झाली होती. तक्रार प्राप्त झाल्यानंतर विभागाने चौकशी केली असता प्रारंभी कोणताही ठोस पुरावा सापडला नव्हता. मात्र लेखापरीक्षण अहवाल आणि संबंधित कागदपत्रांचा अभ्यास केल्यानंतर काही दिवसांपूर्वी 'ब्लिंकइट'च्या माध्यमातून कालबाह्य अन्न वितरित झाल्याचे स्पष्ट झाले. कंपनीवर कायदेशीर कारवाईही सुरू असून दोन लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहेअसे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले.

पुणे शहरात ब्लिंकइट या ऑनलाईन अन्न वितरण सेवेच्या माध्यमातून कालबाह्य खाद्य पदार्थांचे वितरण होत असल्याबाबत आमदार भिमराव तापकीर यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री झिरवाळ बोलत होते.

अन्न व औषध प्रशासन विभागात १९१ अधिकाऱ्यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली असून अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सर्व आस्थापनांना सूचना देण्यात येतीलअसे त्यांनी सांगितले.

यावेळी चर्चेत विधानसभा सदस्य अमित देशमुखअजय चौधरी आणि सिद्धार्थ शिरोळे यांनी सहभाग घेतला. 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi