इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे म्हणाले, महाज्योतीच्या धर्तीवर वनार्टीमार्फत २ हजार विद्यार्थ्यांना यूपीएससी, एमपीएससी, स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. शेती व उद्योग क्षेत्रात ३५० विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येईल.
संस्थेच्या कामकाजात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी अंतर्गत लेखापरीक्षण धोरण, लेखांकन धोरण आणि कर्मचारी भरती आराखड्याला मंजुरी देण्यात आली. कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत विविध विषयांमध्ये प्रशिक्षण देण्याबाबतही संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच व्यावहारिक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
या बैठकीत संस्थेच्या विविध योजनांना मंजुरी देताना चालू आर्थिक वर्षासाठी तसेच, २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी निधीचा प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रीय स्तरावरील संस्थांशी करार करून गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण देण्यासही मान्यता देण्यात आली.
No comments:
Post a Comment