Thursday, 19 February 2026

संविधान जागृती प्रश्नमंजूषा उपक्रमात न्या. एम. एस. जावळकर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

 संविधान जागृती प्रश्नमंजूषा उपक्रमात

न्या. एम. एस. जावळकर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

 

मुंबईदि. १८ : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष अॅड. धर्मपाल मेश्राम यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या संविधान जागृती प्रश्नमंजूषा २०२५-२६ या उपक्रमांतर्गत ऑनलाईन संविधान प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत आयोजित विशेष सत्रात प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश न्या. एम. एस. जावळकर (नागपूर खंडपीठ) यांनी विद्यार्थ्यांना संविधान विषयक मार्गदर्शन केले.

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगमुंबई यांच्या पुढाकारातून आयोजित संविधान जागृती प्रश्नमंजूषा २०२५-२६ या राज्यव्यापी उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. संविधानाबद्दल सखोल ज्ञानलोकशाही मूल्यांची जाणीव आणि सामाजिक न्यायाची बांधिलकी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

 

तज्ज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली मराठीहिंदी व इंग्रजी भाषेत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूर येथील डॉ. कैलास वसावेडॉ. दिविता कोठेकरडॉ. आरती तायडेडॉ. व्ही. पी. तिवारी तसेच महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मुंबई येथील डॉ. जगदीश खोब्रागडेडॉ. साहिली सुरजुसे व डॉ. अमोल चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.

 

न्या. श्रीमती एम. एस. जावळकर यांनी विद्यार्थ्यांना संविधान विषयक अमूल्य मार्गदर्शन केले. त्यांनी भारतीय संविधानातील मूलभूत अधिकारकर्तव्येसमानतास्वातंत्र्यबंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.

या विशेष सत्रात न्या. आर. सी. चव्हाणन्या. पृथ्वीराज चव्हाणमाजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित तसेच माजी आयुक्त समाज कल्याण इ. झेड. खोब्रागडे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनाल अ. थुल यांनी केले. कार्यक्रमास डॉ. जगदीश खोब्रागडेडॉ. साहिली सुरजुसे व डॉ. आरती तायडे यांची उपस्थिती लाभली. विशेष म्हणजे राज्यातील विद्यार्थिनींचा मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविण्यात आला.

 

मुंबई क्लायमेट वीकमध्ये अंतराळवीर राकेश शर्मा व शुभांशू शुक्ला यांचा विद्यार्थ्यांना शाश्वत जीवनशैलीचा संदेश

 मुंबई क्लायमेट वीकमध्ये अंतराळवीर राकेश शर्मा व शुभांशू शुक्ला यांचा विद्यार्थ्यांना शाश्वत जीवनशैलीचा संदेश

 

मुंबईदि. १८: अंतराळातून पाहिल्यावर देशशहर किंवा सीमा यांची ओळख मागे पडते आणि पृथ्वी हीच आपली ओळख वाटतेअशी भावना अंतराळातून पृथ्वीकडे पाहताना निर्माण झाल्याचा अनुभव भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा व नुकतेच अंतराळस्थानकावर जाऊन आलेले अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी सांगितला.

 

भारताच्या पहिल्या मुंबई क्लायमेट वीकमध्ये अवकाशपर्यावरण आणि मानवी जबाबदारी यांचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. देशाचे दोन अवकाशवीर राकेश शर्मा आणि शुभांशू शुक्ला सारे जहाँ से अच्छा या विशेष सत्रात प्रथमच एका मंचावर एकत्र आले. क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते दोघांचा सत्कार करण्यात आला. विविध शाळांतील १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेत अवकाशवीरांशी थेट संवाद साधला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार गौरव सावंत यांनी केले.

 

अंतराळवीर राकेश शर्मा यांनी अंतराळातून पृथ्वी पाहताना झालेल्या अनुभूती सांगताना प्रदूषणाचे गंभीर परिणाम अधोरेखित केले. पृथ्वीचा निळसर रंग कमी होत करडेपणा वाढल्याचे निरीक्षण त्यांनी मांडले. हे केवळ दृश्य बदल नाहीतर आपल्या पर्यावरणीय स्थितीचे स्पष्ट संकेत आहेत, असे ते म्हणाले. अंतराळातून पाहिलेल्या जंगलाच्या आगीधुराचे प्रचंड ढग आणि पसरलेले प्रदूषण यामुळे पृथ्वीवरील प्रत्येक कृती जागतिक परिणाम घडवतेहे स्पष्ट होतेअसे त्यांनी नमूद केले.

लंडनमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली भेट · पुष्पहार अर्पण करुन स्मृतीला वंदन

 लंडनमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली भेट

·         पुष्पहार अर्पण करुन स्मृतीला वंदन

 

पुणेदि. १८: महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी लंडन येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला भेट दिली.

 

उपसभापती डॉ. गोऱ्हे सध्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या पीठासीन अधिकाऱ्यांच्या इंग्लंड अभ्यास दौऱ्यावर आहेत.

 

उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिल्पाला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या पवित्र स्मृतीला वंदन केले. केंद्र सरकारच्या नेहरू सेंटरचे श्री. रवींद्रचंद्रन यांनी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा सत्कार केला. यावेळीलंडन महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष वृषाल खांडकेवैभव खांडगे केंद्र सरकारच्या नेहरू सेंटरचे श्री. रवींद्रचंद्रनस्मारक व्यवस्थापक श्री. फहदउद्योजिका अनुश्री चौगुले उपस्थित होते

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे फेडेक्स कार्गो हबमुळे महाराष्ट्रातील व्यापाराला नवी गती

 नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे फेडेक्स कार्गो हबमुळे

महाराष्ट्रातील व्यापाराला नवी गती

     – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

नवी मुंबईदि. १८ (विमाका): नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे फेडेक्सच्या समर्पित कार्गो हबचे भूमिपूजन हा भारतमुंबई आणि महाराष्ट्रासाठी पुरवठा व्यवस्थान खर्च क्षेत्रातील ऐतिहासिक टप्पा असूनया सुविधेमुळे राज्यातील उद्योगनिर्यात आणि व्यापाराला मोठी चालना मिळणार आहेअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. बदलत्या जागतिक व्यापार परिस्थितीत फेडेक्सने मुंबईत गुंतवणूक करण्याचा घेतलेला निर्णय हा भारताच्या आर्थिक सामर्थ्याचा आणि महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांवरील जागतिक विश्वासाचे महत्त्वपूर्ण प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले.

एआय क्रांती आणि पर्यावरणीय परिणाम

 एआय क्रांती आणि पर्यावरणीय परिणाम

एआय तंत्रज्ञान, हवामान अंदाजपूर व्यवस्थापनशेतीक्षमता वाढविणे यासाठी उपयुक्त ठरू शकतेमात्र येणाऱ्या काळात एआयमुळे रोजगार क्षेत्रात मोठे बदल घडतील. लाखो लोक विस्थापित होऊ शकतात. त्यामुळे सरकारांनी आतापासूनच याबाबत नियमन व धोरणात्मक तयारी करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सोशल मीडियाच्या अनियंत्रित विस्तारातून घेतलेला धडा लक्षात घेऊनएआयसंदर्भात उशीर होण्यापूर्वीच योग्य पावले उचलावीतअसा सल्ला त्यांनी दिला.


हवामान बदल म्हणजे धोरणाचा नव्हे, तर आरोग्याचाही प्रश्न

 हवामान बदल म्हणजे धोरणाचा नव्हेतर आरोग्याचाही प्रश्न

हवामान बदल हा केवळ ऊर्जा धोरणाचा मुद्दा नसून तो सार्वजनिक आरोग्या संदर्भातीलही गंभीर विषय आहेअसे श्रीमती क्लिन्टन यांनी स्पष्ट केले. दिल्लीबीजिंगसारख्या शहरांतील प्रदूषणमहिलां व मुलांमधील श्वसनविकार यांचा उल्लेख करत त्यांनी स्वच्छ इंधन व पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाच्या प्रसाराची गरज मांडली. अमेरिकाब्रिटनसारख्या देशांसह चीनभारतासारख्या देशांनीही अक्षय ऊर्जेकडे संपूर्ण संक्रमण करणे आवश्यक आहे.

एआय

हवामान बदलात भारत नवकल्पना व अंमलबजावणीचे नेतृत्व करेल- हिलरी क्लिंटन

 हवामान बदलात भारत नवकल्पना व अंमलबजावणीचे नेतृत्व करेल- हिलरी क्लिंटन

हवामान बदलाच्या लढ्यातील आघाडीवर भारत आणि दक्षिणेकडील देश नवकल्पनांचे नेतृत्व करू शकतात. पर्यावरणासाठी आणि मानव जातीच्या कल्याणासाठी परिणामकारक उपायांकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. यात भारताचीही भूमिका महत्वाची राहणार आहे. पर्यावरण रक्षणासाठी केवळ चर्चा नकोततर कृती करणेहीच खरी काळाची गरज आहेअसे श्रीमती क्लिंटन यांनी यावेळी नमूद केले.

          पर्यावरण कृती ही केवळ धोरणांची नव्हेतर राजकारणबाजारपेठ आणि उद्योग यांच्या वास्तवाची जाण ठेवून पुढे नेण्याची प्रक्रिया असल्याचे श्रीमती क्लिंटन यांनी नमूद केले. दक्षिणेकडील देशातील युवकांकडे स्थानिक पातळीवरील प्रभावी उपाय आहेतमात्र त्यांना भांडवलनेटवर्क आणि व्यासपीठाची कमतरता भासते. कल्पना कुठूनही येऊ शकतातफक्त त्यांना पाठबळ देणे आवश्यक आहे. सार्वजनिकखासगी आणि सामाजित उत्तरदायित्व क्षेत्रांनी एकत्र येऊन अंमलबजावणीसाठी सक्षम भागीदारी उभी करणे ही काळाची गरज आहे. यासाठी  क्लिन्टन ग्लोबल इनिशिएटीव्ह वर्षभर भागीदारांसोबत काम करून निधीतांत्रिक मदत आणि अंमलबजावणीची साखळी उभी करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Featured post

Lakshvedhi