Monday, 2 March 2026

होलीका देवी असली तरी तीची होळी करणारा हा अग्नी देव आहे, त्या देवास कोणाच्या मनात

 होलीका देवी असली तरी तीची  होळी करणारा हा अग्नी देव आहे, त्या देवास कोणाच्या मनात काय चालू आहे ते पक्क ठाऊक असतं. 


भक्त प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसणारी होलीका ही त्याची स्वत:ची आत्या होती पण कर्म वाईट असल्याने अग्नीचे वरदान सूद्धा तीला खाक होण्यापासून वाचवू शकले नाहि. कारण ईश्वराचा वरदहस्त डोक्यावर असलेला प्रल्हाद तीच्या मांडीवर होता. 


 त्या पवित्र अग्नी समोर मनात ऐक आणी बाहेर दूसर अस नाही चालंत , कारण आतलं वाईट जळण्यासाठी वाईट विचार धरून ठेवलेल्या त्या जिवाच्या शरीराला सूद्दा अग्नीचा दाह ऐक ना ऐक दिवस  पोहोचतोच. 


म्हणुनच आपण  आपल्या ईष्ट गुरूला मन पवित्र आणी स्वच्छ ठेऊन प्रामाणिक पणे शरण गेलो की गुरू आपल्याला परमेश्वराची भेट ही घडवतोच आणी गुरूला शरण गेलेल्या आणी गुरुचे अखंड नामस्मरण करणार्या या जीवात्म्यास पंचभहाभुतांचे सूद्धा भय नाही. 


"अग्ने नय सुपथा राये अस्मान् विश्वानि देव वयुनानि विद्वान्। युयोध्यस्मज्जुहुराणमेनो भूयिष्ठां ते नमउक्तिं विधेम ..."।।

                                    - ऋग्वेद 


"O Agni, help us to gain prosperity by leading us on the righteous path, you know all our thoughts and actions. Redeem us from all our sins and evil ways. We bow before you with gratitude."


 

हे अग्नि, आम्हाला धार्मिक मार्गावर घेऊन समृद्धी मिळविण्यास मदत कर, तू आमचे सर्व विचार आणि कृती जाणतोस. आमच्या सर्व पापांपासून आणि वाईट मार्गांपासून आम्हाला मुक्त कर. आम्ही कृतज्ञतेने तुझ्यापुढे नतमस्तक होतो."


ज्याचा शेवट गोड , ते सर्वच गोड. 

फाल्गुन शके १९४७ मधील वर्षातील या शेवटच्या सणाच्या दीवशी आपण आपल्या मनातील सर्व किल्मिष दुर करू आणी मानवी देहाचा शेवट करून आपल्याला या पंचमहाभुतात विलीन करणार्या अग्नी देवतेस शरण जाऊ.


॥ ॐ अग्नी देवताभ्यो नम: ॥ 



🔥पवित्र होळीच्या खुप खुप शुभेच्छा 🔥

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi