युवक-युवतींना शिक्षण व रोजगाराच्या संधींसाठी वनार्टीचा सर्वंकष रोडमॅप
- इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे
-
मुंबई, दि. ११ : विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील युवक-युवतींना शिक्षण व रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्थेचा (वनार्टी) सर्वंकष रोडमॅप तयार करावा. वनार्टीचा रोडमॅप युवक-युवतींना शिक्षण, कौशल्य आणि रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल असे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.
इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली वनार्टीच्या संचालक मंडळाची पहिली बैठक झाली. या बैठकीस सहसचिव सुनील तुंबारे, वनार्टीचे प्र. व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे तसेच संचालक मंडळातील सदस्य दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment