Friday, 13 February 2026

तांड्यापासून अंतराळापर्यंत : ग्रामीण विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना शासनाची साथ

 तांड्यापासून अंतराळापर्यंत : ग्रामीण विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना शासनाची साथ

-         इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे

·         अंतराळ संशोधन क्षेत्रात ग्रामीण विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी इस्रो विज्ञान सहल

·         विज्ञान प्रेरणा अभियानांतर्गत विजाभज आश्रमशाळेतील १०० विद्यार्थी सहलीत सहभागी होणार

 

मुंबईदि. १३ : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विज्ञान प्रेरणा अभियान अंतर्गत विजाभज आश्रमशाळांमधील १०० गुणवंत विद्यार्थ्यांना भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) येथे विशेष शैक्षणिक विज्ञान सहलीचे १५ ते २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजन करण्यात आल्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.

मंत्री सावे म्हणाले, ग्रामीण व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाविषयी जिज्ञासासंशोधनाची वृत्ती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे आवश्यक आहे. आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात अंतराळ संशोधन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध असून त्या संधीं ग्रामीण विद्यार्थ्यांना प्राप्त होण्यासाठी शासनाने विशेष उपक्रम हाती घेतला.

महाज्योतीच्या धर्तीवर वनार्टीमार्फत २ हजार विद्यार्थ्यांना यूपीएससी, एमपीएससी, स्पर्धा परीक्षा

 इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे म्हणालेमहाज्योतीच्या धर्तीवर वनार्टीमार्फत २ हजार विद्यार्थ्यांना यूपीएससीएमपीएससी,  स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. शेती व उद्योग क्षेत्रात ३५० विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येईल.

संस्थेच्या कामकाजात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी अंतर्गत लेखापरीक्षण धोरणलेखांकन धोरण आणि कर्मचारी भरती आराखड्याला मंजुरी देण्यात आली. कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत विविध विषयांमध्ये प्रशिक्षण देण्याबाबतही संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच व्यावहारिक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

या बैठकीत संस्थेच्या विविध योजनांना मंजुरी देताना चालू आर्थिक वर्षासाठी तसेच२०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी निधीचा प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रीय स्तरावरील संस्थांशी करार करून गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण देण्यासही मान्यता देण्यात आली.

युवक-युवतींना शिक्षण व रोजगाराच्या संधींसाठी वनार्टीचा सर्वंकष रोडमॅप

 युवक-युवतींना शिक्षण व रोजगाराच्या संधींसाठी वनार्टीचा सर्वंकष रोडमॅप

-          इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे

-           

मुंबईदि. ११ : विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील युवक-युवतींना शिक्षण व रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्थेचा (वनार्टी) सर्वंकष रोडमॅप तयार करावा. वनार्टीचा रोडमॅप युवक-युवतींना शिक्षणकौशल्य आणि रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल असे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.

 

            इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली वनार्टीच्या संचालक मंडळाची पहिली बैठक झाली. या बैठकीस सहसचिव सुनील तुंबारेवनार्टीचे प्र. व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे तसेच संचालक मंडळातील सदस्य दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

सहाय्यक आणि प्राध्यापक पदासाठीही त्यांचे अनुभव, विविध संशोधन प्रकल्प, विविध शिखर संस्थांकडून

   सहाय्यक आणि प्राध्यापक पदासाठीही त्यांचे अनुभवविविध संशोधन प्रकल्पविविध शिखर संस्थांकडून मिळालेला निधी आदी निकषांवर भर देण्यात आला आहे.राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अपेक्षित अध्ययन आणि अध्यापन पध्दतीत शिक्षकांची भूमिका ही महत्वाची असल्याने भरती प्रक्रिये दरम्यान मुलाखतीसाठी गुणदानाची प्रक्रिया विषद करण्यात आली आहे. यामध्ये अध्यापकांना आयसीटी कौशल्यप्रगत तांत्रिक कौशल्य आणि को-करिक्युलर एक्टीव्हिटीज यास महत्व देत कार्यपध्दती निश्चित करून अध्यापकांची निवडप्रक्रिया पूर्ण करण्यास मान्यता देण्यात आली आहे, असेही मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले. शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

विद्यापीठांमधील अध्यापक भरती प्रक्रियेस मान्यता

 विद्यापीठांमधील अध्यापक भरती प्रक्रियेस मान्यता

-         उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

·         भरतीची सविस्तर कार्यपद्धती जाहीर

 

 

मुंबईदि.११ : उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत असलेल्या सार्वजनिक विद्यापीठांमधील अध्यापक भरतीची  संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक व्हावीयासाठी  उमेदवारांना मिळालेल्या गुणदानाची यादी त्यांच्या गुणांसह विद्यापीठांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केली जाणार आहे. अशा विविध अनुषंगिक नाविन्यपूर्ण बदलांचा समावेश करून भरतीची सविस्तर कार्यपद्धती जाहीर करून भरती प्रक्रियेस मान्यता देण्यात आली आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणालेसहाय्यक प्राध्यापक पदासाठी तासिका  तत्वावरीलकंत्राटी तसेच ॲडहॉक तत्वावर कार्यरत असणाऱ्या सहाय्यक प्राध्यापकांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. या कालावधीत केलेल्या कामाचा अनुभव ग्राह्य धरला जाणार आहे. अनेक सहाय्यक प्राध्यापक जे वर्षोनुवर्षे तासिकाकंत्राटी आणि ॲडहॉक तत्वावर काम करतात अशांचा अनुभव पात्रतेसाठी ग्राह्य धरला जाणार आहे.

व्हिसा, इमिग्रेशन, वाहतूक व्यवस्थापन, स्वच्छता, वाहनांची सुस्थिती आदी बाबींचा आढावा घेऊन सर्व यंत्रणांनी

 राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल म्हणालेफ्रान्सचे राष्ट्रपती शिष्टमंडळासह थेट मुंबईत येत आहेतही महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण बाब आहे. या भेटीदरम्यान सुरक्षा आणि राजशिष्टाचारामध्ये कोणतीही कमतरता राहू नये. व्हिसाइमिग्रेशनवाहतूक व्यवस्थापनस्वच्छतावाहनांची सुस्थिती आदी बाबींचा आढावा घेऊन सर्व यंत्रणांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावीअसे निर्देश त्यांनी दिले. सर्व यंत्रणांनी समन्वयाने आणि जबाबदारीने काम करावे असे आवाहन करुन राजशिष्टाचार विभागाच्या सचिवांनी याचे समन्वयन करावेअसे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या मुंबई भेटीदरम्यान चोख व्यवस्था ठेवावी

 अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या मुंबई भेटीदरम्यान चोख व्यवस्था ठेवावी

-राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या दौऱ्यासंदर्भात घेतला आढावा

 

मुंबईदि. ११ : भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने वेगाने प्रगती करीत आहे. भारताच्या या प्रगतीमध्ये महाराष्ट्राचा मोलाचा वाटा असून विविध देशांचे पंतप्रधानराष्ट्रपती मुंबई भेटीसाठी येतात. त्यांच्या या भेटीप्रसंगी कोणतीही कमतरता राहणार नाही याची सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावीअसे निर्देश राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिले.

फ्रान्सचे राष्ट्रपती १६ फेब्रुवारीपासून मुंबई दौऱ्यावर येत आहेत. याचदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे देखील मुंबई येथे नियोजित कार्यक्रम आहेत. या दोन्ही अतिमहत्त्वाच्या नेत्यांच्या दौऱ्याच्या तयारीचा राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत आढावा घेतला. विभागाचे सचिव राजेश गवांदे यांच्यासह संबंधित सर्व यंत्रणांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi