Monday, 2 March 2026

शिक्षण, राजकारण, समाजकारण यांना जोडणारा मार्गदर्शक दुवा निखळला

 शिक्षणराजकारणसमाजकारण यांना जोडणारा मार्गदर्शक दुवा निखळला

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ज्येष्ठ विचारवंतमाजी खासदारमाजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांना श्रद्धांजली

 

मुंबईदि. 2: विद्वत्तातत्वनिष्ठ आणि लोकाभिमुखता यांचा त्रिवेणी संगम असलेल्या माजी खासदार प्रा. डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या निधनामुळे शिक्षणराजकारण आणि समाजकारण यांना जोडणारा मार्गदर्शक असा दुवा निखळला आहेअशा शोकभावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ विचारवंतमाजी खासदारमाजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतातप्रा. डॉ. वाघमारे यांचा इंग्रजी भाषा आणि साहित्यासह अर्थशास्त्रराज्यशास्त्राचा सखोल अभ्यास होता. शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी अध्यापन आणि प्रशासन या अंगाने मोठा ठसा उमटवला. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणूनही त्यांनी प्रभावी कार्य केले. विशेष म्हणजे त्यांनी लातूरचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्षपदही भुषविले. या काळात त्यांनी शहराच्या विकासासाठी लातूर व्हिजन म्हणून आराखडा तयार केला. शहरातील स्वच्छतापाणी पुरवठा तसेच नागरी सुविधांसाठी प्रयत्न केले. त्यामुळे लातूरला त्यावेळी संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानात प्रथम पुरस्कारदेखील मिळाला होता. राज्यसभा सदस्य म्हणूनही त्यांनी विविध संसदीय समितीवर काम केले. लातूरचे किल्लारी भूकंपशास्त्र संशोधन आणि नांदेड - किनवटच्या आदिवासी संशोधन आणि अभ्यास केंद्रांच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता. त्यांना संयुक्त राष्ट्र संघाच्या अधिवेशनात भारताच्या प्रतिनिधी मंडळाचा सदस्य म्हणून म्हणणे मांडण्याची संधी मिळाली होती. त्यांनी वैविध्यपूर्ण विषयांवर विपुल साहित्य निर्मिती केली. त्यांची ही ग्रंथसंपदा आपल्या सर्वांसाठी एक प्रकारचे संचित आहे.

ज्येष्ठ विचारवंत डॉ वाघमारे यांच्या निधनामुळे शिक्षणराजकारण आणि समाजकारण यांना जोडणारा मार्गदर्शक असा दुवा निखळला आहे. ही सामाजिक क्षेत्राची हानी आहे. आपण वाघमारे कुटूबिंयाच्या दुःखात सहभागी असूनईश्वराने त्यांना हा आघात सहन करण्याची क्षमता द्यावी अशी प्रार्थना करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. वाघमारे यांना श्रद्धांजली अर्पण केली.

होलीका देवी असली तरी तीची होळी करणारा हा अग्नी देव आहे, त्या देवास कोणाच्या मनात

 होलीका देवी असली तरी तीची  होळी करणारा हा अग्नी देव आहे, त्या देवास कोणाच्या मनात काय चालू आहे ते पक्क ठाऊक असतं. 


भक्त प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसणारी होलीका ही त्याची स्वत:ची आत्या होती पण कर्म वाईट असल्याने अग्नीचे वरदान सूद्धा तीला खाक होण्यापासून वाचवू शकले नाहि. कारण ईश्वराचा वरदहस्त डोक्यावर असलेला प्रल्हाद तीच्या मांडीवर होता. 


 त्या पवित्र अग्नी समोर मनात ऐक आणी बाहेर दूसर अस नाही चालंत , कारण आतलं वाईट जळण्यासाठी वाईट विचार धरून ठेवलेल्या त्या जिवाच्या शरीराला सूद्दा अग्नीचा दाह ऐक ना ऐक दिवस  पोहोचतोच. 


म्हणुनच आपण  आपल्या ईष्ट गुरूला मन पवित्र आणी स्वच्छ ठेऊन प्रामाणिक पणे शरण गेलो की गुरू आपल्याला परमेश्वराची भेट ही घडवतोच आणी गुरूला शरण गेलेल्या आणी गुरुचे अखंड नामस्मरण करणार्या या जीवात्म्यास पंचभहाभुतांचे सूद्धा भय नाही. 


"अग्ने नय सुपथा राये अस्मान् विश्वानि देव वयुनानि विद्वान्। युयोध्यस्मज्जुहुराणमेनो भूयिष्ठां ते नमउक्तिं विधेम ..."।।

                                    - ऋग्वेद 


"O Agni, help us to gain prosperity by leading us on the righteous path, you know all our thoughts and actions. Redeem us from all our sins and evil ways. We bow before you with gratitude."


 

हे अग्नि, आम्हाला धार्मिक मार्गावर घेऊन समृद्धी मिळविण्यास मदत कर, तू आमचे सर्व विचार आणि कृती जाणतोस. आमच्या सर्व पापांपासून आणि वाईट मार्गांपासून आम्हाला मुक्त कर. आम्ही कृतज्ञतेने तुझ्यापुढे नतमस्तक होतो."


ज्याचा शेवट गोड , ते सर्वच गोड. 

फाल्गुन शके १९४७ मधील वर्षातील या शेवटच्या सणाच्या दीवशी आपण आपल्या मनातील सर्व किल्मिष दुर करू आणी मानवी देहाचा शेवट करून आपल्याला या पंचमहाभुतात विलीन करणार्या अग्नी देवतेस शरण जाऊ.


॥ ॐ अग्नी देवताभ्यो नम: ॥ 



🔥पवित्र होळीच्या खुप खुप शुभेच्छा 🔥

समृद्धी महामार्गावरील सुरक्षित प्रवासासाठी मानांकनानुसार

 समृद्धी महामार्गावरील सुरक्षित प्रवासासाठी मानांकनानुसार सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहे. या महामार्गावर क्रॅश बॅरियर्सरबर स्ट्रिप्ससाईनबोर्ड आदी सुविधा बसविण्यात आल्या असल्याची माहिती राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी दिली.

महामार्गावर नियमित पोलीस पेट्रोलिंग तसेच ॲम्बुलन्स पेट्रोलिंग सुरू असून आपत्कालीन परिस्थितीसाठी स्वतंत्र ॲम्बुलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय 21 क्यूआरव्ही (क्विक रिस्पॉन्स व्हेईकल) पथके कार्यान्वित असल्याचेही राज्यमंत्र्यांनी सांगितले.

भिवंडी–ठाणे मार्गाचे काम सुरू असून ठाणे–मुंबईदरम्यान

 भिवंडीठाणे मार्गाचे काम सुरू असून ठाणेमुंबईदरम्यान एमएमआरडीएमार्फत उभारण्यात येणारा रिंग रोड आणि उन्नत मार्ग समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे. प्रवास गतिमान करण्यासाठी विविध जोडरस्त्यांचे नियोजन करण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामे गतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

छेडानगर ते आनंदनगर तसेच ठाणे ते मुंबई दरम्यानचे रस्ते

 छेडानगर ते आनंदनगर तसेच ठाणे ते मुंबई दरम्यानचे रस्ते विकसित करण्यासाठी बीओटी तत्वावर किंवा इतर माध्यमांतून निधी उभारण्याचे पर्याय तपासले जात आहेत. आवश्यक निधी उपलब्ध करून प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्यात येईलअशीही माहिती राज्यमंत्री साकोरे- बोर्डीकर यांनी दिली.


समृद्धी महामार्गावरील सुरक्षिततेसाठी एआय-आधारित इंटेलिजेंट ट्रान्सपोर्टेशन प्रणाली

 समृद्धी महामार्गावरील सुरक्षिततेसाठी एआय-आधारित

इंटेलिजेंट ट्रान्सपोर्टेशन  प्रणाली

- राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर

मुंबईदि. 28 : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर अपघातांची संख्या कमी करण्याच्या उद्देशाने देशातील पहिली एआय-आधारित इंटेलिजेंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम समृद्धी महामार्गावर बसविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या प्रणालीमुळे वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम होऊन भविष्यात अपघातांचे प्रमाण घटण्यास मदत होईलअशी माहिती राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी विधान परिषदेत दिली.

विधानपरिषद सदस्य सुधाकर अडबोलेशशिकांत शिंदेअमोल मिटकरी यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. याप्रश्नासंदर्भात माहिती राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी दिली.

समृद्धी महामार्गावरील सुरक्षित प्रवासासाठी मानांकनानुसार सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहे. या महामार्गावर क्रॅश बॅरियर्सरबर स्ट्रिप्ससाईनबोर्ड आदी सुविधा बसविण्यात आल्या असल्याची माहिती राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी दिली.

महामार्गावर नियमित पोलीस पेट्रोलिंग तसेच ॲम्बुलन्स पेट्रोलिंग सुरू असून आपत्कालीन परिस्थितीसाठी स्वतंत्र ॲम्बुलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय 21 क्यूआरव्ही (क्विक रिस्पॉन्स व्हेईकल) पथके कार्यान्वित असल्याचेही राज्यमंत्र्यांनी सांगितले.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील टीडीआर देण्याबाबतच्या प्रकरणी तक्रार आल्यास चौकशी करू

 कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील टीडीआर देण्याबाबतच्या

 प्रकरणी तक्रार आल्यास चौकशी करू

-राज्यमंत्री माधुरी मिसाळ

 

मुंबईदि. २८: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत टीडीआर देण्याबाबतच्या प्रक्रियेतील अनियमिततेबाबत विधिमंडळ सदस्यांकडून विशिष्ट प्रकरणी तक्रार व माहिती प्राप्त झाल्यास या प्रकरणाची चौकशी केली जाईलअसे नगरविकास  राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

सदस्य शशिकांत शिंदे यांनी  विधान परिषदेत कल्याण-डोंबिवली महापालिकेतील  नगररचना विभागातील टीडीआर प्रकरणी प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य सचिन अहिर यांनी उपप्रश्न विचारत सहभाग घेतला.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी या प्रश्नाच्या उत्तरात अधिक माहिती देताना सांगितलेटीडीआर देण्याचे अधिकार हे आयुक्त किंवा संबंधित सक्षम अधिकाऱ्यांकडेच असतात. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आकृतीबंधामध्ये १२ कार्यकारी अभियंता (स्थापत्य) व २४ उप कार्यकारी अभियंता (स्थापत्य) ही पदे मंजूर आहेत.  तसेच त्यांना बांधकाम मंजुरी अथवा टीडीआर मंजुरीचे कोणतेही अधिकार महापालिकेतर्फे प्रदान केले नसल्याने त्यांच्याकडून ११० बांधकामांना मंजुरी देण्यात आली नसल्याचे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी यावेळी उत्तरात सांगितले.

Featured post

Lakshvedhi