तांड्यापासून अंतराळापर्यंत : ग्रामीण विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना शासनाची साथ
- इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे
· अंतराळ संशोधन क्षेत्रात ग्रामीण विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी इस्रो विज्ञान सहल
· विज्ञान प्रेरणा अभियानांतर्गत ‘विजाभज’ आश्रमशाळेतील १०० विद्यार्थी सहलीत सहभागी होणार
मुंबई, दि. १३ : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या “विज्ञान प्रेरणा अभियान” अंतर्गत विजाभज आश्रमशाळांमधील १०० गुणवंत विद्यार्थ्यांना भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) येथे विशेष शैक्षणिक विज्ञान सहलीचे १५ ते २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजन करण्यात आल्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.
मंत्री सावे म्हणाले, ग्रामीण व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाविषयी जिज्ञासा, संशोधनाची वृत्ती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे आवश्यक आहे. आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात अंतराळ संशोधन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध असून त्या संधीं ग्रामीण विद्यार्थ्यांना प्राप्त होण्यासाठी शासनाने विशेष उपक्रम हाती घेतला.
No comments:
Post a Comment