Friday, 27 February 2026

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारासाठी १५ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारासाठी

१५ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

      मुंबईदि.३१ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे समाज सेवक यांना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येते. सन २०२४-२०२५ व २०२५-२६ या आर्थिक वर्षात देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छूक स्वयंसेवी संस्था व व्यक्ती यांनी आवश्यक पुरस्कारासाठी त्यांचे विहीत नमुन्यातील अर्ज संबंधित सहायक आयुक्तसमाज कल्याण यांचेकडे १५ मार्च२०२६ पर्यंत कागदपत्रांसह दाखल करावेत असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण मुंबई उपनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कारपद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कारसंत रविदास पुरस्कारलोककवी वामनदादा कर्डक पुरस्कारशाहुफुलेआंबेडकर पारितोषिकडॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार या पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

या विविध पुरस्काराची जाहिरात व अर्जाचा नमूना संबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्तसमाज कल्याण यांचे कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.

पुरस्काराची जाहिरात शासनाच्या तसेच सामाजिक न्याय विभाग https://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता ३ मार्च पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता

३ मार्च पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबईदि. २७ : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत सन २०२५-२०२६ या वर्षाकरिता देण्यात येणाऱ्या महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारनटराज पुरस्कारविश्वकर्मा पुरस्कार आणि क्रांतीवीर राजे उमाजी नाईक या पुरस्कारासाठी इच्छुक व्यक्ती तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पुरस्कारासाठी इच्छुक व्यक्ती व संस्थांनी ३ मार्च २०२६ पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण मुंबई उपनगर यांनी केले आहे.

पुरस्कारासाठी अटी व शर्ती पुढील प्रमाणे :- अर्जदार व्यक्तीसंस्था महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जदाराने संबंधित समाजाच्या शैक्षणिकसामाजिकसांस्कृतिकआर्थिक अथवा अन्य क्षेत्रातील उत्थानासाठी सलग व उल्लेखनीय स्वरूपाचे कार्य केलेले असावे. अर्ज विहित नमुन्यात सादर करणे बंधनकारक असून शासन निर्णयात नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रेकार्याचा सविस्तर अहवालशिफारस पत्रे व प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. अपूर्णचुकीची माहिती असलेले अथवा मुदतीनंतर प्राप्त होणारे प्रस्ताव कोणत्याही परिस्थितीत विचारात घेतले जाणार नाहीत. पुरस्काराबाबत अंतिम निर्णय शासनस्तरावर घेण्यात येईल व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.

  अर्जाचा नमुनाशासन निर्णयातील सविस्तर अटी व शर्ती तसेच पुरस्कारांबाबतची अधिक माहिती सहायक संचालकइतर मागास बहुजन कल्याणमुंबई उपनगर (चौथा मजलानवीन प्रशासकीय इमारतआर.सी.चेंबुरकर मार्गचेंबुर पुर्व ४०००७१ येथे उपलब्ध असून दि. ३ मार्च २०२६ सायं. ५ पर्यंत संबंधित पुरस्कारासाठीचे प्रस्ताव या कार्यालयास करणेकरीता मुदतवाढ देण्यात आली असल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

0000

कोल्हापूर-रत्नागिरी जोडणाऱ्या घाटमार्गांच्या कामांना गती द्या

 कोल्हापूर-रत्नागिरी जोडणाऱ्या घाटमार्गांच्या कामांना गती द्या

- मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबईदि. २७ : कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रमुख तीन घाटमार्गांच्या कामांना गती देण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले.

अणुस्कुरा-गावडी (ता. शाहूवाडीजि. कोल्हापूर) ते लांजा (जि. रत्नागिरी) येथील भांबेड-धनगरवाडी रस्तापावनखिंड-गजापूर-विशाळगड पायथा (ता. शाहूवाडी) ते संगमेश्वर तालुक्यातील देवडे-भोवडे जोडणारा नवीन घाटमार्गराष्ट्रीय महामार्ग १९३ पासून बाजारभोगाव-किसरूळ-काळजवडे-पोंबरे-कोलीक-पडसाळी ते किजिडी घाटास जोडणारा रस्ता या घाटमार्गासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली.

बैठकीस आमदार डॉ. विनायक कोरेआमदार किरण सामंतआमदार चंद्रदीप नरकेसचिव (रस्ते) संजय दशपुतेमुख्य अभियंता (राष्ट्रीय महामार्ग) संतोष शेलारमुख्य अभियंता (कोकण) शरद राजभोजअधीक्षक अभियंता (कोल्हापूर) तुषार बुरूडकार्यकारी अभियंता (विशेष प्रकल्प) चंद्रकांत आयरेकरजिल्हा वन अधिकारी (कोल्हापूर) संजय वाघमोडे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोल्हापूर-रत्नागिरी दरम्यानचे हे रस्ते देवडे-भोवडे ते विशाळगड घाटकाजिर्डा ते पडसाळी घाट आणि भांबेड ते गावडी घाट अशा तीन प्रमुख घाटांना जोडतात. सह्याद्री पर्वतरांगांतील लांजा व संगमेश्वर तालुक्यातील अनेक मुख्य गावांना हे मार्ग जोडत असल्याने दळणवळण सुलभ होईलघाटमाथ्यावरील नागरिकांचे जीवनमान उंचावेल तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्हे थेट जोडले जातीलअसे मंत्री भोसले यांनी सांगितले.

वन विभागाच्या आवश्यक सर्व परवानग्या पूर्ण करून रस्त्यांच्या कामांतील अडथळे तातडीने दूर करावेत. आवश्यक ठिकाणी पूलदिशादर्शक फलक बसवावेतघाटमार्गांसाठी योग्य सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात. तसेच या मार्गांवर एसटी बसेस नियमित धावतील अशा पद्धतीने रस्त्यांची आखणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

कोकण पर्यटन ग्रामीण विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून पर्यटकांसाठी सुविधा निर्माण करा

 कोकण पर्यटन ग्रामीण विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून

पर्यटकांसाठी सुविधा निर्माण करा

-         राज्यमंत्री योगेश कदम

मुंबईदि. २७ : रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाच्या अपार संधी आहेत. या भागात देश विदेशातील पर्यटक येत असतात. कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम अंतर्गत दापोली तालुक्यात पर्यटक सुविधांची कामे सुरू आहेत. या पर्यटन विकास कार्यक्रम अंतर्गत दर्जेदार स्वरूपाची कामे करून पर्यटकांसाठी उत्तम सुविधा निर्माण कराव्यातअशा सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री योगेश कदम यांनी मंत्रालयात आयोजित कोकण पर्यटन ग्रामीण विकास कार्यक्रमाच्या आढावा बैठकीत दिल्या.

            बैठकीस मंत्रालयात ग्रामीण विकास विभागाचे उपसचिव सुभाष इंगळेचिपळुण सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवेजिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता हर्षल चव्हाण उपस्थित होतेतर दूरदृश्य प्रणालीद्वारे रत्नागिरी जिल्हाधिकारी मनुज जिंदालजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी बैठकीत सहभाग घेतला.

            कामांचा आढावा घेत असताना राज्यमंत्री योगेश कदम म्हणालेगावातील बचत गटांचा कोकण पर्यटन ग्रामीण विकास कार्यक्रमामध्ये सहभाग घेण्यात यावा. बचतगटाच्या सूचनांचाही अंतर्भाव करण्यात यावा. कर्दे ग्रामपंचायत हद्दीतील प्रशासकीय मान्यता मिळालेली कामे पूर्ण करावी. या कामांसाठी मिळालेला निधी विहित कालावधीत खर्च होण्याची दक्षता घ्यावी. कामांच्या दर्जाबाबत तडजोड केल्या जाणार नाही.

 कर्दे खाडीवर पूल बांधणेखाडी येथे संरक्षक बंधारा बांधणे तसेच कर्दे येथे समुद्र किनाऱ्यालगत सांस्कृतिक संकुल बांधकाम या कामांसाठी सीआरझेड (कोस्टल रेग्युलेशन झोन) ची परवानगी मिळण्याची कार्यवाही पूर्ण करावी. कर्दे परिसरात पायाभूत सुविधांची कामे गतीने पूर्ण करावीअसेही राज्यमंत्री योगेश कदम यांनी सूचित केले.

विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी टास्क फोर्स

 विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी टास्क फोर्स

विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याबाबत उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘महाराष्ट्र विद्यार्थी संरक्षण आणि मानसिक कल्याण धोरण २०२५’ संदर्भात शासनाने अहवाल तयार केला आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी विशेष टास्क फोर्स’ स्थापन करण्यात आली असून प्रत्येक विद्यापीठाने कोणती पावले उचलली याचा आढावा टास्क फोर्स घेत आहे.

युवा प्रशिक्षण योजना ही केवळ तरुणांना अनुभव मिळण्यासाठी

 युवा प्रशिक्षण योजना ही केवळ तरुणांना अनुभव मिळण्यासाठी

युवा प्रशिक्षण धोरण जाहीर करतानाच ११ महिन्यांचा कालावधी निश्चित केला होता. नोकरीसाठी जाताना अनुभव काय?’ असा प्रश्न विचारला जातो. त्यामुळे या योजनेतून सुमारे एक लाख युवकांना विविध विभागांत ११ महिने कामाची संधी देऊन प्रमाणपत्र दिले. त्यामुळे त्यांच्याकडे राज्य प्रशासनात काम केल्याचा अधिकृत अनुभव आहेअसे मुख्यमंत्री म्हणाले. या योजनेतून कोणालाही कायमस्वरूपी नोकरी देण्याची बॅकडोअर एन्ट्री’ शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

रोजगार निर्मितीबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की२०२४-२५ मध्ये ७६७ दीनदयाल रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले. या मेळाव्यांत ७,२७३ उद्योजक सहभागी झाले. एकूण १,२७,३५७ उमेदवारांनी सहभाग घेतला असून त्यापैकी ३८,५१२ जणांची निवड झाली. २०२५-२६ मध्ये आतापर्यंत ३७२ रोजगार मेळावे घेण्यात आले. त्यात २०,०६९ उद्योजक सहभागी झाले,२९,६५७ उमेदवारांपैकी २४,१०१ जणांची नोकरीसाठी निवड करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

कुंभमेळा : श्रद्धा आणि शाश्वत विकास यांचा संगम

 कुंभमेळा : श्रद्धा आणि शाश्वत विकास यांचा संगम

कुंभमेळा ही इन्टॅन्जिबल फेथ’ आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. विविध पंथजाती आणि धर्माचे लोक येथे एकत्र येतात. कुंभमेळ्यामुळे उत्तर प्रदेशचे जागतिक स्तरावर ब्रँडिंग झाले. आपल्यालाही नाशिक कुंभमेळ्यामध्ये महाराष्ट्राचे जागतिकस्तरावर ब्रँडिंग करायचे आहे. प्रयागराजमध्ये गुंतवणुकीपेक्षा अधिक परतावा मिळाल्याचे उदाहरण देत नाशिक परिसरात गोदावरी पूर्णपणे स्वच्छ करण्याचेसांडपाणी नदीत न जाण्याचेविमानतळ उभारणी व रस्ते विस्ताराचे काम हाती घेतले आहे. कुंभमेळ्यामुळे धार्मिक पर्यटन वाढीस चालना मिळणार असून राज्याची अर्थव्यवस्था बदलण्यास मदत होणार आहे. हे केवळ कुंभपुरते मर्यादित नसून शाश्वत शहर उभारणी आणि राज्याचे जागतिक ब्रँडिंग यासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Featured post

Lakshvedhi