Saturday, 28 February 2026

विश्व मराठी संमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'आपलं मंत्रालय'च्या विशेषांकाचे प्रकाशन

 विश्व मराठी संमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते

'आपलं मंत्रालय'च्या विशेषांकाचे प्रकाशन

 

कविवर्य कुसुमाग्रजनगरी (नाशिक)दि. २७  : माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित केलेल्या जाणाऱ्या आपलं मंत्रालय’ या नियतकालिकाच्या मराठी भाषा विशेषांकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चौथ्या विश्व मराठी संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी करण्यात आले.

 यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारअन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळजलसंपदा मंत्री गिरीश महाजनउद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंतखासदार डॉ. शोभा बच्छावखासदार राजाभाऊ वाजेमहापौर हिमगौरी आडके- आहेरआमदार किशोर दराडेआमदार माणिकराव कोकाटेआमदार ॲड. राहुल ढिकलेआमदार देवयानी फरांदेआमदार सीमा हिरेउपमहापौर विलास शिंदेज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडेमहाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती महामंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरेमाजी अध्यक्ष मधु मंगेश कर्णिकसंमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा मविप्र संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे आदी उपस्थित होते.

   ‘आपलं मंत्रालय’ या नियतकालिकाचा विशेषांक मराठी भाषा गौरव दिनानिमित्त प्रकाशित करण्यात आला आहे. मराठी भाषा मंत्री श्री. सामंत हे या अंकाचे अतिथी संपादक असून 

या विशेषांकात अभिजात मराठी भाषा : इतिहासवर्तमान आणि भविष्यजयपूर साहित्य उत्सवात मराठी भाषा विभागाची पताकामराठी : राजभाषामराठी भाषा विभागमराठी भाषा संचालनालयमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळराज्य मराठी विकास संस्थामराठी विज्ञान परिषदमहाराष्ट्र राज्य विश्व कोश निर्मिती मंडळमराठी विश्वकोशाचे अभिमान गीतमराठी भाषा भवनउत्सव अभिजात मराठीच आदी माहितीपर लेख आहेत.

मराठी साहित्य विश्वामधील कोल्हापूरचे योगदानआजपर्यंत मराठी साहित्य संमेलनेशासकीय प्रयोजनात मराठीस्त्री संतांचे अभंगमराठीला आकार देणारे महानुभाव साहित्यभाषेच्या इतिहासात अकोल्याचे स्थान अनन्यसाधारण आदी विषयांवरील लेखांमुळे हा अंक संग्राह्य असा आहे. प्रदर्शनस्थळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दलानात हा अंक वितरणासाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आला आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘हिंद दी चादर’ कार्यक्रमासाठी जाणाऱ्या भाविकांच्या बस व चित्ररथास दाखविला झेंडा

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘हिंद दी चादर’ कार्यक्रमासाठी  जाणाऱ्या भाविकांच्या बस व चित्ररथास दाखविला झेंडा

 

नाशिकदि. 27 : खारघरमुंबई येथे 28 फेब्रुवारी व 1 मार्च, 2026 रोजी हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम निमित्त कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी नाशिक जिल्ह्यातून जाणाऱ्या भाविकांच्या बस व चित्ररथास  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झेंडा दाखवून ओझर विमानतळ येथून मार्गस्थ केले.

यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारजलसंपदा मंत्री गिरीश महाजनआमदार राहुल ढिकलेविभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडामकुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंहपोलीस आयुक्त संदीप कर्णिकनाशिक महानगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त जलज शर्माजिल्हाधिकारी आयुष प्रसादमहानगरपालिका आयुक्त मनीषा खत्रीपोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटीलमहानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायरसहाय्यक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबेमाजी आमदार बाळासाहेब सानपक्षेत्रीय समिती सहअध्यक्ष (बंजारा व लभाना समाज) रवींद्र गांगोले- नाईकक्षेत्रीय समिती सहअध्यक्ष (शीख समाज) गुरमीतसिंग संधूधर्म जागरण विभागजिल्हा समन्वयक संजय लढ्ढा आदी उपस्थित होते.

खारघरमुंबई येथे  हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यकमास जिल्ह्यातून राज्य परिवहन महामंडळाच्या 62 व 118 खासगी बसेसमधून भाविक जाणार आहेत. 

0000

निवृत्तीनाथ महाराज विश्वस्त मंडळाला ५० लाख रुपयांचा धनादेश प्रदान

 मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते संत निवृत्तीनाथ महाराज विश्वस्त मंडळाला ५० लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला आमदार किशोर दराडेआमदार ॲड. माणिकराव कोकाटेआमदार ॲड. राहुल ढिकलेआमदार देवयानी फरांदेआमदार सीमा हिरेजिल्हाधिकारी आयुष प्रसादअखिल भारतीय साहित्य व संस्कृती महामंडळाचे माजी अध्यक्ष मधु मंगेश कर्णिकमराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष ॲड. नितीन ठाकरेमराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णीमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरेमराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरेउपमहापौर विलास शिंदे आदी उपस्थित होते.

नाशिक ही आध्यात्माची राजधानी आहे. ही भूमी, संत, विचारवंत, कवी, लेखकांची भूमी

 उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्यानाशिक ही आध्यात्माची राजधानी आहे. ही भूमीसंतविचारवंतकवीलेखकांची भूमी आहे. येथे मराठी भाषेचा कुंभमेळा विश्व मराठी संमेलनानिमित्त भरला आहे. मराठी ही मातीशी जोडलेली भाषा आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी लंडनमध्ये महाराष्ट्र भवन उभारणीसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता.

 मराठी भाषेचा अभिमान बाळगत तिच्या संवर्धनासाठी प्रयत्न करू याअसेही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

मराठी भाषा ज्ञानविज्ञानउपजिवीकेची भाषा व्हावी अशी अपेक्षा करून नव्या पिढीला मराठीची गोडी लावण्यासाठी प्रत्येकाने मराठीचा अभिमान बाळगावाअसे आवाहन सुनेत्रा पवार यांनी केले.

मराठी भाषा जागतिक पातळीवर नेण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणार

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चौथ्या विश्व मराठी संमेलनाचे शानदार उद्घाटन

मराठी भाषा जागतिक पातळीवर नेण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणार

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

कविवर्य कुसुमाग्रज नगरीत मराठीचा देखणा सोहळा

कविवर्य कुसुमाग्रजनगरी (नाशिक)दि. २७ : कृत्रिम बुद्धिमत्ता एआयमुळे अनेक आव्हानांसोबत निर्माण झालेल्या संधींचा वापर करून जागतिक पातळीवर मराठी साहित्य नेण्याचे कार्य मराठी भाषा विभागाच्या माध्यमातून करण्यात येईल. नव्या पिढीत मराठीतील संवाद कौशल्य विकसीत करण्यासाठी भाषेची प्रयोगशाळा (लँग्वेज लॅब) कार्यान्वित करण्यात येईलअसे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित चौथ्या विश्व मराठी संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारअन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळजलसंपदा मंत्री गिरीश महाजनसंमेलनाचे निमंत्रक तथा मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंतमहापौर हिमगौरी आहेर- आडकेखासदार डॉ. शोभा बच्छावखासदार राजाभाऊ वाजेविभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडामभाषा विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेविश्व मराठी संमेलनासाठी अमेरिकाजर्मनीफ्रान्सनॉर्वेसह जगातील विविध देशातून मराठी बांधव नाशिक नगरीमध्ये दाखल झाले आहेत. जगभरातील मराठी माणूस  मराठी भाषा आणि महाराष्ट्राचे तेथील सदिच्छा दूत (ब्रॅण्ड ॲम्बेसेडर) आहेत. यांच्या माध्यमातून महाराष्ट्राची संस्कृती आणि वैभव जगभरात पोहोचतेअसू सांगून मुख्यमंत्री फडणवीस यांनी परदेशस्थ मराठी बांधवांना पुढील वर्षी नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याला येण्याचे निमंत्रण दिले.

मराठी भाषेत सर्वाधिक साहित्य तयार होते. देशात सर्वात समृद्ध रंगभूमी मराठी मुलुखात आहे. इथे नवनवीन नाट्याची निर्मिंती होते आणि त्याला प्रतिसाद देणारे रसिकही आहेत. साहित्यनाट्य आणि लोकगीतांची आवड या भूमीला आहे आणि त्याची जपणूक मराठीने केली आहे. मराठी भाषेमुळे तयार झालेल्या लोकपरंपरांमुळे आपले जीवन समृद्ध झाले आहे. कितीही आव्हाने निर्माण झालीतरी अभिजात साहित्याला आव्हान मिळू शकत नाहीअसे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. भाषेचा अभिमान बाळगण्यासोबत ती ज्ञानभाषा आणि व्यवहार भाषा होणे गरजेचे आहे. त्यासाठी मराठी विभाग चांगले प्रयत्न करीत आहेअसेही ते म्हणाले. 

आपल्या इतिहासात स्वभाषेचा अभिमान आणि भाषाशुद्धी सर्वप्रथम शिकवली. परकीय आक्रमकांनी आपल्यावर राज्य केल्याने आपल्या राज्य कारभारात फारसीअरबी शब्द होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रमाण भाषेचा कोष तयार केला. आधुनिक महाराष्ट्रात भाषा शुद्धीकरणाचे कार्य स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केले. त्यांनी मराठी भाषेला अनेक नवे शब्द दिले. मराठी भाषेच्या सेवेची ही महान परंपरा नाशिक जिल्ह्याने जोपासली आहेअसे  श्री.फडणवीस म्हणाले. तसेच  कांदा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी लवकरच बैठकीचे आयोजन करूअशी ग्वाही त्यांनी शेतकऱ्यांना ‍दिली.

पुणे शहरातील आरोग्य सुविधांचा सर्वंकष आराखडा तयार करण्याचे काम सुरू

 पुणे शहरातील आरोग्य सुविधांचा

सर्वंकष आराखडा तयार करण्याचे काम सुरू

– आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

 

मुंबई२७ - पुणे शहर झपाट्याने विकसित होत असून आजूबाजूच्या जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी या ठिकाणी येतात. या पार्श्वभूमीवर पुढील १० वर्षांच्या दृष्टीने पुणे शहराच्या आरोग्य सुविधांचा रोडमॅप तयार करण्याचे काम सुरू आहे. तसेच ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांचा दर्जा उंचावण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरू असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली.

पुणे शहरात वाढत्या रुग्णसंख्येमुळे शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये अति दक्षता विभागाच्या बेडची संख्या वाढविणेअत्याधुनिक सुविधा व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासंदर्भात विधानसभेचे सदस्य सुनिल कांबळे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी उत्तर दिले. 


नागपूर येथील आनंद को-ऑपरेटिव्ह सोसायटीतील गैरव्यवहाराची चौकशी करुन दोषींवर

 नागपूर येथील आनंद को-ऑपरेटिव्ह सोसायटीतील गैरव्यवहाराची चौकशी करुन दोषींवर कारवाई  करणार

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

मुंबईदि. २७ : मौजा बेसा (नागपूर ग्रामीण) येथील आनंद को-ऑपरेटिव्ह सोसायटीनागपूर या संस्थेच्या सार्वजनिक उपयोगाच्या जागेमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात येईलअसे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.

मौजा बेसा (नागपूर ग्रामीण) येथील आनंद को-ऑपरेटिव्ह सोसायटीनागपूर या संस्थेच्या सार्वजनिक जागेमध्ये झालेल्या गैरव्यवहाराबाबत आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला.

या प्रश्नावर उत्तर देताना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले की,  संबंधित सहायक निबंधकांनी चौकशी करुनचौकशी अहवालसंस्थेचा खुलासाअभिप्राय व निष्कर्षासह सादर केला आहे.

संस्थेने हस्तांतरित केलेल्या सात भूखंडांबाबत चाचणी लेखापरीक्षण करण्यात येईल व लेखापरीक्षण अहवालाअंती दोषी आढळून आल्यास सर्व संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.

तसेच या गैरव्यवहारात दोषी आढळणाऱ्या संबंधित सहायक निबंधकसहकारी संस्था यांचेविरुद्ध शिस्तभंगविषयक कार्यवाही करण्यात येईल.

या चर्चेत विधानसभा सदस्य विजय वडेट्टीवार आणि प्रविण दटके यांनीही सहभाग घेतला.

Featured post

Lakshvedhi