विद्यापीठांमधील अध्यापक भरती प्रक्रियेस मान्यता
- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील
· भरतीची सविस्तर कार्यपद्धती जाहीर
मुंबई, दि.११ : उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत असलेल्या सार्वजनिक विद्यापीठांमधील अध्यापक भरतीची संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक व्हावी, यासाठी उमेदवारांना मिळालेल्या गुणदानाची यादी त्यांच्या गुणांसह विद्यापीठांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केली जाणार आहे. अशा विविध अनुषंगिक नाविन्यपूर्ण बदलांचा समावेश करून भरतीची सविस्तर कार्यपद्धती जाहीर करून भरती प्रक्रियेस मान्यता देण्यात आली आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, सहाय्यक प्राध्यापक पदासाठी तासिका तत्वावरील, कंत्राटी तसेच ॲडहॉक तत्वावर कार्यरत असणाऱ्या सहाय्यक प्राध्यापकांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. या कालावधीत केलेल्या कामाचा अनुभव ग्राह्य धरला जाणार आहे. अनेक सहाय्यक प्राध्यापक जे वर्षोनुवर्षे तासिका, कंत्राटी आणि ॲडहॉक तत्वावर काम करतात अशांचा अनुभव पात्रतेसाठी ग्राह्य धरला जाणार आहे.
No comments:
Post a Comment